PHOTO: शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर पूर्ण तयारी; खास तयारीची ड्रोननं घेतलेली दृश्य पाहा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून (Shivsena) फारकत घेत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतील फुटीनंतर आज होणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आज दसरा मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी आरोपांच्या तोफा धडाडणार आहेत. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे.
तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे.
गर्दी जमविण्यासाठी दोन्ही बाजूने संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.
बीकेसी मैदानावर दोन ते तीन लाख कार्यकर्ते जमतील असा दावा, शिंदे गटाकडून केला जात आहे.
राज्यभरातून मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही तयारी केली आहे.
बीकेसी मैदानावर सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.