बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गोपीनाथ मुंडेचा (Gopinath Munde) वारसा चालवत नाही. तर मुंडेंनी ज्या पंडित दीनदयाळ उपध्याय यांचा वारसा चालवत आहे.अटल बिहारी वाजपेयी यांचा मुंडे साहेबांनी वारसा चालवला तोच वारसा मी पुढे चालवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा वारसा पुढे चालवत आहे. मी शत्रूबद्दल कधी वाईट बोलत नाही तर ज्यांचा वारसा मी चालवते त्यांच्या विरोधात कशी बोलेल, असे म्हणत खुद्द पंकजा मुंडेंनी मोदींविरोधात वक्तव्य केल्याच्या दाव्याचे खंडन केले.
दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) राज्याचे लक्ष आहे. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. संघर्ष करणे हे आमच्या रक्तात आहे. चिखलफेक, टीका करणे हे आम्हाला जमत नाही. पण माझ्यावर मर्यादा सोडून टीका केली. संघर्षाशिवाय यश नाही, कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचा कधीच इतिहास होत नाही. मुंडे साहेबांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. संघर्ष हा माझ्या रक्तात आहे. त्यामुळे संघर्षाला घाबरत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
राजकारणात गर्दी करणं हा आरोप आहे. गर्दी करणे तर ही आमची ताकद आहे. समाजाला वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं इथे बसलेल्या नेत्यांना वाटतं की आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. समाजाची ताकद वाढवण्यासाठी कोणाला काही मिळत असेल तर त्याचा कौतुक आहे.समाजाला बांधायचे सोडून समाजामध्ये भिंती जर कोणी उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला क्षमा होणार नाही, असा इशारा पंकजा मुंडेंनी दिला आहे.
पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा करू नका. मी पण 17 वर्षापासून राजकारण करत आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याचा विषय बंद करा. आता मी सरळ 2024 ला मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले तर ती लढणार आहे, असे म्हणत पंकजा मुंडे नाराजा असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेनी अखेर मौन सोडले.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्यात की, सावरगावात होणार दसरा मेळावा राज्यभरातील लोकांसाठी असतो. ज्यात इथे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा,वाशीम,जळगाव आणि आगदी बारामतीपासून लोकं येत असतात. त्यामुळे हा मेळावा फक्त जिल्ह्यापुरता मर्यादित नसतो. राज्यातील प्रमुख वंचित लोकांसाठी हा मेळावा असतो. हा मेळावा म्हणजे वंचितांच्या विषयाला हात घालणारा आहे.