Sanjay Raut on Anand Dave : ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांच्या जीवाल धोका असल्याचं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राऊत यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी आनंद दवे यांनी काळजी घेण्यास सांगितलं आहे. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत दवेंबाबत चिंता व्यक्त केली आहे.


संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत म्हटलं आहे की, 'ब्राम्हण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जिवितास धोका असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणानी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.' या शब्दात राऊत यांनी ट्विट केलं आहे.







पोलिसांनी आनंद दवेंना दिलं संरक्षण
ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणेकडून मिळाली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी आनंद दवे यांनी सुरक्षा पुरवली आहे. आनंद दवे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. उदयपूरमधील हत्येच्या पार्श्वभूमीवर आनंद दवे यांच्या जीवाला धोका असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.






 


उदयपूरमधील कन्हैया लालची हत्या 
राजस्थानमधील उदयपूरमध्ये धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात दोन जणांनी दुकानात घुसून कन्हैयालाल नावाच्या व्यक्तीची गळा चिरून हत्या केली. या घटनेनेतर कन्हैया याची हत्या करतानाचा व्हिडीओ व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यामुळे उदयपूरमधील वातावरण तापलं होतं. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी ही हत्या करण्यात आल्याचं नंतर स्पष्ट झालं. नुपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या