Niharika Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज' (Roadies) फेम निहारिका तिवारीला उदयपूरमधील कन्हैयालाल (Kanhaiya Lal) प्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. निहारिकाने एक व्हिडीओ पोस्ट करत उदयपूरमधील घटनेवर शोक व्यक्त केला होता. या व्हिडीओनंतर निहारिकाला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. इंस्टाग्राम युजर्सने निहारिकाच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय की, 'आता तुझी वेळ आहे.' भिलाई येथील एका तरुणाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 


व्हिडीओ पोस्ट करत निहारिकानं काय म्हटलं होतं?
निहारिकाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिनं कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला. तिनं म्हटलं होतं, 'देशात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत. आपल्या पंतप्रधानांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, हे खरे आहे का? आम्ही हिंदू भगवान शंकराचं नाव घेऊन कोणाचा गळा चिरत नाही. भगवान शंकरासाठी हिंदूंनी कुणाचा खून केल्याचं आतापर्यंत ऐकलेलं नाही. भगवान शंकराची खिल्ली उडवली तर आम्हालाही राग येईल. नुपूर शर्माला निलंबित केले, पण भगवान शंकराबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांचं काय?'




सध्या इंडोनेशियामध्ये आहे निहारिका 
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेली निहारिका सध्या शूटींगसाठी इंडोनेशियामध्ये आहे. निहारिकाने म्हटलं आहे की, , 'फार कमी इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर अशा मुद्द्यांवर खुलेपणानं आपलं मत मांडतात. उदयपूरची घटना निषेधार्ह आहे. म्हणूनच मी त्याच्या सोशल मीडियावर विरोध केला. मी काही चुकीचं बोलले नाही. मी नुपूर शर्माची बाजू घेतली नाही, फक्त कन्हैयालालची हत्या ज्या पद्धतीने झाली त्याला विरोध केला.'


दरम्यान आपण या धमक्यांनी घाबरणार नसल्याचं निहारिका तिवारीनं सांगितलं आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या