Cyclone Nisarga LIVE UPDATE | राज्यात आज 2560 नवे कोरोनाबाधित, 122 जणांचा मृत्यू

Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केलं.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2020 10:59 PM

पार्श्वभूमी

Cyclone Nisarga LIVE UPDATE : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत...More