मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकांमध्ये कर भरण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली. गेल्या दोन दिवसात जुन्या नोटांनी कररुपात मोठा पैसा महापालिकांकडे जमा झाला आहे. राज्यातील पालिकांच्या तिजोरीत दोन दिवसात 340 कोटींची भर पडली आहे.

कोणत्या महापालिकेत किती कर जमा?

कोकण विभाग

  • मुंबई - 43 कोटी 7 लाख रुपये

  • नवी मुंबई – 17 कोटी 16 लाख रुपये

  • कल्याण डोंबिवली – 22 कोटी 44 लाख रुपये

  • उल्हासनगर – 17 कोटी 8 लाख रुपये

  • ठाणे – 14 कोटी 50 लाख रुपये

  • भिवंडी – 7 कोटी 69 लाख रुपये


 

पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • पुणे – 41 कोटी 67 लाख रुपये

  • पिंपरी चिंचवड – 15 कोटी 82 लाख रुपये

  • कोल्हापूर – 3 कोटी 42 लाख रुपये

  • सांगली – 5 कोटी 92 लाख रुपये

  • सोलापूर – 9 कोटी 35 लाख रुपये


 

उत्तर महाराष्ट्र विभाग

  • नाशिक – 11 कोटी 7 लाख रुपये

  • जळगाव – 5 कोटी 7 लाख रुपये

  • धुळे – 5 कोटी 40 लाख रुपये

  • नगर – 4 कोटी 6 लाख रुपये


 

विदर्भ विभाग

  • नागपूर – 9 कोटी 90 लाख रुपये

  • अमरावती – 4 कोटी 46 लाख रुपये

  • चंद्रपूर – 1 कोटी 47 लाख रुपये

  • अकोला – 1 कोटी 65 लाख रुपये


 

मराठवाडा विभाग

  • औरंगाबाद – 4 कोटी 42 लाख रुपये

  • नांदेड – 5 कोटी 18 लाख रुपये

  • लातूर – 3 कोटी 12 लाख रुपये


 

नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. नोटा बदलण्यासाठी 30 डिंसेंबरची मुदत दिली आहे.