नंदुरबार : एकीकडे देशभरातील लहानमोठ्या शहरांमध्ये एटीएम, बँकांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे सातपुड्यातल्या आदिवासी जनतेला मात्र नोटबंदीच्या निर्णयाची मात्र माहितीच नाही.


ना संवादाची माध्यमं, ना फोनची रेन्ज, इंटरनेट तर दूरच... मग अशात मोदींचा हा निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसा? इथपर्यंत बातम्याच पोहचत नसल्यानं नागरिकांना माहितीच नव्हती, त्यामुळे त्यांना याची माहिती व्हावी यासाठी काही तरी करायला हवं, अशी मागणी होत आहे.

हा प्रदेश काही थोडा थोडका नाही. त्यामुळे ज्यांना या निर्णयाची माहिती मिळते, त्यांची दमछाक होत आहे. एकमेव बँक आहे गाठण्यासाठी अंतर खूप आहे. 40 किमीचा प्रवास करावा लागतो. कधी पैसे मिळाले नाहीत तर परत जावं लागतं, असं स्थानिक सांगतात.

सातपुड्यातील धडगाव, मोलगी, तोरणमाळ खोरे विकासापासून तर दूर आहेच. आता अर्थक्रांतीपासून ते दूर राहू नयेत इतकीच आशा व्यक्त केली जाते.