एक्स्प्लोर

गटारीनिमित्त चिकण-मटण खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गटारीसाठी लोकांकडून पुण्यात चिकन-मटण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. कोल्हापुरातही लोकांनी मटण चिकण खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

मुंबई : गटारी सगळीकडे जोरात साजरी होताना दिसत आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचं असताना आज मात्र अनेक ठिकाणी त्याचं उल्लंघन होताना दिसलं. पुण्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना वेळ देण्यात आला. शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे शहरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यात आज गटारीसाठी लोकांकडून पुण्यात चिकन-मटण खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. शहरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेले पाच दिवस पुण्यातील सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली.

पिंपरी चिंचवडमध्येही सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवणारा ठरला. मटण-चिकन आणि मासे खरेदीसाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. खरंतर दिवसभर खरेदीची आज मुभा देण्यात आली आहे, पण आता लॉकडाऊन संपल्याच्या अविर्भावतच काही नागरिक वावरत आहेत.

कोल्हापुरातही आजचा रविवारचा बेत वाया जाऊ नये म्हणून कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केली. मटण आणि चिकन खरेदी बरोबरच मासे खरेदीसाठी देखील नागरिकांनी गर्दी केली. रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे कोल्हापूरकरांचा मांस खाण्याचे हक्काचे दिवस आहे. मात्र पुढचे 7 दिवस लॉकडाऊन असल्याने आजच तांबड्या-पांढऱ्या रस्स्यावर ताव मारण्याचं कोल्हापूरकरांनी ठरवल्याच दिसतं. मटण-चिकण खरेदी करतेवेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

रत्नागिरीत देखील गटारी अमावस्या जोरात साजरी केली गेली. लॉकडाऊन असलं तरी काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यानं चिकन, मटण खरेदीसाठी दुकानांसमोर गर्दी दिसून येत होती. पण, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा प्रयत्न देखील नागरिकांकडून होताना दिसून आलं. दरम्यान काही ठिकाणी आज चिकन आणि मटनचे दर वाढलेले दिसून आले. काही ठिकाणी मटणाचे दर 700 तर काही ठिकाणी 660 रूपये होते. चिकनच्या दरात देखील 30 रूपयांनी वाढ दिसून आली. जिवंत कोंबडी 150 रूपये किलो दरानं विकली जात होती.

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Hingoli Crime News: घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना
Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला
नागपूरमध्ये 2 अंकाचा वापर करुन सुधाकर कोहळेंचा घातपात? जेन झी, जातीच्या फॅक्टरमुळे पदवीधरचा निकाल फिरला

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Virar Crime News: बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे आढळले मृतदेह; विरारमध्ये खळबळ, प्राथमिक कारण चक्रावून टाकणारं, नेमकं काय घडलं?
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला का पाडलं? अब्दुल सत्तारांनी थेटचं सांगितलं, नवनाथ बन यांच्या आरोपावर म्हणाले, 'माझ्याविरोधात...'
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Embed widget