एक्स्प्लोर
Advertisement
आम्हाला घरी जाऊद्या! कोल्हापूर मधील पुणे-बंगळुरु महामार्गावर परप्रांतीयांची गर्दी!
आम्हाला आमच्या घरी जाऊद्या म्हणत कोल्हापूर मधील शिरोली एमआयडीसीतील सुमारे एक हजार परप्रांतीय मजुर पुणे-बंगळुरु महामार्गावर उतरले होते. अचानक झालेल्या या गर्दीने पोलिसांची तारांबळ उडाली.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसीतील सुमारे एक हजार परप्रांतीय तरुण आज अचानक पुणे-बंगळुरु महामार्गावर उतरले. आपल्याला कोणत्याही परिस्थिती मूळगावी पाठवून दया, अशी मागणी या मजुरांनी केली. साधारण 10 वाजण्याच्या सुमारास शिरोली एमआयडीसीतून हे मजूर बाहेर पडले. मोठा जमाव महामार्गावर उतरल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली. या नागरिकांचे अर्धे गावकरी काल उत्तरप्रदेशला गेलेल्या ट्रेनमधून रवाना झालेत. त्यामुळे आपला नंबर का लागला नाही? अशी विचारणा करत हे मजूर रस्त्यावर उतरले.
हे मजूर थेट कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या दिशेनं रवाना झाले. आमचे गावकरी घरी गेले आहेत तर आम्हाला का घेऊन जात नाही? अशी विचारणा हे नागरिक करत होते. त्यांना अडवण्यासाठी कोल्हापूर शहराचा संपूर्ण पोलीस बंदोबस्त महामार्गावर बोलवण्यात आला. आणि या नागरिकांना कोल्हापूरच्या तावडे हॉटेल याठिकाणी अडवण्यात आलं. याठिकाणी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी तावडे हॉटेल याठिकाणी पोहचले. त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर यांची समजूत काढून त्यांना शिरोली नाका इथं असलेल्या बुधले हॉल याठिकाणी ठेवण्यात आलं. हे मजूर कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची सगळी व्यवस्था केली, जाईल असं आश्वासन देण्यात आल्यावर या मजुरांनी हॉलमध्ये राहण्याचं मान्य केलं.
मजुरांचा संयम सुटत चालला
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे असंख्य परप्रांतीय मजुरांच्या हाताचे काम गेले आहे. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी सोडण्यासाठी श्रमिक विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे. मात्र, अडकलेल्या मजुरांनी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ही सेवा अपुरी पडत आहे. यामुळे आता मजुरांचा संयम सुटत असल्याचे दिसत आहे. यातूनच ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे.
Migrant Labour | कोल्हापुरात मजूर रस्त्यावर; गरज पडली तर मी स्वत: मजुरांना समजावेन : सतेज पाटील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement