एक्स्प्लोर

खोटारड्या सरकारचा बुरखा फाडू, डाव्यांचा एल्गार!

‘माकप’चं पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील कार्यकर्ता शिबीर करवीर तालुक्यातील गिरगाव इथं संपन्न झालं.

कोल्हापूर: “नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. त्याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्यावर म्हणजेच सर्वसामान्यांवर होत आहे. त्यामुळे सरकारच्या ‘विकासा’च्या खोटेपणाचा बुरखा जनताच फाडेल. त्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करेल”, असं माकपचे माजी खासदार आणि केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य निलोत्पल बसू यांनी सांगितलं. ‘माकप’चं पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील कार्यकर्ता शिबीर करवीर तालुक्यातील गिरगाव इथं संपन्न झालं. देशातील सद्यस्थिती आणि पक्षाची भूमिका, याबाबत माकपने गिरगावसारख्या खेड्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विचारमंथन केलं. CPM या शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कॉम्रेड निलोत्पल बसू यांनी अधिक माहिती दिली. बसू म्हणाले, “जनतेने मोठ्या अपेक्षेने मोदी सरकारला निवडले. मात्र सरकारने विकासाच्या थापा मारुन जनतेचा अपेक्षाभंग केला. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम जनतेच्या क्रयशक्तीवर झाल्याचं दिसून येतंय. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पण सरकार मुख्य मुद्द्यांवरुन जनतेचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतंय. सरकारच्या या खोटेपणाचा बुरखा जनताच फाडेल”. याशिवाय देशातील समस्यांचा सामना करण्यास भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जनतेची एकजूट महत्त्वाची आहे, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांच्यासह कॉम्रेड महेंद्रसिंह, शंकर काटाळे हे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget