मुंबई : उद्याचा दिवस राज्य सरकार आणि राज्यातील जनतेसाठी फार महत्वाचा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या (शुक्रवार 8 जानेवारी) 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्थेकडून ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, यावूर्वीच (2 जानेवारी) पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यात तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहिम राबविण्यात आली आहे.


Maharashtra Corona Vaccine Dry Run LIVE Updates : महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन



ड्राय रनचा उद्देश..

  • क्षेत्रिय स्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे.

  • कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी.

  • प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे.

  • लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्रायरन घेतला जातो.


या मोहिमेची पूर्वतयारी आजपासून सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राज्यस्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी तयार करणे, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी तयार करण्याचे काम झाले आहे. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी 1 ते 4 आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

Qutis Biotech Sues Serum: 'कोव्हिशिल्ड' नावाचा वाद व्यावसायिक न्यायालयात, 'सीरम' विरोधात नांदेडच्या कंपनीकडून दावा


या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर 25 लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात येईल.


कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Vaccine testing | इंजेक्शनऐवजी नाकाद्वारे कोविड लस? नागपुरात भारत बायोटेककडून लसीची चाचणी सुरु