Maharashtra Corona Vaccine Dry Run LIVE Updates : महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन

Maharashtra Dry Run of COVID-19 Vaccine in India : कोरोना व्हायरसवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज (शुक्रवारी) देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन पार पडणार आहे.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jan 2021 11:34 AM

पार्श्वभूमी

Corona Vaccine Dry Run : भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास...More

सोलापूर जिल्ह्यात देखील आज चार ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, होटगी या ग्रामीण भागातील रुग्णालयात तर महानगरपालिका क्षेत्रातील दाराशा हॉस्पिटल इथे हे ड्राय रन घेण्यात आलं. दाराशा रुग्णालयात महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी ड्राय रनचे उद्घाटन केलं. प्रत्येक ठिकाणी 25 लोकांवर ही चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी ड्राय रन घेण्यात येत आहेत.