Corona Vaccination In Maharashtra : देशात कोरोना बळी जाण्यामध्ये ज्या राज्याचा देशात अव्वल क्रमांक आहे, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र. असं असतानाही राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित असलेली शहरे, मोठ्या महानगरातले आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून दूर पळताना दिसत आहेत. तर आदिवासी असलेला पालघर जिल्हा आणि तुलनेने मागासलेला उस्मानाबाद जिल्हा लसीकरणामध्ये अव्वल आहे. पालघर पहिल्या क्रमांकावर तर उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यामध्ये काल केवळ 0% लसीकरण झालं. कालची महाराष्ट्राची आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे कशी पाठ फिरवली आहे हे आपल्या लक्षात येईल.


महाराष्ट्रात फक्त 54.34% लसीकरण


राज्यात लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी फक्त 54.34% प्रतिसाद मिळाला आहे. सगळ्यात जास्त लसीकरण पालघरमध्ये झालं आहे. पालघरमध्ये 400 पैकी 319 लोकांनी लस घेतली म्हणजे 80% लसीकरण झालं आहे. तर बीडमध्ये फक्त 28% लसीकरण झालं आहे. बीडमध्ये एक दिवसाला 500 लसीकरण व्हायचं होतं पण फक्त 142 जणांनी लस घेतली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या मुंबईत फक्त 43% लसीकरण झालं आहे. 1400 पैकी फक्त 595 लोकांनी लस घेतली तर मुंबई उपनगरात 53% लसीकरण झाले आहे. उपनगरात 1900 पैकी 1002 जणांनी लस घेतली आहे. लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये पण नाही.


नेत्यांनी लसीकरण केल्याशिवाय लसीकरणाला वेग येणार नाही का ?


महाराष्ट्रातले मंत्री ज्या जिल्ह्यातील प्रमुख आहेत तेच जिल्हा मागे असल्याचे चित्र आहे. ज्या जिल्ह्यात, शहरात अधिक मृत्यू किंवा लागण झालीय ते जिल्हा मागे आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जालना, सोलापूर, बीड, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर हे जिल्हे लसीकरणात मागे असल्याचं दिसत आहे. नेत्यांनी लसीकरण केल्याशिवाय लसीकरणाला वेग येणार नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.


काय असू शकतात कारणं?
ॲपवरच्या अडचणी
रूग्ण कमी झाल्याने आता कशाला लसीकरण ही भावना
लस सुरक्षित नाही ही चर्चा
दुसऱ्याने घेतल्यावर आपण घेवू अशी भावना


जिल्हानिहाय झालेलं लसीकरण (कालची आकडेवारी)


नंदूरबार
टार्गेट ४००
पूर्ण झाले १९६
प्रमाण - ४९ टक्के


रत्नागिरी ५००
पूर्ण झाले २४५
प्रमाण ४९ टक्के


गोंदिया ३००
पूर्ण झाले १४४
प्रमाण ४८


सिंधुदुर्ग ३००
पूर्ण झाले १४४
प्रमाण ४८


जळगाव ७००
पूर्ण झाले ३३१
प्रमाण ४७.२९


लातूर ४८३
पूर्ण झाले २२१
प्रमाण ४५.७६


हिंगोली २००
पूर्ण झाले ९१
प्रमाण ४६.५०


नागपूर १२००
पूर्ण झाले ४७१
प्रमाण ३९.२५


गडचिरोली ४००
झाले १५६
प्रमाण ३९


रायगड ४००
झाले १५०
प्रमाण ३७.५०


अमरावती ५००
पूर्ण झाले १८२
प्रमाण ३६.४०


मुंबई १४००
पूर्ण झाले ५०४
प्रमाण ३६


पुणे २९००
पूर्ण झाले १०१०
प्रमाण ३४.८३


औरंगाबाद ८००
पूर्ण झाले २६२
प्रमाण ३२.७५


सोलापूर ११००
पूर्ण झाले ३३६
प्रमाण ३०.५५


कोल्हापूर १०८६
पूर्ण झाले ३२१
प्रमाण २९.६०


बीड ५००
पूर्ण झाले १२६
प्रमाण - २५.२०


वर्धा ६००
पूर्ण झाले १२४
प्रमाण २०.५०


अहमदनगर १२००
पूर्ण झाले १९१
प्रमाण १५.९२


नाशिक १३००
झाले १५८
प्रमाण १२.१६


सांगली ९०२
पूर्ण झाले ०
प्रमाण ०


यवतमाळ ७२७
पूर्ण झाले २६६
प्रमाण ३६.५९