मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकाने राज्यातील अनेक प्रमुखे नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड इत्यादी नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र नारायणे राणे यांची सुरक्षा कपात केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत केंद्राने वाढ केली असून, त्यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात दोन अधिकाऱ्यांसह 11 सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, त्यामध्ये भाजपा खासदार नारायण राणे यांना ही Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ज्या लोकांना थोडा कमी धोका असतो. Y सुरक्षा कशी असते?
चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या यांना देखील केंद्राची सुरक्षा
केंद्र सरकारकडून राज्यातील महत्त्वाच्या भाजपा नेत्यांना सुरक्षा दिली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही केंद्र सरकार सुरक्षा पोहोचवणार आहे. याशिवाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना सुरक्षा दिली जाईल. गेल्या काही दिवसात राज्य सरकारने भाजपचा महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढल्यामुळे चर्चा रंगली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने भाजप नेत्यांना सुरक्षेचं कवच दिलं आहे.
Y सुरक्षा कशी असते?
व्हीआयपी सुरक्षेत चौथ्या स्थानावर असलेली Y दर्जाची सुरक्षा सर्वसामान्य आहे. बहुतांश व्हीआयपींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण 11 जवानांचा समावेश असतो. त्यापैकी एक किंवा दोन कमांडो, दोन पीएसओ म्हणजे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स आणि उर्वरित निमलष्करी दलाचे जवान असतात.
संबंधित बातम्या