- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
LIVE UPDATES | गांजा चरस घेण गुन्हा नाही असं वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात बारामतीतून तक्रार
LIVE UPDATES | गांजा चरस घेण गुन्हा नाही असं वक्तव्य करणाऱ्या जावेद अख्तर यांच्याविरोधात बारामतीतून तक्रार
महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा : आरोग्यमंत्री राजेश टोपे कोलकात्याचा पहिला विजय, हैदराबादवर सात विकेट्सनी मात संजय राऊत अन् देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Maratha Reservation | मराठा समाजाचे 2 ऑक्टोबरला राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर धरणे आंदोलन कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
27 Sep 2020 09:10 PM
मनमाड : राज्यात गुटका बंदी असतांनाही अनेक भागात अवैध रित्या गुटका विक्री सुरूच आहे. सटाणा शहारत बंदी असलेला गुटका आणि पान मसाला अवैध पणे विक्री करणाऱ्या दोघांच्या घरावर सटाणा पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2 लाख 23 हजारांचा गुटका जप्त केलाय. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या कारवाईमूळे सटाणा शहारत अवैध गुटका विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे
वीज कंपन्यांनी मंत्र्यांना बिलं का नाही पाठवली हे त्यांना विचारायला हवं; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
सावकारी जाचाला कंटाळून सोलापुरात एकाची आत्महत्या. केतन उपासे या हॉटेल व्यावसायिकाने 25 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 74 लाखांच्या रकमेसाठी खासगी सावकार त्रास देत होते. याच मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप. मृत केतन उपासे यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आज पोलिसात गुन्हा दाखल. 13 आरोपींविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सावकारी जाचाला कंटाळून सोलापुरात एकाची आत्महत्या. केतन उपासे या हॉटेल व्यावसायिकाने 25 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 74 लाखांच्या रकमेसाठी खासगी सावकार त्रास देत होते. याच मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचा आरोप. मृत केतन उपासे यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आज पोलिसात गुन्हा दाखल. 13 आरोपींविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
एकीकडे ड्रग्सच सेवन केल्याच्या संशयातून बॉलिवूड क्षेत्रातील अनेकांची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे,मात्र दुसरीकडे मुंबई पोलिसांनी सुद्धा ड्रग्सविरोधातल्या कारवाईचा सपाटा लावलाय. मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना ड्रग्स पुरवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतल्या समता नगर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केलेली आहे..युसूफ हाशिम शेख (34) या आरोपीला समता नगर पोलिसांनी आपल्या हद्दीत मॉर्निंग गस्त घालत असताना बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय. जवळपास 11 ग्राम एमडी नावाचे ड्रग्स पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केलं आहे. अटक आरोपी मालाड परिसरातल्या कुरार व्हिलेज परिसरात वास्तव्यास होता. तपासामध्ये अटक आरोपी एकटा नसून त्याच्यासोबत एक टोळी या धंद्यात काम करत असल्याचे समोर आलंय ही गॅंग बांद्रा, कुर्ला, अंधेरी अश्या अनेक हायप्रोफाईल भागातसुद्धा ड्रग्स पूरवत असल्याची कबुली आरोपीने दिलीय पोलीस सध्या या टोळीच्या मागावर आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस पिका इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. भुसे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु, नागेशवाडी औंढानागनाथ भागात पिक पाहणी दौरा केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतले आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस पिका इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. भुसे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु, नागेशवाडी औंढानागनाथ भागात पिक पाहणी दौरा केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतले आहेत.
पुणे : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केला प्लाझ्मा दान, कोरोनावर मात करून आल्यानंतर 28 दिवस उलटल्यानंतर केला प्लाझ्मा दान, प्लाझ्मा दात्यांचा तुटवड़ा जाणवत असल्याने राहुल कुल यानी पुण्याच्या ससून रुग्णालयात केला प्लाझ्मा दान.
हिंगोली : जिल्ह्यातील सर्वदूर भागात सकाळी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे. काल सायंकाळी देखील जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाले पुन्हा एकदा दुथडी भरून वाहिले आहेत. तर कापणीला आलेले सोयाबीन पिके शेतात सडून जात असल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाने आता दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांची मैत्री तोडत पक्षाने केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरची चौकशी सुरु, सारा अली खान देखील एनसीबीच्या ऑफिसात पोहोचली
सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत होता, मात्र मी ड्रग्ज घेतलं नाही : सारा अली खान : एनसीबी सूत्रांची माहिती
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राजुरा तालुक्यातील नवेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, गोविंदा भीमराव मडावी (65) असे मृत शेतक-याचे नाव, स्वतःच्या शेतात काम करत असताना वाघाने हल्ला केला.
नागपूरात कुख्यात गुन्हेगार किशोर उर्फ बाल्या बिनेकरची हत्या. बोले पेट्रोलपंप चौकावर फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकर बसलेल्या कारचा बाईकने पाठलाग करत आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केली. चाकू, कुऱ्हाड आणि इतर धारधार शस्त्रांनी हत्या केली. बाल्या बिनेकरचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता हे गँगवार असण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील घरापासून अर्धा किमी अंतरावरची घटना.
प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल
पवना लेक इथल्या पार्टीत ड्रग्ज आणि दारुचा वापर, मात्र मी ड्रग्जचं सेवन केलं नाही : श्रद्धा कपूर : एनसीबी सूत्रांची माहिती
'शूटिंगच्या सेटवर सुशांत ड्रग्ज घ्यायचा', NCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरचा गौप्यस्फोट, दोन तासांपासून श्रद्धाची चौकशी सुरु
'शूटिंगच्या सेटवर सुशांत ड्रग्ज घ्यायचा', NCB च्या चौकशीत श्रद्धा कपूरचा गौप्यस्फोट, दोन तासांपासून श्रद्धाची चौकशी सुरु
ड्रग्जबद्दल चॅट केलं, मात्र ड्रग्जचं सेवन केलेलं नाही : दीपिका पदुकोण: एनसीबी सूत्रांची माहिती
नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी, समन्वयक बैठकीला उपस्थित आहेत.
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु, दीपिकाचा फोन केला जमा, श्रद्धा कपूर एनसीबीच्या ऑफिसात पोहोचली
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु, दीपिकाचा फोन केला जमा, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरनं वेळ मागितली
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांची कोरोनावर यशस्वी मात, मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोनची चौकशी सुरु, पाच जणांची टीम करत आहे चौकशी, सारा, श्रद्धाची चौकशी दुपारी 12.30 वाजता होणार
बुलढाणातील जिल्ह्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन चांगली सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्रकाशदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. विद्युत पूरवठा सुरळीत ठेवण्यापासून ते वीजबील वाटप करण्यापर्यंत महावितरणचे कर्मचारी कोरोनाच्या संकटातही अक्षरश: जिवाची बाजी लावून अहोरात्र मेहनत घेत अखंडित वीज देऊन, तारेवरची कसरत करतात. त्यांच्या कर्तव्याचं कौतुक म्हणून समाजसेवक संतोष अवसरमोल आणि युवानेते विजय जागृत यांनी लोणीगवळी पॉवरहाऊसच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रकाशदूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच महावितरण खाकी वर्दीतल्या प्रकाशदूताचे कोरोना ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले.
बुलढाणातील जिल्ह्यात कोरोना काळात जीवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन चांगली सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्रकाशदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. विद्युत पूरवठा सुरळीत ठेवण्यापासून ते वीजबील वाटप करण्यापर्यंत महावितरणचे कर्मचारी कोरोनाच्या संकटातही अक्षरश: जिवाची बाजी लावून अहोरात्र मेहनत घेत अखंडित वीज देऊन, तारेवरची कसरत करतात. त्यांच्या कर्तव्याचं कौतुक म्हणून समाजसेवक संतोष अवसरमोल आणि युवानेते विजय जागृत यांनी लोणीगवळी पॉवरहाऊसच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रकाशदूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तसंच महावितरण खाकी वर्दीतल्या प्रकाशदूताचे कोरोना ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पुन्हा खराब झालेले किट, वापरलेले पीपीई किट आल्याने परिचारिकांनी वापरण्यास नकार, परिचरिकांच्या तक्रारीनंतर अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के यांनी चौकशीसाठी समिती नेमली, जिल्हा परिषद खरेदी, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांच्याकडून किट सीपीआरमध्ये येतात, नेमके कुठून ही खराब किट आली हे चौकशीनंतर स्पष्ट होणार
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पुन्हा खराब झालेले किट, वापरलेले पीपीई किट आल्याने परिचारिकांनी वापरण्यास नकार, परिचरिकांच्या तक्रारीनंतर अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के यांनी चौकशीसाठी समिती नेमली, जिल्हा परिषद खरेदी, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांच्याकडून किट सीपीआरमध्ये येतात, नेमके कुठून ही खराब किट आली हे चौकशीनंतर स्पष्ट होणार
परभणी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यूदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा देण्यात आली होती. मात्र या जनता कर्फ्यूला व्यापारी, नगरसेवक त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनीही विरोध केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना आपला निर्णय बदलावा लागला. त्यांनी दुसरा आदेश काढून जनता कर्फ्यू हा ऐच्छिक असून सक्तीचा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे प्रशासनाची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
घाटकोपर येथील गोळीबार रोड, खंडोबा टेकडी परिसरात वाहनांना लागलेल्या आगीत 13 दुचाकी आणि 2 ऑटोरिक्षा जळून खाक झाल्या आहेत.स्थानिकांचा मते ही आग कुणीतरी मुद्दाम लावली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली.मात्र या घटनेमुळे विभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना काळात 21 एप्रिल 2020 व 11 जून 2020 च्या शासन निर्णयास अनुसरून आता ज्या कार्यालयांमध्ये 100% कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे, अशा कार्यालयात सुद्धा दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सूट देण्याचा निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी पुढील रणनीती काय असावी याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करण्यासाठी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील साताऱ्यात पोहचले आहेत. वेळ 6 वाजता, जलमंदिर
पालघर : केंद्र सरकारने मंजूर केलेली तीनही विधेयक शेतकरी आणि कामगार विरोधात असल्याचा आरोप करत आज अखिल भारतीय किसान सभेकडून पालघर मधील चारोटी येथे मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता . ही तिन्ही विधेयक रद्द करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला असून मोदी सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या . यावेळी 10 ते 15 महामार्ग रोखण्यात आला असून पालघर मधील शेकडो शेतकरी या आंदोलनात उपस्थित होते.
मोहोळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शाहीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शाहीन शेख यांची 11 विरुद्ध 6 मतांनी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे 10 सदस्य होते. त्यात शिवसेनेचे अतुल गावडे यांनी फुटून जाऊन मतदान केले. त्यामुळे एकुण 11 सदस्यांनी मतदान केल्यामुळे काँग्रेसच्या शाहीन शेख नगराध्यक्ष झाल्या. शिवसेनेचा उमेदवार नसीमा बोंगे यांना शिवसेनेचे 5 तर भाजपचे 1 अशी 6 मते पडली. 2015 साली मोहोळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या रमेश बारसकर यांची निवड झाली. अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सरिता सुरवसे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. सुरवसे यांनी मार्च 2020 ला आपला राजीनामा सुपूर्द केला. कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया जवळपास 6 महिने थांबून होती. नगरविकास खात्यातर्फे सूचना प्राप्त झाल्याने आज विडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या शाहीन शेख या विजयी झाल्या.
मोहोळच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शाहीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शाहीन शेख यांची 11 विरुद्ध 6 मतांनी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे 10 सदस्य होते. त्यात शिवसेनेचे अतुल गावडे यांनी फुटून जाऊन मतदान केले. त्यामुळे एकुण 11 सदस्यांनी मतदान केल्यामुळे काँग्रेसच्या शाहीन शेख नगराध्यक्ष झाल्या. शिवसेनेचा उमेदवार नसीमा बोंगे यांना शिवसेनेचे 5 तर भाजपचे 1 अशी 6 मते पडली. 2015 साली मोहोळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले. त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या रमेश बारसकर यांची निवड झाली. अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सरिता सुरवसे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड झाली. सुरवसे यांनी मार्च 2020 ला आपला राजीनामा सुपूर्द केला. कोरोनामुळे निवडणूक प्रक्रिया जवळपास 6 महिने थांबून होती. नगरविकास खात्यातर्फे सूचना प्राप्त झाल्याने आज विडिओ कॉन्फरन्सद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये काँग्रेसच्या शाहीन शेख या विजयी झाल्या.
ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं निधन, चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचं निधन, चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास
अहमदनगर पालिकेमध्ये सेनेनं भाजपला दिला धक्का,
अहमदनगर महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत सेनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा ,
अहमदनगर पालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची होती युती ,
अखेरच्या क्षणांपर्यंत रंगली रोमांचक लढाई,
अखेरच्या क्षणी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज खोतकर यांनी स्थायी समितीचं सभापती पद,
शिवसेनेकडून योगीराज गाडे यांनी अर्ज भरला होता,
आमदार संग्राम जगताप यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई विद्यापीठ अनेक समस्या सोडवत नसल्याने आज अभाविप कडून झोपेचं सोंग घेतलेल्या विद्यापीठाला जाग करण्यासाठी कलिना कॅम्पसमध्ये जागरण गोंधळ आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे
यामध्ये प्रथम व द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचे परीक्षा न झाल्यामुळे त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे.
इंस्टॉलमेंट्स स्वरूपात फीस सगळ्या विद्यार्थ्यांकडून घेतली जावी ज्याने फी भरणे सोयीस्कर होईल अशी मागणी अभाविप कडून करण्यात आली होती
मात्र मागणी करून सुद्धा विद्यापीठाने या मागण्यांबाबत कोणतीच पूर्तता केली नसल्याने आज हे आंदोलन अभाविप कडून करण्यात येतंय
गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाला यूजीसीकडून 12-B दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, अशी माहिती प्रभारी कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना 12-B दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंद यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला. 2011 मध्ये स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने 12-B चा दर्जा मिळवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आयोगाने मंजूर केला असून तसे परिपत्रक 23 सप्टेंबर रोजी विद्यापीठाला मिळाले. 12-B हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदान प्राप्त करता येणार आहे. तसेच या दर्जामुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांना देखील आयोगाच्या विविध योजनांचा निधी प्राप्त होणार आहे, असे कुलगुरु वरखेडी यांनी सांगितले. यावेळी कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.
Drugs Case : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची NCB नं चौकशी सुरु केली आहे. सोबतच धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितिज प्रसाद देखील एनसीबीच्या ताब्यात तर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबी गेस्टहाऊसवर दाखल
Drugs Case : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहची NCB नं चौकशी सुरु केली आहे. सोबतच धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितिज प्रसाद देखील एनसीबीच्या ताब्यात तर दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश एनसीबी गेस्टहाऊसवर दाखल
आज दुपारी 12.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
बिहार निवडणुका जाहीर होण्याची शक्यता
,
29 नोव्हेंबरला संपतो आहे बिहार विधानसभेचा कार्यकाळ
औरंगाबादच्या पाचोड परिसरामध्ये काल रात्री देखील जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल अडीच ते तीन तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पाचोड गावातही अनेक सखल भागात पाणी साचले. गेल्या काही दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
औरंगाबादच्या पाचोड परिसरामध्ये काल रात्री देखील जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल अडीच ते तीन तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पाचोड गावातही अनेक सखल भागात पाणी साचले. गेल्या काही दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
आज धनगर आरक्षणासाठी होणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनाची जय्यत तयारी विठुराया समोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी चांद्रभागेवरील महाद्वार घाट बॅनरने भरुन गेला आहे. महाद्वार घाटावर हे आजवरचे पहिलेच आंदोलन होत असून या पायऱ्यांवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलकांना उभारण्यासाठी गोल आखण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता आ पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या ढोल बजाओ आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद शेतकऱ्याचा 25 क्विंटल कांदा चोरीला. माळीवाडा गावातील गणेश गाजरे या शेतकऱ्याचा 25 क्विंटल कांदा चोरीला. दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार. कांदाचाळी ठेवलेला कांदा चोरीला..
पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणीसाठी सकाळी-सकाळीच दौरा केला. सकाळी सहा वाजताची वेळ दिलेले पवार पावणेसहा वाजताच पोहचले. त्यामुळे महामेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. गेल्या शुक्रवारी पिंपरी चिंचवडमधील तर आज पुणे स्टेशनजवळील कामाचा पवारांनी आढावा घेतला. कोरोना काळात मेट्रो काम बंद होतं तेव्हा कामगार घरी गेले होते, ते कामावर आले आहेत का? तसेच पुणे मेट्रोसाठी सर्व जागा संपादित आहे का याची माहिती त्यांनी घेतली.
भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांचा उद्याच्या धनगर ST आरक्षणाला पाठिंबा, उद्या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल वाजवा आंदोलनात सहभागी होणार
राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजना, पाच दिवसांचा आठवडा अशा दहा प्रमुख मागण्या लागू करण्याच्या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून लेखणीबंद आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाचे कामकाज पूर्णता ठप्प पडले आहे.
यवतमाळ : झुल्याची चौकीदारी करणाऱ्या तरुणाने उपासमारीला कंटाळून आत्महत्या केली. घाटंजी शहरातील घटना. तो कोरोनामुळे घाटंजीत अडकून पडला होता.
मिय्या मामु, असे मृतकाचे नाव असून तो परभणी जिल्ह्यातील रहिवासी होता. घाटंजी येथे संत मारोती महाराज यात्रा भरते. या यात्रेत विविध प्रकारचे दुकाने मनोरंजन करणारे खेळ असे साहित्य आणण्यात आले. मात्र, अशातच कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले. तेव्हापासून यात्रेतील झुल्याची चौकीदारी करण्यासाठी तो अडकून पडला होता. त्याला दोनशे रुपये रोज मिळत होता. मात्र, शिळ्या पोळ्या आणून खाण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यामुळे मामु याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पुढील तपास घाटंजी पोलीस करीत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवान शहीद झाले आहे. नरेश बडोले असे शहीद जवानाचे नाव असून ते नागपूर चे रहिवाशी होते.काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये आज ही घटना घडली आहे. ते सीआरपीएफच्या 117 व्या बटालियनमधील जवान होते.उद्या त्यांचे पार्थिव नागपूर ला आणले जाणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
उद्याच्या धनगर आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात वर्षावर प्राथमिक बैठक सुरू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असताना ओबीसी समाज दुखावू नये यासाठी सरकार प्रयत्नशील. पाच ओबीसी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत लवकरच ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहे.
उद्याच्या धनगर आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात वर्षावर प्राथमिक बैठक सुरू. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असताना ओबीसी समाज दुखावू नये यासाठी सरकार प्रयत्नशील. पाच ओबीसी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत लवकरच ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहे.
मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती. मंत्री शिंदे म्हणाले, काल मी माझी कोव्हीड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...
धनगर समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. पण त्यांचं म्हणणं सरकारकडे पोहोचत नाही. त्यामुळे धनगर आरक्षणासाठी येत्या 28 सप्टेंबर रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. मागच्या सरकारने निधीची घोषणा केली पण एक छदाम दिला नाही. जो न्याय मराठा समाजाला देता तो धनगर समाजाला का नाही? असा सवाल विचारत याबाबत बैठक बोलवण्याची मागणी शेंडगे यांनी केली. याची दखल नाही घेतली तर उग्र आंदोलन करु त्याची जबाबदारी सरकारची असेल, असंही ते म्हणाले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर नवी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची ज्येष्ठ कन्या आज दिल्लीला जाणारा असून अन्य कुटुंबातील सदस्य दिल्लीतच आहेत. दुपारी चार वाजता दिल्लीतील रुद्रभूमीत अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कर्नाटकात देखील अंगडी यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येणार आहे.अंगडी यांच्या निधनाने वृत्त कळताच अंगडी यांच्या चाहत्यांनी बेळगावातील त्यांच्या घराकडे माहिती जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती.
बुलढाण्यातील मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरचे निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम थांबवुन, रस्त्त्याचे सौंदर्यीकरण करुन रास्तादुभाजक आणि सौंदर्यीकरणासाठी मेहकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या वेळी एमएसआरडी विरोधात प्रचंड घोषणा बाजी केली. मेहकर शहरात बुलढाणा खासदार आणि मेहकर आमदारांचे निवास शहर असूनही येथील मुख्य मार्गाची दुरावस्था झालेली आहे. असा आरोप यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला. मुख्य रस्त्यावर सौंदर्यीकरण, नाली, पथदिवे, दुभाजक, डिवाइडर आदि मागण्यांसाठी रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलन करुन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
इंदापूर : उजनी जलाशयात अवैद्य वाळू उपसा करणार्या बोटींवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी जिलेटिनच्या सहाय्याने
तीन बोटी उध्वस्त केल्या. कारवाईत साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर बोट मालकांसह बोटीवर काम करणाऱ्या परप्रांतीय युवकांवरही गुन्हा दाखल केला आहे. एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
काल दिवसभर विस्कळीत असलेली मुंबईच्या उपनगरीय लोकलची वाहतूक आज पूर्ववत, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सकाळपासून सुरळीत सुरू, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
रेमडीसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवडमध्ये अटक करण्यात आली आहे. यात आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येताच ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. 5400 रुपयांचे रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या भावाने विकले जात होते. एका रुग्णासाठी 7750 तर दुसऱ्या रुग्णास 6000 रुपयांना विक्री केल्याचं तपासात समोर आलं आहे. विनापरवाना सुरु असलेल्या विक्रीचा रुग्णांच्या नातेवाईकांनी पर्दाफाश केला. अटकेनंतर आणखी किती जणांना अशी विक्री केली याचा शोध निगडी पोलिसांनी करत आहेत.
मुंबईतील अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असलेली लोकल सेवा सुरळीत
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाला आजपासून अमरावतीत सुरुवात होणार आहे. आज सकाळी 10 वाजता खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर क्रमाक्रमाने पालकमंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल.
मुंबईमधील मुसळधार पावसामुळे गाड्या रद्द.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे रेल्वे ट्रॅक वर पाणी साचले आहे, सध्या विशेष एक्सप्रेस धावत असलेल्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत ते खालील प्रमाणे आहे.
1. 01139 मुंबई- गदग विशेष एक्सप्रेस (यात्रा प्रारंभ दिनांक) JCO-23-09-2020.
2. 01140 गदग- मुंबई विशेष एक्सप्रेस ( यात्रा प्रारंभ दिनांक) JCO-24-09-2020.
3. 01019 मुंबई- भुवनेश्वर विशेष एक्सप्रेस (यात्रा प्रारंभ दिनांक) JCO-23-09-2020.
4. 01020 भुवनेश्वर-मुंबई विशेष एक्सप्रेस (यात्रा प्रारंभ दिनांक) JCO-25-09-2020.
अकोला शहरात 25 ते 29 सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. मात्र, या जनता कर्फ्यूला भाजप आणि वंचित बहूजन आघाडीनं विरोध केलाय. सध्या जिल्ह्याची रूग्णसंख्या 7 हजारांचा टप्पा गाठत आहे. यात सतराशेवर रूग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 215 लोकांचा यात मृत्यू झालाय. प्रमुख पक्षांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद भेटतो याची उत्सुकता अकोलेकरांमध्ये आहे.
LIVE UPDATES | भिवंडी इमारत दुर्घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ, आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू तर 25 जखमी
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही छोट्या मोठ्या नद्या ओढ्यांवर पूल नसल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. जिंतूर तालुक्यातील बेलुरा गावातून जाणाऱ्या करपरा नदीवर पूल नसल्याने या गावकर्यांना चक्क जेसीबी बसून प्रवास करावा लागतो. लहान मुलां नागरिक जेसीबीच्या समोरील लोखंडी भागात बसून नदी पार करावी लागत आहे.पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये या गावकऱ्यांना अशाच प्रकारे नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. शिवाय गावातील एखाद्या रुग्णास अथवा डिलिव्हरीसाठी महिलांना बाहेर न्यायचे म्हटल्यास अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवत असल्याने तात्काळ या करपरा नदीवर पूल करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नवी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात निधन झाले.
अधिवेशनासाठी काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. बेळगाव लोकसभा मतदार संघातून ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.
एकीकडे कोरोनाचं संकट असताना मुंबई उपनगरातील बोरीवलीमध्ये सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं आहे. भाजप आमदार सुनील राणे यांनी कार्यकर्त्यांसह जाऊन धान्याच्या हजारो गोण्यांचा काळाबाजार उघडकीस आणला. एमएचबी पोलिस ठाण्यांतर्गत टोमॅटो मार्केट गणपत पाटील नगर नवीन लिंक रोड जवळील गोदामात सरकारी एफसीआयच्या गव्हाच्या जवळपास 1000 पोती पकडल्या. तसंच, एक ट्रकही पकडला, ज्यात किमान 1000 हून अधिक गव्हाच्या गोण्या आहेत. हे गहू एफसीआय गोडाऊनमधून काळ्या बाजारात आणले होते. बोरिवली रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना माहिती मिळताच काल रात्री त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. इथे गव्हाच्या गोण्या बदलून इतर गोण्यांमध्ये हा गहू भरला जात असल्याचं दिसलं. आमदार सुनील राणे यांनी बोरिवली वेस्ट टोमॅटो मार्केटच्या गोडाऊनमध्ये जाऊन एमएचबी पोलिसांकडे तक्रार करुन आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं आंदोलन स्थगित. जिल्ह्यधिकारी यांचे प्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी भूषण आहिरे आंदोलनस्थळी पोहचल्यावर लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित.
गोलमेज परिषदेतील ठरावाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा, कोल्हापूर शहरातील गोजमेज परिषदेमधून सरकारला 9 तारखेपर्यंत अल्टिमेटम, गोलमेज परिषदेत सहभागी झालेल्या संघटनांनी आप आपल्याला जिल्ह्यात बंद पाळावा, गोलमेज परिषदेत एकमताने निर्णय
NCB कडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, श्रुती मोदीला दिया मिर्झा यांना समन्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बदलत्या हवामानामुळे हंगामापूर्वीच हापूसच्या कलमांना मोहर आल्याने आंबा बागायतदारांना आशेचा किरण दिसत आहे. हंगामापूर्वी आलेल्या मोहोरामुळे तो टिकवून जिल्ह्यातील आंबा बागायतदार यातून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात आंबा बाजारात आणून खवय्यांना चव चाखता येईल अशी आशा व्यक्त करत आहेत. मात्र या आंबा बागायतदाराना हा मोहोर टिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याची आंबा बागायतदारांची मागणी आहे. किनारपट्टी भागात बहुतांशी ठिकाणी आंब्याला मोहोर आलेला आहे. याच प्रमुख कारण कातळी भागात आलेल्या प्रचंड ताणामुळे समुद्राकडून येणारे खारे वारे याचं परिणाम होऊन मोहर आला आहे. प्रगतशिल शेतकरी हा मोहोर टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आलेल्या मोहोरावर प्रयोग करून आंबा मोहोर टिकवून आब्याचे उत्पादन सुद्धा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या मोहोरापासुन जानेवारी महिन्यात आंबा फळ मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना चागली किमत आंब्याना मिळते. यामुळे चागल उत्पन्न मिळू शकत. हा मोहोर टिकवण्यासाठी मोहोराला कव्हर करावे लागते. त्यानंतर कीटक नाशक व बुरशी नाशक याच्या फवारणी कराव्यात. पावसाळ्यात मोहोर आल्यामुळे करपा रोगापासून बचाव करावा लागतो. गिर्ये रामेश्वर आंबा संशोधन केंदाने आंबा बागायतदारांना मोहोर टिकवण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
परभणी : मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आक्रमकरित्या आंदोलन सुरु असताना परभणीच्या मानवत शहरात सकल मराठा बांधवांकडुन आज अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाजातील सर्व आंदोलकांनी एकत्र येऊन कपडे फाड आंदोलन केले आहे.शिवाय जोरदार घोषणाबाजी हि केलीय.मराठा आरक्षणासाठी मानवत तालुक्यात मागच्या आठवडा भरा पासुन सकल मराठा बांधवांकडून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या सहा महिन्यापासून घरात बसून असलेल्या विविध प्रकारच्या लोककलावंतांनी आज पंढरपुरात पुन्हा काम सुरु व्हावे यासाठी एल्गार पुकारत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे . तमाशा , लावणी , वाघ्या मुरळी , पोतराज , ऑर्केस्ट्रा ग्रुप , जोगतिणी यांचेसह विविध प्रकारच्या लोककला सादर करणारे कलावंत आज पंढरपुरात जमा होत तहसील कार्यालया बाहेर हे आंदोलन सुरु केले आहे . सर्वच कलावंत येथे आपल्या कला सादर करीत आंदोलन करीत असून आम्हाला पुन्हा आमचा लोककलेचा व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी हे कलावंत करीत आहेत . कोरोना संकटामुळे कुटुंबाची होणारी उपासमार पाहवत नसल्याने आता एक तर न्याय द्या अन्यथा आमचे जीव आम्ही आमरण उपोषण करून सोडू अशी टोकाची भूमिका घेऊन हे सर्व उपेक्षित कलावंत जमले आहेत . जी परिस्थिती पंढरपुरात आहे तशीच स्थिती राज्यातील लोककलावंतांची असल्याने आम्हाला न्याय द्या हि भूमिका घेत हा एल्गार पुकारला आहे . या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसर विविध प्रकारच्या लोकसंगीतानी दुमदुमून गेला आहे .
सोलापूर -
सोलापूरात कांद्याच्या भावात घसरण, पावसामुळे कांदा खराब होत असल्याने दर घसरले असण्याची शक्यता,
काल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर होते, आज एक हजार रुपये रुपयांची घसरण,
सोलापुरात सरासरी 4 हजार रुपये दर, बाजारात जवळपास 165 ट्रक कांद्याची आवक,
शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान, काल खरेदी केलेला कांदा बाजरात पोहोचण्याआधी दर घसरले,
हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाट्यानजीक हिंगोली ते नांदेड या मार्गावर नागपूर वरून हैदराबादच्या दिशेने जनावरांचे मास घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ट्रक उलटल्यामुळे ट्रक मधील सर्व जनावराचे मांस रोडवर पडले आहे. सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून नेमक हे मास कशाचे आहे, यासंदर्भात अधिक तपास कळमनुरी पोलीस करीत आहेत, ट्रक उलटल्यानंतर चालक हा किरकोळ जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर आणि नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. देवळेकर यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर देवळेकर यांच्यावर डोंबिवलीच्या निऑन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तिथे प्रकृती खालावल्याने त्यांना नवी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे गेल्यानंतर त्यांचा कोरोना बरा झाला, मात्र मल्टी ऑर्गन फेल्युअरचा सामना त्यांना करावा लागला. त्यातून ते सावरत नाहीत, तोच मंगळवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. देवळेकर रुग्णालयात दाखल असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पीपीई किट घालून त्यांची भेट घेतली होती, तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबईतील रुग्णालयात जाऊन देवळेकर यांची भेट घेतली होती. यावेळी देवळेकर यांना कुणाला ओळखता सुद्धा येत नव्हतं. जुन्या फळीतले शिवसैनिक असलेल्या देवळेकर यांच्या निधनाने कल्याण शहरात मोठी हळहळ व्यक्त होतेय.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
प्रचंड पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे.
येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस. वरळीच्या बीएमसी क्वॉर्टसमध्ये पाणी शिरलं. येत्या 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा.
भिवंडी इमारत दुर्घटनेत मृत्यूच्या संख्येत वाढ आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू तर 25 जण जखमी असून बचाव कार्य अजुनही सुरू आहे
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. बंगल्यावरील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली होती.
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच पाली साहित्याचे गाढे अभ्यासक नागपूर विद्यापीठातील आंबेडकर चेअरचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं निधन झालं, ते 78 वर्षाचे होते.
डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म 15 जून 1942 रोजी झाला होता. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते होते. बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते.
डॉ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते 'विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच रशियातील बौद्धधर्म हे पुस्तक लिहिले आहे.
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच पाली साहित्याचे गाढे अभ्यासक नागपूर विद्यापीठातील आंबेडकर चेअरचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं निधन झालं, ते 78 वर्षाचे होते.
डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म 15 जून 1942 रोजी झाला होता. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते होते. बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत होते.
डॉ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. ते 'विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलना'चे अध्यक्ष होते. त्यांनी मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच रशियातील बौद्धधर्म हे पुस्तक लिहिले आहे.
विरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, संसदेच्या उर्वरित अधिवेशनात सहभाग घेणार नाही, कृषी विधेयकावरून झालेल्या खासदारांच्या निलंबनाचा निषेध
बारामतीत 312 किलो गांज्यासह 56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 312 किलो गांजाची किंमत तब्बल 47 लाख आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथून विक्रीसाठी महाराष्ट्रात आणला होता. हा गांजा बारामती मार्गे सातारा आणि सांगली इथे विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अभिनेत्री पायल घोष सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात तक्रार देण्यास पोहोचली होती. मात्र रात्री उशीर झाल्याने आणि महिला अधिकारी नसल्याने तक्रार न देताच तिला घरी परतावं लागलं. पायल घोष तब्बल दोन तास पोलीस ठाण्यात होती. आज पुन्हा दुपारी पायल घोष ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहे.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची सकाळीच भेट घेतली. उपसभापतींनी आंदोलक खासदारांसाठी चहा देखील आणला. राज्यसभेत वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याने आणि उपसभपतींसोबत गैरवतन केल्याने राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. याविरोधात सर्व खासदारांनी गांधीजींच्या मूर्तीजवळ ठिय्या मांडून आंदोलन केलं.
पालघर : जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात भुकंप सत्र सुरूच असून रात्री पासून सतत भूकंपाचे सौम्य व मध्यम स्वरूपाचे धक्के बसत आहेत. रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी 3.5 पहाटे 4 वाजून 12 मिनिटांनी 2.1 तर 5 वाजून 49 मिनिटांनी 2.0 क्षमतेचे धक्के धुंदलवाडी, तलासरी, आंबोली, कासा, धानीवरी, बोर्डी, दपचारी, चिंचले परिसरात जाणविले.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस
उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिंगोली : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे औंढा तालुक्यातील हिवरा गावानजीक असलेल्या ओढ्याला पुराचे पाणी आल्याने, सकाळपासून माळजगाव, मेथा, असोदा या तीन गावाचा संपर्क तुटला आहे. इतर पर्यायी मार्गाचा वापर करून व अंतराचा फेरा मारून नागरिकांना गावा बाहेर पडावे लागत आहे.
वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाने 21000 चा आकडा पार केलाय. गेल्या 24 तासांत तब्बल 134 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली असून आज 4 कोरोना बधितांचा मृत्यू तर 115 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नवे 134 रुग्णांसह वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या 21031 झाली आहे. वसई विरार क्षेत्रात कोरोना बाधित मृत्यूची संख्या 421 झाली असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 18258 झाली आहे. उर्वरित 2352 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यांमध्ये सकाळपासून धुवाधार पावसाने बॅटींग सुरु केली आहे. पहाटे पाच वाजता पासून जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम तर काही भागात धुवाधार पाऊस सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या वर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनच्या उभ्या पिकाला मोड फुटले आहेत. तर इतरही पिके पाण्याने कुजू लागली आहेत. काही ठिकाणी अजूनही शेतात उभ्या पिकात पाणी साचून आहे. होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पार्श्वभूमी
मराठा समाजातील युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार घेतले 'हे' निर्णय
सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समजाला दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेत राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरीम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने सोमवारी (21 सप्टेंबर) विनंती अर्ज दाखल केला आहे.
शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत :
- आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता इडब्लूएस मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी 600 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी 80 कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतीमान करण्यात येईल.
- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी 130 कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल 400 कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
- मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.
- मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. शासनाकडे आतापर्यंत फक्त 26 प्रकरणे प्रलंबित आहेत त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.
एक कोटी मजुरांनी मार्च ते जूनदरम्यान पायी घर गाठलं, सरकारची संसदेत लिखित माहिती
कोरोना महामारीत संपूर्ण देश संकटात आहे. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. उपजिविकेसाठी विविध राज्यामध्ये असणाऱ्या मजुरांनी लॉकडाऊननंतर स्वगृही परतण्यास सुरुवात केली. मात्र वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने असंख्य मजुरांना रस्त्यावर उतरत पायी घर गाठलं. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च 2020 ते जून 2020 दरम्यान एक कोटीहून अधिक मजुरांनी आपआपल्या राज्यात पायी स्थलांतर केलं, अशी माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत लिखीत स्वरुपात दिली आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, कोविड 19 महामारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर मजूरांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर केलं. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळापास 1.06 कोटी मजुरांनी स्थलांतर केलं, यामध्ये पायी प्रवास केलेल्या मजुरांचाही समावेश आहे.
ड्रग्ज प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्जाचंही नाव समोर आल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी आणि अंकुश यांच्या चौकशीदरम्यान दिया मिर्जाचं नाव समोर आले आहे. एनसीबीजवळ दिया मिर्जाच्या ड्रग्ज खरेदीचे पुरावेही असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दिया मिर्जानं ट्विटरवरुन सर्व आरोप फेटाळलेत.
आपल्या ट्वीटमध्ये दिया म्हणाली, "माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. सर्व आरोपांचं मी खंडन करते.अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे. शिवाय इतक्या वर्षांपासूनमेहनतीनं उभं केलेल्या माझ्या करिअरवर याचा परिणाम होतोय.मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही किंवा खरेदी देखील केले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार."