LIVE UPDATES | तोडगा न निघाल्याने सिलेंडर वाहतूक बंद राहणार
राहुल आणि प्रियंका गांधींकडून पीडित कुटुंबाची भेट, म्हणाले.. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रियंका गांधींशी गैरवर्तन; सर्वच स्तरातून टीकेची झोड IPL 2020 DC vs KKR: रोमांचक सामन्यात दिल्लीचा कोलकात्यावर विजय, श्रेयस अय्यरची शानदार खेळी राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Oct 2020 09:02 PM
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सरकारला अल्टीमेटम; 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरू
इंडियन ऑइल बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूकदारांची संध्याकाळी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे सिलेंडर वाहतूक बंद राहणार आहे.
कोल्हापुरात सकल मराठा समाजानं आयोजित केलेल्या न्यायिक परिषदेला सुरुवात,
कोल्हापुरातील लोणार वसाहत इथल्या हॉलमध्ये परिषदेला सुरुवात,
या परिषदेला महाराष्ट्रातील अनेक विधिज्ञ उपस्थितीत,
मराठा आरक्षणाची न्यायिक लढाई नेमकी कशी लढावी यासंदर्भात या परिषदेमध्ये चर्चा होणार,
मध्यप्रदेश येथे होणाऱ्या विधानसभेच्या आगामी पोटनिवडणुकीत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री कमलनाथ यांनी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती केली. मध्य प्रदेशातील मुरैना व ग्वालीयर या दोन्ही जिल्ह्याचे निवडणुक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहणार आहेत
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवावरून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून मुंबईतील चौघ जखमी झाले. भरधाव वेगातील कारने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. अपघातातील जखमीना उपजिल्हारूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनास्थळी कणकवली पोलिस तसेच महामार्ग वाहतूक पोलीस दाखल झाले
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवावरून मुंबईकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून मुंबईतील चौघ जखमी झाले. भरधाव वेगातील कारने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. अपघातातील जखमीना उपजिल्हारूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. घटनास्थळी कणकवली पोलिस तसेच महामार्ग वाहतूक पोलीस दाखल झाले
देशात कोरोनाबाधितांचा आकडा 65 लाखांच्या वर पोहोचला, 24 तासात नवे 75,829 नवे कोरोनाबाधित
वसई : वसई-विरारमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडयापासून पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागपूर - रामटेक तालुक्यातील मनसर येथील एटीएम मशीन गॅस कटर ने कापून चोरट्यांनी तब्बल 19 लाख 90 हजार 500 रुपये चोरून नेले, काल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये ही घटना घडली. मनसर - रामटेक रस्त्यावर काहीशा निर्जन ठिकाणी हे एटीएम सेंटर असून तिथे 2 मशीन आहेत, या सेंटरवर गार्ड नसतो. अज्ञात चोरट्यांनी काल एटीएम सेंटरच्या सीसीटीव्हीवर काळ्या रंगाचे स्प्रे मारून नंतर गॅस कटर च्या मदतीने मशीनचा व्हॉल्ट कापून 19 लाख 90 हजार 500 रुपये लंपास केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात साळवा तलावात 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला, सनी शाहू आणि वीरेंद्र शाहू अशी मृत तरुणांची नाव, दोघे सख्खे भाऊ, दोघे गावागावात फिरून जुन्या वस्तू / भंगार खरेदी करायचे. काल दुपारी ते साळवा तलाव जवळून जात असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही. तलाव खोल असून तिथे धोका आहे म्हणून एका गुराख्याने त्यांना थांबविले, मात्र, दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवी अंतिम वर्ष परीक्षा, 9 ऑक्टोबर पासून सुरु होणार, 29 ऑक्टोबर पर्यंत चालणार परीक्षा, 1 तारखे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या
बीड : विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन नमुन्यातून तपासले हस्ताक्षर, अज्ञाता विरोधात गुन्हा, बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला गुन्हा
ठाण्यातील वाघबीळ उड्डाणपुलावर भीषण अपघात. पुलावरून जाणारा एक ट्रक कलंडल्याने त्यावर असलेलं कार्डबोर्डचे सर्व सामन पुलाखालुन जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यामुळे गाडीत बसलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा ट्रक कार्डबोर्डचा अतिरिक्त भार घेऊन जात असल्याने एका बाजूला कलंडला असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील शिंगोरी कोळसा खाण परिसरात आज प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत रस्ता रोको केले. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी 20 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
वाद काय आहे?
शिंगोरी कोळसा खाण दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली, त्यामध्ये परिसरातील शिंगोरी, साहोली, डोरली, हिंगणा गावातील शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी खाण चालवणाऱ्या वेस्टर्न कोल फिल्ड्स या अधिग्रहित केल्या. मात्र, रोजगार देताना प्रकल्पग्रस्त गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना डावलण्यात आल्याच गावकऱ्यांचा आरोप आहे. एका आठवड्यात प्रकल्पग्रत गावकऱ्यांच्या मागण्या मंजूर करा अन्यथा एका आठवड्यानंतर पुन्हा आंदोलन करून शिंगोरी कोळसा खाण बंद पाडू असा इशारा आंदोलन करणाऱ्यानी दिला आहे.
विनायक मेटेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यात मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठकीला सुरुवात होते आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित नाहीत.
नांदेडचं सहस्रकुंड धबधब्यात 5 जणांच्या मृत्यूचे प्रकरण , मृत प्रवीण कवानकर व कुटुंबाचा घातपात, कवानकार कुटुंब मागच्या शुक्रवारपासून होते बेपत्ता , कवानकर यांचा मेव्हना व सासरे आज पोलिसांत देणार तक्रार
इकडे क्वॉरंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होतो त्यावेळी संजय राऊत झोपले होते का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी विचारलाय. हाथरसच्या घटने प्रकरणी पंतप्रधान गप्प का असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता. त्यावर बोलताना दरेकरांनी प्रती सवाल उपस्थित केलेत. ते जालना दौऱ्यावर असताना बोलत होते. रोह्यात चौदा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला, इकडे क्वॉरंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत. पुण्याला डोंगरात बलात्कार करून मारून टाकलं. तेव्हा काय झोपला होता? राज्यात अराजकता माजलीये त्याच्यावर बोलायला त्यांना वेळ नाही. असा सवाल करत दरेकरांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. हाथरस घटनेचं फक्त राजकारण केलं जातंय याची करणी आणि कथणी वेगळी असल्याचं म्हणत राज्यातच महिला सुरक्षित नसल्याची टीका दरेकरांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मिशन बेगिन आगीन च्या अंतर्गत राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी दिली. या परवानगीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक रेल्वेचे जाळे असलेल्या मध्य रेल्वेने आता तयारीला सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या रेल्वे व्यतिरिक्त शहरांना जोडणाऱ्या प्रमुख रेल्वे चालवण्याचा विचार आता केला जाईल. महाराष्ट्रातील विविध शहरांना मुंबई पर्यंत भरणाऱ्या प्रमुख एक्सप्रेस समावेश असेल असे सांगितले जात आहेत. मुंबई-पुणे दरम्यान डेक्कन एक्सप्रेस सिंहगड एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस प्रगती एक्सप्रेस, मुंबई कोल्हापूर दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई-नागपूर दरम्यान सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई गोंदिया दरम्यान विदर्भ एक्सप्रेस, याप्रमाणे सिद्धेश्वर एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे भुसावळ एक्सप्रेस, पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस या महत्त्वाच्या एक्सप्रेस सुरू करण्याची शक्यता सांगितली जात आहे. ट्रेन सुरू केल्या जातील तशी दाट शक्यता आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं निधन, मुंबईत अखेरचा श्वास घेतला. पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता.
केंद्र सरकारने राज्यांना कोविडसाठी औषध आणि सामुग्रींचा पुरवठा थांबविल्यानंतर आता राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाला मार्च 2021 पर्यंत 633 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्यात 60 लाख अँटीजेन किट्स, 35 लाख आरटीपीसीआर किट्स, 2.4 लाख रिमडिसिव्हीर, 18 लाख पीपीई किट्स, 36 लाख N95 मासक्स आणि 80 लाख ट्रिपल लेयर्ड मासक्स खरेदी करण्यात येणार आहेत.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील, दुधनी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, तथा दुधनी कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे यांचे वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 03 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 02 वाजता राहत्या घरातून निघणार आहे.
धनगर समाज गोलमेज परिषदेमधील तीन ठराव
1) धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नेत्यांनी एकत्र येऊन 'धनगर सारा एक' या भावनेतून काम करावे
2) धनगर समाजाच्या गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढावी यासाठी सर्व नेत्यांनी पुढाकार घ्यावा
3) मेंढपाळाना चोरी करणाऱ्या टोळीचा त्रास होतोय मेंढपाळ व्यवसायाच्या विकासासाठी सरकारकडे मागणी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मनमाड शहरात वाल्मिकी समाजातर्फे पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, महिला सामील झाल्या होत्या. सानप कॉम्प्लेक्सपासून निघालेला हा कँडल मार्च शहरातील प्रमुख मार्गाने जात एकात्मता चौकात समाप्त होऊन तेथे पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात येऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
ठाण्यात शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये लागलेली आग अजूनही सुरूच,
6 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी,
यात मेडिकल आणि कपड्यांच्या दुकानांचा देखील समावेश,
शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये अग्निशमन दलाचे नियम पाळले नसल्याने आग विझवण्यात उशीर
हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनसमोर शिवसेनेची निदर्शनं सुरु
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची गुंडागर्दी,
कारखान्याला जाणाऱ्या मजुरांना अडवून अमानुष मारहाण,
मजुरांच्या गाड्याचीही तोडफोड,
वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर आणि पदाधिकाऱ्यांची दादागिरी
,
मजुरांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल,
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा शब्द मोडल्याने पदाधिकारी आक्रमक,
धारूरच्या घाटातील मध्यरात्रीच्या घटना
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक रहाडे यांच्या कुटुंबाचे छत्रपती संभाजीराजे यांनी फोन करून सांत्वन केले. विवेक रहाडे यांच्या ग्रामस्थांची छत्रपती संभाजीराजेंकडे विवेकचे बलिदान व्यर्थ न जावे ही इच्छा व्यक्त केली. "लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं", मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन, विवेकच्या आत्महत्येने मला खूप दुःख झालं आहे. मी महाराष्ट्र भर फिरतोय जर मी विश्वास देऊ शकलो नाही तर माझा उपयोग काय..? संपूर्ण समाज आणि मी स्वतः ठामपणे विवेकच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा रहाणार आहे, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.उर्वरित पगाराबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
अनिल परब, परिवहन मंत्री
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली येथील कालिंदी कुंज फ्लायओवर वर यूपी पोलिसांनी सोडलं. तिथे दिल्ली पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी सोडले. तर काँग्रेस यूपी प्रदेश अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना पोलीस लाईन नोएडा येथे ठेवण्यात आले आहे.
हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मशाल मार्च. पुण्यातील खंडोजी चौक ते गूडलक चौकापर्यंत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर महिला कार्यकर्ते या मशाल मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित आहे.
कृषी विधेयक विरुद्ध संपूर्ण राज्यात काँग्रेसचे आंदोलन. प्रत्येक मतदारसंघात धरणे आंदोलन होणार.
बाळासाहेब थोरात लालसलगाव, नाशिक
अशोक चव्हाण, नांदेड
राजीव सातव, हिंगोली
यशोमती ठाकूर, अमरावती
पृथ्वीराज चव्हाण आणि अमित देशमुख, मुंबई
विजय वडेट्टीवार, चंद्रपूर
के.सी.पाडवी, नंदुरबार
सतेज पाटील, कोल्हापूर
सुनील केदार, नागपूर
सकाळी दहा पासून आंदोलन सुरू होणार
उत्तर प्रदेशातील हाथरसमधील घटना ही मानवतेला कलंक लावणारी आहे. या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. उद्या हाथरसला जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.
राज्यातील विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित. महाराष्ट्रातील 14 विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या लेखी आश्वासनानंतर संपला स्थगित. सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी राज्यातील विद्यापीठातील कर्मचारी होते संपावर.
काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात योगी सरकार विरोधात आंदोलन होणार आहेत. युवा काँग्रेस संध्याकाळी 6 वाजता आंदोलन सुरुवात करणार आहे. बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, अस्लम शेख, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, झिशन सिद्दकी आणि काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी. मंत्रालयाच्या बाजूला महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी नोएडा डीएनडीवर दाखल, हाथरसला जाण्यापासून दोघांनाही रोखण्याची शक्यता, काँग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, तर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या तिच्या हत्येचे पडसाद औरंगाबादेत पहायला मिळाले. या घटनेचा निषेध करत शहरातील गुलमंडी भागात उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका ही स्त्रियांबद्दल मनुवादी मानसिकतेची असल्याचं ही आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आज पासून खुला करण्यात आला आहे. तब्बल 6 महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुलं होणार असून 18 मार्च पासुन ताडोबा कोरोना मूळे बंद आहे. मात्र कोविड चा अटकाव करण्यासाठी काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ज्या मध्ये एका जिप्सी मध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसवणे, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करण्यात आले आहे तर कोविड सदृश्य लक्षणं आढळल्यास एखाद्या पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे.
मुंबई : पायल घोषच्या आरोपानंतर अनुराग कश्यपला आज वर्सोवा पोलिस स्टेशन येथे स्टेटमेंट नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं असून 10 वाजता बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आहे.
सातारा : काही दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत सापडला असून आज्ञात दांपत्याने अपहरण केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला होता. ओम भगत असे अपहरण करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. सदर घटनेचा पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. साता-यातील काळज येथील घटना.
विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने चार पथके नेमली आहेत. या पथकांनी आजवर चार लाख 36 हजार रुपये दंड वसूल केला आहे.बाजारपेठेतील व्यापारी,फेरीवाले आणि दुचाकी वाहनावरून जाणारे अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले आहे.विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करताना काही नागरिक वाद घालत असल्याचे प्रकार घडत आहेत.वाद घालणाऱ्या विरुद्ध सरळ पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेने चार पथके नेमली आहेत. या पथकांनी आजवर चार लाख 36 हजार रुपये दंड वसूल केला आहे. बाजारपेठेतील व्यापारी, फेरीवाले आणि दुचाकी वाहनावरुन जाणारे अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करताना काही नागरिक वाद घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. वाद घालणाऱ्या विरुद्ध सरळ पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
जालना जिल्हयातील ग्रामसेवक आजपासून बेमुदत संपावर गेलेत. ग्रामसेवकावर आकस भावनेनं दप्तराची क्राॅस तपासणी करणे, शुल्लक कारणासाठी ग्रामसेवकांच्या सुनवण्या ठेवणे आणि ग्रामसेवकांच म्हणणं न ऐकून घेता एकतर्फी कारवाया करण्यामुळं जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसेवक दडपणाखाली आलेत. त्यामुळं ग्रामसेवकांत असंतोष निर्माण झाला असून अनेक ग्रामसेवकांच्या मनात आत्महत्या सारखे विचार येत आहेत. त्यामुळं मुख्याधिकारी निमा अरोरा यांच्या त्रासाला कंटाळून जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसेवक बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात जिल्ह्यातील 730 ग्रामसेवकांचा समावेश आहे. या संपामुळं जिल्ह्यातील पिक पंचनामे, पिकविमा, आपतकालीन व्यवस्था आणि नागरिकांना मिळणारे कागदपत्र यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं जोपर्यंत मुख्याधिकारी यांची बदली होत नाही तोपर्यंत संप असाच सुरु राहणार असल्याचा पवित्रा सर्व ग्रामसेवकांनी घेतलाय.
यंदाच्या पावसाळ्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावांच्या ओढ्याला नाल्याला पाणी आलेले आहे आणि या ओढ्यांच्या पाण्यातून प्रवास करू नये असं वारंवार सांगण्यात येत असताना अनेक जण हे न ऐकता आपला जीव धोक्यात घालत आहेत. परभणीच्या सेलू तालुक्यातील कन्हेरवाडी या गावातील ओढ्यातून दोरीच्या साह्याने एक युवक गावचा ओढा पार करत होता. मात्र पाण्याच्या प्रवाहाने तो पाण्यात आडवा झाला. त्याला उठता येत नव्हते त्यातच वाहून जात होता. मात्र वेळीच एका गावकर्याने त्याला जाऊन उचलले आणि पाण्याच्या प्रवाहा बाहेर काढून वाचवले त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे.
राज्यातील पहिलं पर्यटनस्थळ आजपासून अधिकृतरित्या खुलं,
सात महिन्यानंतर पन्हाळगडाचे दरवाजे आजपासून खुले होणार,
सकाळी 9 ते रात्री 9 या पर्यंत पन्हाळगडावर पर्यटकांना परवानगी,
पन्हाळा नगरपरिषदेचा निर्णय,
शासनाच्या नियम आणि अटींचे पालन करण्याचे नगराध्यक्ष रुपाली धडेल यांचे आवाहन
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज पासून केवळ सकाळच्या एकाच सत्रात घेण्यात येणार आहेत. उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत कर्मचारी,व्यापारी यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत सकाळी साडेआठ पासून कांदा आणलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत लिलाव सुरु ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी बाजार समितीला केली होती.त्यांच्या मागणीनुसार आज पासून एकाच सत्रात लिलाव घेण्यात येणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव आजपासून केवळ सकाळच्या एकाच सत्रात घेण्यात येणार आहे. उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत कोरोनाची लागण कर्मचारी,व्यापारी यांना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत सकाळी साडेआठपासून कांदा आणलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत लिलाव सुरु ठेवण्याची मागणी व्यापा-यांनी बाजार समितीला केली होती. त्यांच्या मागणी नुसार आजपासून एकाच सत्रात लिलाव घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद जळगाव रोडवर मयुरपार्क भागात 106 किलो गांजा पकडला. औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई. 2 महिला 2 पुरुष ताब्यात. इनोव्हा गाडीतून घेऊन जात होते गांजा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दाट धुकं पडायला सुरुवात झाली आहे. सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गाच्या डोंगरदऱ्यातून धुक्याची चादर जिल्ह्यात सर्वत्र पसरलेली असते. त्यामुळे पहाटेच्या वेळी मुंबई गोवा महामार्गावरील वाहनाना दिवे लावून प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यात पहाटेच्या वेळी थंडीचीही चाहूल लागत आहे.
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धुंदलवाडी येथील आकाश हॉटेलवर लुटण्यासाठी आलेल्या अज्ञात तीन जणांकडून गोळीबार करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री 3 वाजता ही घटना घडली असून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तब्बल 1 लाख 10 हजारांची लूट करण्यात आली आहे. गोळीबार करून अज्ञात आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी कासा, तलासरी पोलीस दाखल झाले असून आरोपी गाडी सोडून पळून गेल्याने शोध सुरु आहे.
सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचा भार बेस्ट बसेसवर येत आहे. प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अखेर एसटी महामंडळाच्या 1000 बसेस बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
लोकलचा प्रवासी बेस्ट बसेसकडे वळत असल्याने बेस्ट परिवहन विभागावर ताण येत आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 3560 बसेस आहेत. त्यापैकी प्रवाशांच्या सेवेत रोज तीन हजारांच्या आसपास बसेस धावत आहेत. तर प्रवासी संख्या 16 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे बेस्ट बसेसवर प्रवाशांचा वाढता लोड पहाता बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर बसेसची मागणी केली होती.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या शिवशक्ती ऑक्सिलेट या कंपनीला मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागलीय शॉर्ट सर्किट होऊन मिश्रित केमिकला आग लागली होती ही आग विझविण्यासाठी कुरकुंभ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या,बारामती MIDC ची एक गाडी, पुणे महानगरपालिका दौंड नगरपालिका अशा एकूण पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाचे शर्तीचे प्रयन्त सुरू होते आग सध्या आटोक्यात आली कंपनीत काम करणाऱ्या 12 कामगारांना बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी नाही मात्र संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे वेगवेगळ्या केमिकलचे विघटन करण्याची प्रक्रिया कंपनी केली जात होती. सध्या आग आटोक्यात आली असून रात्रीच्या वेळी आग लागल्याने परिसरात मध्ये दूरचे लोट बाहेर पडत होते.
केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेस करणार आंदोलन, 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यभर होणार आंदोलन, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लासलगाव बाजार समितीमधून करणार आंदोलन
आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्राच्या कृषी विधेयकावर चर्चा करण्यात आली. कृषी विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही समिती शेतकरी, कामगार इत्यादी संघटनांशी या विधेयकाबाबत चर्चा करून निर्णय घेणार
मथुरा प्रकरणी दाखल याचिका कोर्टाने फेटाळली. श्रीकृष्ण जन्मूभूमी ट्रस्टला जमीन हस्तांतरणासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज बिहार निवडणुकीसाठी भाजपाचे निवडणूक प्रभारी म्हणून अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. भाजपा नेते भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केली.
चंद्रपूर शहरालगत दाताळा परिसरातील 'सिनर्जी वर्ल्ड' वसाहत परिसरात युवकाची निर्घृण हत्या, मनोज अधिकारी (40) असे मृतकाचे नाव, चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प वसाहतीत 2 टोळ्यांच्या जुन्या वादातून गेली काही वर्षे सुरू संघर्ष आहे. मनोज याची हत्या काही युवकांनी याच पार्श्वभूमीवर कुऱ्हाडीचे वार करून केल्याची माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, खुनाच्या घटनेनंतर बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती
चंद्रपूर शहरालगत दाताळा परिसरातील 'सिनर्जी वर्ल्ड' वसाहत परिसरात युवकाची निर्घृण हत्या, मनोज अधिकारी (40) असे मृतकाचे नाव, चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प वसाहतीत 2 टोळ्यांच्या जुन्या वादातून गेली काही वर्षे सुरू संघर्ष आहे. मनोज याची हत्या काही युवकांनी याच पार्श्वभूमीवर कुऱ्हाडीचे वार करून केल्याची माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, खुनाच्या घटनेनंतर बंगाली कॅम्प परिसरात तणावाची स्थिती
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात नुकतीच सोयाबीन कापणीला सुरुवात झाली असून, कामाने नुकताच वेग पकडला असताना आज जिल्ह्यातील काही भागात एक तास जोरदार पाऊस बरसला त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस झालेल्या भागात कामांना ब्रेक लागला आहे. व शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.
अकोल्यात आज कोरोनामुळे तब्बल सहा रूग्णांचा मृत्यू. जिल्ह्यातील मृतांची संख्या पोहोचली 235 वर. आज आढळलेत 60 नवे रूग्ण. जिल्ह्याची रूग्णसंख्या पोहोचली 7440 वर. आतापर्यंत 5679 रूग्ण झालेत रोगमुक्त. सध्या 1516 रूग्णांवर उपचार सुरू.
वादग्रस्त कृषी विधेयकाची महाराष्ट्र सरकारने काढलेली अधिसूचना अखेरीस स्थगित करण्यात आली. काँग्रेसने अधिसूचना स्थगित केली नाहीतर कॅबिनेटला अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला होता. 10 ऑगस्ट रोजी काढलेल्या अधिसूचना स्थगित करण्याबाबत 16 सप्टेंबर रोजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पणन सचिवांना पत्र देखील लिहिले होते. तरीही स्थगिती देण्यात आली नव्हती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 27 सप्टेंबरला या अधिसूचनेला स्थगिती देण्याबाबत पणन मंत्र्यांना पत्र लिहिले. तरी त्यावर कारवाई करत नसल्याने काँग्रेसने या अधिसूचनेला स्थगिती न दिल्याने कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहण्याचा इशारा दिला. त्यानंतर आज अधिसूचना स्थगित करण्यात आली. या प्रकरणी पुन्हा एकदा प्रशासन आणि सरकार यांच्यातील मतभेद समोर आले.
कल्याणच्या मलंगगडावर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळला आहे. मलंगगडाच्या पहिल्या दर्ग्याजवळ मंगळवारी रात्री हा बिबट्या वावरताना आढळून आला. रात्री दहाच्या सुमारास बिबट्या या परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला. यापूर्वीही अनेकदा मलंगगड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळला असून हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात या भागात येत असल्याची शक्यता आहे. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीच ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितलं असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
प्रारूप किनारा व्यवस्थापण आराखडा जनसुनावणी विरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक . जनसूनवणीस आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर नागरिकांच आंदोलन . जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने स्थानिकांचा विरोध . स्थानिकांचा विरोध डावळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने जनसुनावणी होणार असल्याचा स्थानिकांचा आरोप . जनसुनावणी असलेल्या दांडेकर महाविद्यालयाच्या गेट वर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना रोखलं.
ठाणे शहरातील वर्तक नगर येथे असलेल्या सर्वात मोठ्या रेमंडस कंपनीच्या आवारात आज सकाळी भीषण आग लागली आहे. ही आग रेमंड कंपनीच्या एका ऑफिसला लागली असून हे ऑफिस एक मजली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार ही आग सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली. आगीमध्ये या ऑफिसमध्ये असलेले सर्व सामान जळून भस्म झाले आहे. अजूनही आग विझली नाही मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या ठिकाणी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि 5 वॉटर टँकर असून पोलीस देखील हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ठाण्यातील वर्तक नगर येथील रेमंड कंपनीच्या कार्यालयाला सकाळी 5.30 च्या सुमारास आग, घटना स्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 5 पाण्याचे टँकर आणि पोलीस हजर, काही प्रमाणात आगीवर नियंत्रण, आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही,
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा, याआधी निर्माते बी पी सिंग हे एफटीआयआयचे अध्यक्ष होते
दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांची एफटीआयआयचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा, याआधी निर्माते बी पी सिंग हे एफटीआयआयचे अध्यक्ष होते
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी देण्याबाबत परिपत्रक जारी
नाशिक : मालेगावच्या तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल, शरीफ गणी शेख या तलाठीवर गुन्हा दाखल करून अटक, 17 हजार 250 रुपयांची लाच प्रकरणी केली कारवाई, 7/12 उताऱ्यावर औद्योगिक वापरासाठी अशी नोंद करण्यासाठी केली होती लाचेची मागणी, लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडलकला लाचखोर तलाठी, 16 सप्टेंबर ला केली होती लाचेची मागणी आज झाला गुन्हा दाखल
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील हॉटेल्सी , डायनिंग हॉल आणि परमिट रूम सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्यानंतर लगेच हॉटेल्स सुरु करण्यासाठी हॉटेल चालकांची लगबग सुरु झालीय . मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेल्समध्ये स्वच्छता आणि स्यानिटायझेशनचे काम हाती घेण्यात आलंय . हॉटेल्स सुरु करताना सरकारने काही बंधनं घातली असली तरी त्या बंधनांसह हॉटेल सुरु करण्याच्या निर्णयाचं हॉटेल चालकांनी स्वागत केलंय. बॅचरल लाईफ जगणाऱ्या किँवा एकटे राहणाऱ्यांनीही हॉटेल आणि डायनिंग हॉल सुरु करण्याच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. तर दुसरीकीड़े काहींनी कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना हॉटेल्स सुरु करणं कितपत बरोबर आहे असा सवालही उपस्थित केलाय.
माढा तालुक्यातील बबनराव शिंदे साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांचे कर्ज परस्पर लाटल्याचा आरोप करण्यात येतोय. मोहोळ तालुक्यातील नरखेड आणि इतर काही गावातील शेतकऱ्यांना ज्यावेळी बँकेतर्फे नोटीसा पाठवण्यात आल्या, त्यावेळी हा सगळा प्रकार समोर आला आहे. बार्शीतल्या बँक ऑफ इंडियामधून जवळपास 700 शेतकऱ्यांच्या नावाने 17 कोटी रुपयांचे बोगस प्रकरणे दाखल करून कर्ज लाटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदर कारखान्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. शेतकऱ्यांनी वेळेवर पीक कर्ज मिळत नाही, इथं मात्र शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये लाटले जात आहेत. अशी टीका स्वाभिमानी शेतकऱी संघटनेच्या विजय रणदिवे यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे बँकेत खातेच नाही, अशा शेतकऱ्यांच्या नावाने नवीन खाते उघडून त्याच दिवशी लाखो रुपयांची कर्ज त्यांच्या नावे वितरीत करण्यात आली आहेत. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, कागदपत्रांवर बोगस स्वाक्षऱ्याकरुन पैसे उचललेल्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "रामदास आठवले यांचा एक तरी आमदार निवडून आलाय का? त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही, असं ते म्हणाले. तसंच माझ्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी पूर्वीच भाजप नेत्यांच्या मुलाखती घेणार असं सांगितलं होतं, त्यामुळे यात राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी राऊत-फडणवीस भेटीवर दिली. तसंच सुशांत प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास दिला पण त्यांनी काय दिवे लावले आपण पाहतोच आहोत, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "रामदास आठवले यांचा एक तरी आमदार निवडून आलाय का? त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही, असं ते म्हणाले. तसंच माझ्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी पूर्वीच भाजप नेत्यांच्या मुलाखती घेणार असं सांगितलं होतं, त्यामुळे यात राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी राऊत-फडणवीस भेटीवर दिली. तसंच सुशांत प्रकरणी केंद्राने सीबीआयकडे तपास दिला पण त्यांनी काय दिवे लावले आपण पाहतोच आहोत, असंही ते म्हणाले.
केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर इतरांसाठीही लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना
ओबीसी नेत्यांनी आज मुंबईत छत्रपती संभाजीराजें भेट घेतली. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये. आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सर्वांनी मराठा आरक्षणाला सहकार्य करावे असं संभाजीराजे म्हणाले. ओबीसी समाजाच्या ज्या चिंता आहेत त्या ऐकून घेण्याची विनंती हरिभाऊ राठोड यांनी केली. संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाजसोबत सहकार्याची भावना घेऊन मदत करेल असाही शब्द त्यांनी दिला. त्यांच्यासोबत मुस्लीम, ओबीसी समाजाचे अध्यक्ष युनूस मणियार, बाराबलुतेदार संघटना आणि कुंभार समाजाचे नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांनी ही भावना व्यक्त केली की, राजर्षी शाहूंच्या वारसदाराने आमची भूमिका समजून घेतली. संभाजीराजेंनी जी मराठा आरक्षण मागत असताना बहुजन समाजाच्या एकीसाठीची सर्व समावेशी भूमिका घेतली आहे त्यासोबत आम्ही आहोत, असे विधान मुस्लिम ओबीसी नेते युनूस मणियार यांनी सांगितले.
एका बाजूला बड्या बड्या उद्योगपती ची कर्जे केंद्र सरकार माफ करीत असताना कोरोनाच्या संकटात भांडवल बुडालेल्या महिलाची कर्जे का माफ होत नाहीत असा सवाल करीत आज पंढरपुर मध्ये शेकडो महिलांनी महामोर्चा काढत एल्गार पुकारला . मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली बचत गटांच्या शेकडो महिलांनी शिवाजी चौकातून पंढरपूर तहसील कार्यालयावर हा विराट मोर्चा काढला.
सुधारित सीईटी वेळापत्रक : एलएलबी (पाच वर्षे) - ११ ऑक्टोबर, एलएलबी (तीन वर्षे) - २ आणि ३ नोव्हेंबर, बीए/ बीएस्सी, बीएड इंटिग्रेटेड - १८ ऑक्टोबर, बीएड/एमएड सीईटी - २७ ऑक्टोबर, एमपीएड सीईटी - २९ ऑक्टोबर, बीपीएड - ४ नोव्हेंबर, फिल्ड टेस्ट ५ ते ८ नोव्हेंबर, एमएड - ५ नोव्हेंबर, एम-आर्च सीईटी - २७ ऑक्टोबर, एम- एचएमसीटी - २७ ऑक्टोबर, एमसीए - १० ऑक्टोबर -- २८ ऑक्टोबर, बी-एचएमसीटी - १० ऑक्टोबर
राज्यातील सीईटी परीक्षा पुढे ढकलल्या, अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान सीईटी परीक्षा येत असल्याने आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलच्या वतीने ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा एकाच वेळी होत असल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात येत होती. आता या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. आता या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात न होता, तारखांमध्ये पुन्हा बदल केल्याचे परिपत्रक सीईटी सेलने जारी केले आहे.
सांगली : महापालिकेच्या आदीसागर कोविड सेन्टर मधून 85 वर्षीय आजींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बरे झालेल्या आजींना आदीसागरच्या स्टाफकडून टाळ्या वाजवत घरी सोडण्यात आले. सांगलीतील या 85 वर्षीय आजी 19 सप्टेंबर रोजी महापालिकेच्या आदीसागर कोविड सेंटर मध्ये दाखल झाल्या होत्या. दाखल करतेवेळी त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झाले होते. आठ दिवस यशस्वी उपचार केल्यानंतर रविवारी सायंकाळी 85 वर्षीय आजीला डिशचार्ज देण्यात आला. यावेळी आदीसागरमधील सर्वच स्टाफकडून टाळ्या वाजवत कोरोनावर मात करून बऱ्या झालेल्या 85 वर्षीय आजींना प्रोत्साहन दिले.
वाशिम : समृद्धी महामार्ग निर्मिती दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे शेत जमीन अधिग्रहण करण्यात आली, मात्र शेतात जाण्या साठी किंवा रस्ता निर्मिती दरम्यान शेतातील पाणी रस्त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचं नुकसान होत आहे. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे. झालेली नुकसानभरपाई कंत्राटदार आणि प्रशासनाने द्यावी या मागणीसाठी कारंजा उपविभागीय कार्यालय समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सह शेतकऱ्यांनी आंदोलन करत निवेदन दिलं आहे.
वाशिम : समृद्धी महामार्ग निर्मिती दरम्यान अनेक शेतकऱ्यांचे शेत जमीन अधिग्रहण करण्यात आली, मात्र शेतात जाण्या साठी किंवा रस्ता निर्मिती दरम्यान शेतातील पाणी रस्त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचं नुकसान होत आहे. यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे. झालेली नुकसानभरपाई कंत्राटदार आणि प्रशासनाने द्यावी या मागणीसाठी कारंजा उपविभागीय कार्यालय समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सह शेतकऱ्यांनी आंदोलन करत निवेदन दिलं आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातल्या बोटजवळगा गावातील मुलाने शेतमजुरी करुन मोबाईल विकत घेतला आहे. प्रेम दत्तू गायकवाड हा मुलगा आठवीत शिकत आहे. परंतु त्याला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता. म्हणून तो सध्या सोयाबीन काढायच्या कामाला जाऊन ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेतला आहे. एकीकडे तो काम करत करत दुसरीकडे अभ्यास सुद्धा करत आहे.
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातल्या बोटजवळगा गावातील मुलाने शेतमजुरी करुन मोबाईल विकत घेतला आहे. प्रेम दत्तू गायकवाड हा मुलगा आठवीत शिकत आहे. परंतु त्याला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता. म्हणून तो सध्या सोयाबीन काढायच्या कामाला जाऊन ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेतला आहे. एकीकडे तो काम करत करत दुसरीकडे अभ्यास सुद्धा करत आहे.
महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणूक ही खरंतर कुणालाच नको असते. कारण एक निवडणूक लढणं पक्षाला काय आणि उमेदवाराला काय अवघडच असतं. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
गुजरातच्या बामणपुरा येथे बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून बरेच लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील बड्या रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी लूटमारीची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून गंभीर दखल,
गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्यांना आणि वाढीव बिल आकारणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांच्या विधानसभा अध्यक्षांनी मागवला अहवाल
पृथ्वीराज चव्हाण : आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना कृषी विधेयकाला विरोध करणारं निवेदन दिलं.
तीन कृषी विषयक विधेयक केंद्राने घाई गडबडीत पास केलं आणि लोकशाहीचा गळा घोटला. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक. सर्व फायदा फक्त कॉर्पोरेट मित्रांना व्हावा यासाठी पारीत करण्यात आली. संसदीय समितीकडे संशोधनासाठी विधेयक पाठवा असा आमचा आग्रह होता. किमानपक्षी भाजपने मित्रपक्ष असलेल्या अकाली दलशी यापूर्वी चर्चा करायला हवी होती. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली पाहिजे होती.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं मोदी सरकार म्हणत होतं ऑन कृषी अर्थ व्यवस्था २ ते ३ टक्क्यांनी वाढलं. निव्वळ फसवणूक केली आहे.
हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी केली. राज्यपालांनी चांगली आणि खुल्या दिलाने चर्चा केली. याबाबत केंद्राशी चर्चा करू असं आश्वासन राज्यपालांनी दिलं आहे.
या कृषी विधेयकावर महाविकास आघाडी सरकारच्या सहमतीबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल.
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमा निमित्ताने दि. १५,१६, १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौ-यावर होत्या. या दरम्यान त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉजीटीव आला होता.
पंढरपूर- भागवतार्च वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन, माजी नगराध्यक्ष, मंदिर समिती सदस्य वासुदेव नारायण उत्पात यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन, समस्त उत्पात समाजाचे चेअरमन, सावरकर भक्त म्हणून त्यांची ओळख
मुंबईतील बड्या रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी लूटमारीची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून गंभीर दखल, गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्यांना आणि वाढीव बिल आकारणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांच्या विधानसभा अध्यक्षांनी मागवला अहवाल, विधानभवनात धर्मदाय आयुक्तबरोबर पार पडली बैठक, आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश, महात्मा फुले आरोग्य योजना योग्य रित्या राबवण्यासाठी नियमात बदल करण्याचा सूचना, जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा यासाठी प्रयत्न, महाराष्ट्रात एकूण 435 धर्मदाय रुग्णालय आहेत, या रुग्णालयातील गरिबांसाठी राखीव असलेल्या बेडची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी तसेच मोबाईल अॅप निर्मितीबाबत अध्यक्षांनी दिल्या सूचना
कोल्हापूर शहरात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिकेची मोठी कारवाई,
केवळ सात दिवसात 30 लाख 71 हजारांचा दंड कोल्हापूर शहरातून वसूल,
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची माहिती,
शहरात नो मास्क नो एन्ट्री ची मोहीम गतिमान,
मास्क न वापरणे, सोशल डिस्टसिंग न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकने यांच्यावर कारवाई
जाचक अटी रद्द करुन सरसकट सर्व कोरोनाग्रस्त पोलिसांनाही विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. अटींमुळे पोलीस विमा संरक्षणापासून वंचित राहितील आणि त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे पोलिसांवर लावलेल्या जाचक अटी तातडीने काढव्यात, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
सांगली - कोरोना रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या , धारदार शस्त्रांनी गळा कापून घेत केली आत्महत्या , मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील घटना , नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी
सांगली - कोरोना रुग्णाची रुग्णालयात आत्महत्या , धारदार शस्त्रांनी गळा कापून घेत केली आत्महत्या , मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील घटना , नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी
ड्रग्ज प्रकरणात एकीकडे बॉलिवूड आणि सेलिब्रिटींच्या चौकशीचं सत्र सुरु आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये सिनेक्षेत्रातील अनेक नावे पुढे येत आहेत, मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका सहकलाकार महिलेला अटक केली आहे. या महिलेने तिच्या पतीसोबत मिळून पंजाबमध्ये थेट आयपीएस पदावर नियुक्ती मिळवून देतो असे सांगून तब्बल चार कोटी रुपये उकळले होते. हा गंभीर गुन्हा पंजाबमध्ये केल्यानंतर आरोपी महिला आणि तिचा पती मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात लपून बसले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि पंजाब पोलिसांना त्यांची कस्टडी दिली. आरोपी महिला ही स्टार प्लस या वाहिनीवरच्या काव्यांजली या मालिकेत काम करत होती, अस समोर आलं आहे. सपना पुनीत रल्हान आणि पुनीत कृष्णा कुमार रल्हान अस या दोन्ही आरोपींची नावे आहेत. मालिकेत काम करत असल्याचा फायदा घेऊन आपली वरपर्यंत ओळख असल्याचे भासवून त्यांनी हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे.
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी औरंगाबाद एसटी महामंडळाच्या जादा बसेस.1 ते20 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी ज्यादा बसेस. बीड, परभणी ,जालना, बुलढाणा यासह इतर विभागांतून औरंगाबादला विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय.
मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोना, मागील आठवड्यात मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते, मुख्य सचिव अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली, दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता, आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत झाली चर्चा , रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसगट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, त्याच बरोबर मराठा आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी आज हिंगोलीच्या शेनगाव तहसील कार्यालयासमोर मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो मराठा शिवसैनिक उपस्थित होते. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा संपन्न झाला.
राजकारण गेलं चुलीत म्हणत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आमच्या गावात येऊ नये, अशा आशयाचे बॅनर पैठण तालुक्यातील काही गावात लावण्यात आले आहेत. बॅनर लावून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. औरंगाबाद पैठण रोडवरील ढोरकीन फाट्यावर ही असाच एक बॅनर लावण्यात आला आहे. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हे त्यांचं लक्ष, असंही या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
गडचिरोली : गडचिरोली शहरात नंतर आता दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या अहेरी आणि आलापल्ली शहरात 7 दिवस जनता कर्फ्युच व्यापारी संघटनेचा आवाहन केलं आहे. 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत मेडिकल आणि दवाखाने वगळता इतर दुकाने राहणार बंद राहणार आहेत. दोन्ही शहरांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या जिल्ह्यात 642 रुग्ण अॅक्टिव्ह असून 2514 आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यापैकी 1852 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अहेरी-आलापल्ली शहरात 63 रुग्ण ऍक्टिव्ह आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले जवळील निवती समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात 100 किलोचं समुद्री कासव अडकलं. ग्रीन सी प्रजातीचे नर समुद्री कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलं होतं. मात्र मच्छीमारांनी या ग्रीन सी जातीच्या कासवाची जाळ कापून जाळ्यातून सुटका सुखरूप समुद्रात सोडलं. मासेमारीसाठी नेलेल जाळ मच्छीमारांना यासाठी जाळ कापाव लागलं. जाळ्यात अडकलेल्या संरक्षित सागरी जीवांना वाचवून पुन्हा समुद्रात सोडलं तर नुकसान झालेल्या जाळ्यांचे पैसे मच्छीमारांना दिले जातात. मच्छ विभाग व कांदळवन विभागाकडून मच्छीमारांना जाळ्याची झालेली नुकसान भरपाई दिली जाते.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रिक्षांचा संप, 1 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा संप, रिक्षा संघटनांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने संप, लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल, विम्याचा परतावा न मिळाल्याने आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने संपाची हाक
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रिक्षांचा संप, 1 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा संप, रिक्षा संघटनांच्या कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने संप, लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांचे मोठे हाल, विम्याचा परतावा न मिळाल्याने आणि राज्य सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने संपाची हाक
नागपूर :शनिवारी संध्याकाळी भोळे पेट्रोल पंप चौकावर भर रस्त्यात हत्या झालेल्या किशोर उर्फ बाल्या बिनेकरची अंत्ययात्रा काल संध्याकाळी त्याच्या शांतीनगर परिसरातील घरातून निघाली. कोरोना असतानाही हजारो लोक त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. अनेकांनी मास्कही लावले नव्हते. पोलिसांनी या हत्या प्रकरणात आतापर्यंत चेतन हजारे या मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे. तर एक आरोपी अजून फरार आहे.
मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस शिपाई आणि एका रिक्षाचालकावर लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच पोलीस स्टेशनमधील निलंबित पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन या महिलेने ही खोटी तक्रार दाखल केली होती. या महिनेले याच पोलीस ठाण्यात तिच्यावर आणि तिच्या अकरा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि धमकवल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र ही तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झाल्याने या महिलेवर तसेच तिला हे करण्यास सांगणाऱ्या घाटकोपर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक युसुफ शेखवर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या 29 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी कांजूरमार्ग पोलिसांकडे हा तपास दिला होता. मात्र या तपासात या महिलेने केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. महिलेने जेव्हा गुन्हा घडल्याची वेळ सांगितली तेव्हा यातील एक पोलीस शिपाई उत्तर प्रदेशात एका गुन्ह्याची उकल करण्यास गेले होते. तर दुसरे हे पोलीस ठाण्यात हजर होते तर रिक्षाचालक त्याच्या साकीनाका येथील घरी झोपला होता. यामागे घाटकोपर पोलीस ठाण्यातील काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आलेल्या युसूफ शेख या पोलीस उपनिरीक्षकाचा हात असल्याचे समोर आले आहे. आपल्या निलंबनामागे या दोन पोलीस शिपायांचा हात असल्याचे युसूफ शेखला वाटत होते, म्हणून त्याने या महिलेशी संगनमत करुन हा कट रचत. या पोलीस शिपाई आणि घाटकोपर पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या घाटकोपर पोलीस युसूफ शेखचा शोध घेत आहेत.
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने भाजी वर्गीय पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक कमी झाल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. भाज्यांच्या दराचा विचार केला तर किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर या शंभर रुपयांच्या वर जाऊन पोहोचल्या आहेत तर गवार, टोमॅटो 80, शेवगा 100, गिळके दोडके गिलके 70, पट्टाकोबी 60, भेंडी 40, बटाटे 40 रुपये प्रतिकिलो दराने किरकोळ बाजारात विकले जात आहेत. वाढलेल्या या भाज्यांचे दर नोकरदार वर्गाला परवडणारे असले तरी सर्वसामान्य माणसाला मात्र परवडणारे नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज भाजीपाल्याच्या किंमती कडाडल्या आहेत. सततच्या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याने भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. कधी नव्हे ते पालक, मेथी, मिरची, टोमॅटो दुपटीपेक्षा जास्त दराने आज मार्केटमध्ये विकले जात आहे. मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्येही हीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना आता भाज्यांचे भाव कडाडल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहक दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये
Unlock 5 | पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी; हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरु होणार
राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
काय आहे अनलॉक 5 मध्ये?
- अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी
- राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
- डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
- मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या
- पुणे विभागातील लोकलवट्रेन सुरू होणार
काय बंद राहणार?
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क
Unlock 5 Guidelines Released : केंद्राकडून शाळा, चित्रपटगृह, स्विमींग पूल सुरू करण्यास परवानगी, मात्र..
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. मात्र, थिएटरमध्ये 50 टक्केचं प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. सोबतचं खेळाडूंसाठी स्विमिंग पूल उघडण्यास देखील केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे, की 15 ऑक्टोबरनंतर शाळा आणि कोचिंग संस्था उघडण्याबाबत राज्य सरकारे निर्णय घेऊ शकता. मार्च महिन्यापासून शाळा, चित्रपटगृह बंद आहेत. आता त्यांना उघडण्यास परवानगी दिली आहे. 15 ऑक्टोबर कंपन्यांच्या स्तरावर आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम घेण्यास गृहमंत्रालयाने संमती दिली आहे. यासाठी मानक संचालन प्रक्रिया व्यावसायिक विभाग लवकरचं नियमावली जाहीर करणार आहे.
देशात महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7 टक्के वाढ
सरकारच्या एका ताज्या आकडेवारीनुसार 2019 साली भारतात दर दिवशी सरासरी 79 खूनाची प्रकरणे घडतात तर अपहरणासंबंधीत घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी 66 टक्के गुन्हे ही बालकांशी संबंधीत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2019 साली खूनाची एकूण 28,918 प्रकरणे नोंदली गेली. 2018 (29,017) सालच्या तुलनेत हा दर 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. सर्वाधिक म्हणजे 9,516 खूनाची प्रकरणे ही 'वाद' या कारणामुळे घडली तर 3,833 प्रकरणात 'वैयक्तीक शत्रुत्व' हे कारण होते. 2,573 खूनाची प्रकरणे ही कशाच्यातरी लाभाच्या लालसेतून घडली आहेत. या नव्या आकडेवारीतून देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून आले आहे. 2019 साली महिलांसंबंधी 4,05, 861 गुन्हे नोंदवण्यात आली होती जी 2018 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त असल्याचं दिसून आलंय. तर दरदिवशी बलात्काराच्या सरासरी 87 गुन्ह्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती या आकडेवारीतून समोर आली आहे. 2019 साली एकूण 32,033 गुन्हे बलात्कारासंबंधी नोंद झाली आहेत. यात राजस्थान प्रथम तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवेक कल्याण रहाडे असं या 18 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने 15 दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.