एक्स्प्लोर
Advertisement
नागपूरमध्ये प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर: नागपूरमध्ये प्रेमी युगुलानं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपीका सिंह आणि सोनू शेख अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.
काल हे दोघेही बाहेरुन घरी आल्यानंतर दीपिकाच्या खोलीत बोलत बसले होते. मात्र, बराच वेळ झाल्यानंतर दोघांचाही आवाज न आल्यानं दिपीकाच्या आईनं खोलीत डोकावून पाहिलं, त्यानंतर दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं.
याबाबत तात्काळ पोलिसांनी माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन संपूर्ण घराची तपासणी केली. पण त्यांना कुठेही सुसाईड नोट सापडली नाही.
दोघांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता का? याचीही पोलीस सध्या चौकशी करत आहेत. तसेच यामागे काही घातपात तर नाही ना? याचाही पोलीस तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement