एक्स्प्लोर

Lockdown | परभणीत एका दिवसात बोगस 700 शिधापत्रिका वाटल्याचा शिवसेना खासदाराचा आरोप

परभणीत एका दिवसात 700 बोगस शिधापत्रिकांचं वाटप केल्याचा आरोप शिवसेना खासदाराने केला आहे. या प्रकरणी तहसीलदारांचं निलंबन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

परभणी : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत  असल्याने त्यांना दोन वेळचे अन्नधान्य देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. दुसरीकडे मात्र परभणीत चक्क एका नगरसेवकाच्या मुलाने तहसीलमध्ये बसून तब्बल 700 बोगस शिधापत्रिका तयार करुन घेत धान्य वाटप करण्याचा प्रकार परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उघडकीस आणला. खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी तहसीलदारांची तक्रार थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

परभणी तहसील कार्यालयात काल (24 एप्रिल) रात्री बसून एका नगरसेवकाच्या पुत्राने त्यांच्या प्रभागातील आणि इतर परिसरातील तब्बल 700 जणांच्या नावाने शिधापत्रिका तयार करुन घेत असल्याची बाब खासदार संजय जाधव यांना समजली. त्यावेळी खासदारांनी त्याचे फोटो आणि माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवत तात्काळ याची चौकशी करण्याची मागणी केली. अशा आपत्कालीन परिस्थितीत तहसीलमध्ये गैरप्रकार होत असतील तर सामान्य नागरिकांनी जायचे कुणाकडे असा सवाल त्यांनी विचारला. तसंच तहसीलदार विद्याचरण कडावकर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे परभणी तहसील कार्यालयात आपत्ती निवारण्याचे काम सुरु आहे की गैरप्रकार करण्याचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Lockdown | परभणीत एका दिवसात बोगस 700 शिधापत्रिका वाटल्याचा शिवसेना खासदाराचा आरोप

तक्रार आल्याने चौकशी सुरु केली : जिल्हाधिकारी मुगळीकर याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी माझ्याकडे तक्रार आली असून त्याची चौकशी सुरु केली असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.

कुठलाही गैरप्रकार झाला नाही : तहसीलदार कडावकर परभणी तहसील कार्यालयात कुठल्याही प्रकारच्या बोगस शिधा पत्रिका आम्ही दिल्या नाहीत. हा सर्व गैरसमज करण्यात आला असून माझ्याविरोधात हे षडयंत्र असल्याचे प्रतिक्रिया परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी फोनवरुन दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Jain Muni Nileshchandra : कबुतरांवरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील राजकारणासाठी उपयोग'; राम कदमांचा दावा खोटा असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र भडकले, म्हणाले, पुरावे द्या!
कबुतरांवरून राजकारण होत होतं, पण आता आईचा देखील राजकारणासाठी उपयोग'; राम कदमांचा दावा खोटा असल्याचे सांगत जैन मुनी निलेशचंद्र भडकले, म्हणाले, पुरावे द्या!

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
Embed widget