नागपूर : दोन-तीन दिवसात देशभरातील कोरोना क्लस्टर्समध्ये रॅपिड अँटी बॉडी टेस्टिंगला सुरुवात होणार आहे. त्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य खात्याचे प्रवक्ते लव अग्रवाल यांनी दिली. तब्लिग जमातील्या लोकांनी देशभर प्रवास केल्यानंतर कोरोनाच्या केसेसमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3819 वर आहे. तर 106 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हाच आकडा 690 इतका आहे. तर आतापर्यंत 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.


महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 387 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि सांगलीचा नंबर आहे. त्यामुळे या चार क्लस्टरमध्ये संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठीची किट देशात उपलब्ध नव्हती. मात्र केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार चीन, अमेरिका आणि साऊथ कोरियातून 5 लाख किट मागवली आहेत. ती गुरुवारपासून (9 एप्रिल) देशातल्या महत्त्वाच्या कोरोना क्लस्टर जिल्ह्यांमध्ये पाठवली जाणार आहे.

कोरोनाची चाचणी आणि रॅपिड अँटी बॉडी टेस्टमध्ये काय फरक..?

  • कोविड 19 ची सध्याची टेस्ट आहे त्याला PCR (polymerase chain reaction) म्हणतात. त्यासाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. त्याचा रिझल्ट येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात.

  • रॅपिड अँटी बॉडी टेस्टही केवळ 15 मिनिटात रिझल्ट देते आणि त्यासाठी फक्त रक्ताचे नमुने तपासावे लागतात.


रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची का आहे ?

  • महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा यासह इतर राज्यांनी रॅपिड अँटी बॉडी टेस्टसाठी ICMR कडे परवानगी मागितली होती.

  • वरळी, धारावी, पुणे, सांगली यासारख्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं टेस्टिंगचं प्रमाण वाढलं तर ज्यांना कोरोनाची लागण आहे, मात्र लक्षणं दिसत नाहीत अशा रुग्णांना शोधणं सोपं जाईल.

  • कम्युनिटी स्प्रेडिंग रोखण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट असेल. जिथं कोरोनाचा धोका अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही किट्स पाठवली जातील


रॅपिड अँटी बॉडी टेस्टला किती खर्च येतो..?

  • रॅपिड अँटी बॉडी किट्सची किंमत ही 2 हजार ते 3 हजार रुपये असेल.

  • सध्या बंगळूरूच्या एका कंपनीनंही अशा प्रकारचं किट बनवल्याचा दावा केला आहे. त्याचं प्रमाणीकरण सुरू आहे.


 

Rapid Corona Test Kit | पाच मिनिटात रिझल्ट देणारं रॅपिड किट नेमकं कसं काम करतं? स्पेशल रिपोर्ट



संबंधित बातम्या :