ठाणे : कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असला तरीही डोंबिवलीकर अजूनही लॉकडाऊनचं पालन करत नसल्याची खंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. त्यामुळे डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण 28 वरुन 2800 व्हायला वेळ लागणार नसल्याचेही ते म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावर खंत व्यक्त केली.




डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज हा आकडा 28 वर गेला आहे. मात्र, तरीही डोंबिवलीकर लॉकडाऊनचं पालन न करता सर्रासपणे रस्त्यावर फिरतायत. त्यामुळे 28 चे 2800 व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डोंबिवलीकरांनी जबाबदारीने वागण्याची गरज असूनही डोंबिवलीकर मात्र आयसोलेशन वॉर्डमधून पळून जातात. हे अतिशय बेजबाबदार वर्तन असल्याचं सांगत खासदार शिंदे यांनी डोंबिवलीकरांचे कान टोचले. सोबतच प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करत असताना तुम्ही पुढचे किमान आठ दिवस तरी घराबाहेर पडू नका, असं हात जोडून भावनिक आवाहन खासदार शिंदे यांनी केलं. त्यामुळं आता तरी सुज्ञ डोंबिवलीकर कोरोनाला गांभीर्याने घेतात का? हे पाहावं लागणार आहे.


Coronavirus | राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर


राज्यात कोरोनाचा आकडा वाढला
आज राज्यात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी आठजण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. कोरोनामुळेमुराज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 16008 नमुन्यांपैकी 14837 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 748 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 56 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 46586 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 3122 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


#Coronavirus | कोरोनाबाबत पंतप्रधान मोदींची सोनिया गांधींसह अनेक विरोधा पक्षातील नेत्यांसोबत खलबतं