लातूर : लातूरकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. लातूरमध्ये आलेल्या बारा यात्रेकरुंना लॉकडाऊनमध्ये प्रवास करताना अडविण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले होते. गेल्या 48 तासातील दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे वैद्यकीय टीमने सुटकेचा श्वास सोडला आहे. यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीट करून दिली आहे.


Coronavirus | मला फसवलं, 12 तब्लिगींसाठी फसवून पत्र घेतलं, तहसीलदारांची तक्रार 

हरयाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या आठ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते तर अन्य चार जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू
या सर्व यात्रेकरूंवर तसेच अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्या यात्रेकरूंवर उपचार करताना पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले होेते. हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते. तिथे ते कोणाच्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूर पर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेतला गेला होता.

लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास

कसा झाला होता या लोकांचा प्रवास?
आंध्रप्रदेश येथील करनुल भागातील बाराजण हे जमातसाठी पंधरा डिसेंबरला निघाले होते. आंध्रप्रदेश आणि हरियाणा या राज्यात धार्मिक कामे केल्यानंतर ते करनुलकडे निघणार होते. त्यातच लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यांच्या रेल्वेचे तिकीट आरक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काहीच करता आले नाही. हरियाणा येथील प्रशासनास कळवून त्यांनी पुढील प्रवास सुरु केला. तेथील तहसीलदार यांनी दिलेल्या पासवर खासगी गाडीतून मथुरा आग्रा, इंदोर, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर या मार्गे ते निलंगा येथे आले. निलंगा येथे एक एप्रिलला ते दाखल झाले. त्यांनी करनुलच्या वैद्यकीय सेंटरला जाण्यासाठी मदत करा असे प्रशासनास सांगितले. लातूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्यातील आठ लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती.