एक्स्प्लोर

कोरोना तपासणी करणारी उत्तर महाराष्ट्रातील पहिली लॅब धुळ्यात कार्यान्वित

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

धुळे  : धुळे येथील  भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हायरल रिसर्च ॲण्ड डायग्नोस्टिक लॅबोरेटरी) ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीस सुरुवात झाली असून आज दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे ‘कोरोना’ विषाणूची तपासणी करणारी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील 200 स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.मात्र, ‘कोरोना’ विषाणूची साथ पसरल्यानंतर तातडीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात ‘कोरोना’ विषाणू तपासणीला सुरवात करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ‘COVID 19’ चाचणी प्रयोगशाळा, असे नामकरण करण्यात आले आहे. या तपासणीसाठी ‘आयआरटीपीसीआर’ ही अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) काही नमुने तपासणीसाठी या प्रयोगशाळेत पाठविले होते. या प्रयोगशाळेत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संशोधक शास्त्रज्ञ डॉ. गायत्री पोतदार, डॉ. सुप्रिया माळवी, मनीषा तमायचेकर, तंत्रज्ञ पूजा ब्राम्हणे, स्मिता ठाकूर, अनिल यादव, योगेश सोनवणे, अर्जुन वाघ यांनी नमुन्यांची तपासणी करून अहवाल पाठविले. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालांची तपासणी केल्यावर राष्ट्रीय विषाणू संस्थेने या प्रयोगशाळेस ‘कोरोना’ विषाणूच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल देण्यास 31 मार्च 2020 पासून परवानगी दिली आहे. पहिल्या दिवशी चार, तर आज दुसऱ्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एका वेळेस 92 नमुन्यांची तपासणी करता येते. या चाचणीसाठी सध्या आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. सरावाने तो सहा तासांवर येईल. यापूर्वी ‘कोरोना’ विषाणूच्या तपासणीसाठी नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवावे लागत असत. मात्र, धुळ्यातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व पैशांची बचत होईल. ‘कोरोना’ विषाणू तपासणीचे वैद्यकीय महाविद्यालयात 400 कीट उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार त्यांची मागणी नोंदविण्यात येईल. ‘कोरोना’‍ विषाणूच्या पार्श्वभूमीवर नमुन्यांची तपासणी करताना पुरेपूर दक्षता आणि सुरक्षा बाळगली जाते, असेही प्रा. डॉ. द्रविड यांनी सांगितले. ‘कोरोना’ विषाणूशी संबंधित नमुने तपासणीमुळे रुग्णांना अहवाल लवकर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांवर औषधोपचारही तातडीने होतील. ही प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, या विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अधिष्ठाता डॉ. रामराजे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. द्रविड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget