LIVE UPDATES | माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांची आत्महत्या

आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं : राहुल गांधी पांढऱ्या सोन्याला यंदा 5825 रुपये हमीभाव! कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु शेतकऱ्याचा पोर झाला दख्खनचा राजा, सांगलीचा विशाल झळकणार जोतिबावरच्या मालिकेत IPL 2020, MIvsRR :मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Oct 2020 09:06 PM
आरक्षणावर आलेली स्थगिती हठवण्यासाठी विनोद पाटील यांनी केलेला विनंती अर्ज आज सर्वोच्च न्यायालयातील प्रबंधकांकडे दाखल

माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित करण्याबाबत पारित केलेला 9 सप्टेंबर 2020 रोजीचा आदेश रिक्त करण्यात यावा यासाठी विनोद नारायण पाटील यांनी समाजातर्फे 12 सप्टेंबर 2020 रोजी अर्ज क्रमांक 90830 अन्वये विनंती केली होती. सदर अर्ज आज सर्वोच्च न्यायालयातील प्रबंधक यांच्याकडे प्रचलित नियमानुसार योग्य त्या आदेशासाठी दाखल करण्यात आला. सदर प्रबांधकाना विनंती करण्यात आली असून, सुनावणीसाठी लवकरात लवकर पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत करुन सदर अर्ज क्रमांक 90830 हा सुनावणीस घेण्यात यावा, असा विनंती अर्ज ॲडवोकेट संदीप देशमुख यांच्यावतीने करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित करण्याबाबत पारित केलेला 9 सप्टेंबर 2020 रोजीचा आदेश रिक्त करण्यात यावा यासाठी विनोद पाटील यांनी समाजातर्फे 12 सप्टेंबर 2020 रोजी अर्ज क्रमांक 90830 अन्वये विनंती केली होती. सदर अर्ज आज सर्वोच्च न्यायालयातील प्रबंधक यांच्याकडे प्रचलित नियमानुसार योग्य त्या आदेशासाठी दाखल करण्यात आला. सदर प्रबांधकाना विनंती करण्यात आली असून, सुनावणीसाठी लवकरात लवकर पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत करुन सदर अर्ज क्रमांक 90830 हा सुनावणीस घेण्यात यावी, असा विनंती अर्ज ॲडवोकेट संदीप देशमुख यांच्यावतीने करण्यात आलेला आहे.

राज्यातील बचत गटांना 523 कोटी देण्यास कॅबिनेटची मान्यता, नव तेजस्वीनी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मिळणार रोजगार, महिला आर्थिक विकास महामंडळ नव तेजस्विनी राबवणार, ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीचा महत्वाचा निर्णय, या योजनेमुळे तब्बल 10 लाख कुटुंब दारिद्र्य रेषेतून बाहेर येणार
माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांची आत्महत्या; DGP आणि CBI प्रमुखपदी होते.
साताऱ्याच्या सध्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड
साताऱ्याच्या सध्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड
मुंबई विद्यापीठाच्या सर्वरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान ही यंत्रणा कॉलॅप्स करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिलीय. शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परिक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सर्वरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती मुंबई विद्यापाठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान ही यंत्रणा कॉलॅप्स करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील यावेळी उदय सामंत यांनी दिलीय.शिवाय, विरोधकांना काहीही काम नसून परिक्षांबाबत समस्या येत असली तरी याबाबत विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं देखील यावेळी उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
पिंपरी चिंचवडमधील स्टार हॉस्पिटलचा आणखी एक प्रताप समोर आलाय. कोरोना बाधित महिलेवर मृत्यूनंतर ही स्टार हॉस्पिटलने उपचार सुरूच ठेवल्याचा धक्कादायक आरोप आहे. निगडी पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा देखील झालाय. हॉस्पिटलचे संचालक डॉ अमित वाघचा ही यात समावेश आहे. 24 ऑगस्टच्या रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी कोरोना बाधित आईचा मृत्यू झाल्याची माहिती मुलाला देण्यात आली. पण दुसऱ्या दिवशी पैसे स्वीकारताना 25 ऑगस्टचे ही बिल आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. मुलाने आक्षेप घेतला तरी रुग्णालय प्रशासनाने जुमानले नाही, शेवटी मुलाने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. त्यानंतर अखेर याप्रकरणी निगडी पोलिसांत संचालक डॉ अमित वाघ सह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वी याच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचं उघड झालं होतं. तेंव्हा हॉस्पिटल कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आलेली आहे. याच मृत महिलेच्या मुलाने स्टिंग ऑपरेशन करत रेमडीसीवीरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केला होता.
उदयनराजे पनवेलच्या मराठा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत,

गटातटातील राजकारणमुळे पनवेलच्या बैठकीला जाणार नाहीत,

मात्र उदयनराजेचच राज्यव्यापी बैठक लावणार,


येत्या 15 दिवसात साताऱ्यातच घेणार राज्यव्यापी मेळावा,

संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंना दिले जाणार निमंत्रण


सोलापूर-मुंबई प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई-सोलापूर-मुंबई विशेष रेल्वे 9 ऑक्टोबर पासून सुरू होणार

सिद्धेश्वर सुपरफास्टच्या वेळापत्रकानुसार विशेष गाडी धावणार
रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश
रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर, एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश
प्रदेश भाजप कार्यकारिणीची उद्या बैठक होणार आहे. मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात एक दिवसीय प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडेल. आगामी पदवीधर, पालिका निवडणूक तयारीचा आढावा, संघटना बांधणी, कोरोना परिस्थिती, राज्य सरकारविरोधात मोर्चेबांधणी / रणनीती यावर बैठकीत चर्चा होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे प्रदेश कार्यकरिणीला मर्यादित उपस्थिती असेल. उपस्थितांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.
नवी मुंबईत मराठा नेत्यांची महत्त्वाची बैठक, उदयनराजे यांची पाठ, साताऱ्यात स्वतंत्र बैठक घेणार, संभाजीराजे बैठकीला उपस्थित राहणार
चंद्रपूर : चंद्रपुरात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. पण मुसळधार पावसाने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्याची सरासरी जेमतेम 73 टक्क्यांवर आहे.
राज्यात तुरीला चांगले दिवस आले आहेत. कारण तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये 8200 ते 9300 रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने बाजारात दर तेजीत आहेत. वाढलेले दर बाजारात तूरडाळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी मिळणारी तूरडाळ 80 ते 85 रुपये किमतीची डाळ आता 125 रुपये प्रती किलो झाली. आता तुरीला दहा हजार रुपये दर मिळाला तर तूरडाळ 150 पर्यंत जाईल हे मात्र नक्की.
नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीत थोड्याच वेळात संभाजीराजे छत्रपती पोहोचणार,

राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार,

या महत्वपूर्ण बैठकीला उदयनराजे भोसले मात्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती
नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीत थोड्याच वेळात संभाजीराजे छत्रपती पोहोचणार,

राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार,

या महत्वपूर्ण बैठकीला उदयनराजे भोसले मात्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती
भाजीपाल्याच्या गाडीतून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणार्‍यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. या पिकअप टेम्पोत पुढील बाजूस भाजीपाला आणि आतमध्ये तंबाखूजन्य पदार्थ अशाप्रकारे अवैद्य वाहतूक केली जात होती. पोलिसांनी 8 लाख 5 हजार 70 रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ आणि टेम्पो असा एकूण 14 लाख 90 हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात ऑगस्टपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले. जुलैपर्यंत कोरोनापासून सुरक्षित असलेला जिल्हा ऑगस्टमध्ये डेंजर झोन बनला. ऑगस्टमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरसाठी रुग्णाची फरफट सुरु झाली. यावर प्रशासनाने खाजगी रुग्णालये अधिग्रहित करत रुग्णावर उपचार सुरु केले. मात्र एकीकडे दररोजची रुग्णसंख्या हजाराच्या पटीत गेली आणि मृत्यूदरही वाढू लागला. यामुळे सांगली जिल्हा देशात हॉटस्पॉट ठरला. मात्र सप्टेंबरपासून कोरोनाचा उडालेला हाहाकार कमी होत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध आहेत.
हाथरस प्रकरणी एसआयटीला तपासासाठी आणखी 10 दिवस मुदतवाढ मिळाली आहे. गृहसचिव भगवान स्वरुप यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचा तपास सुरु आहे. या प्रकरणात एसआयटीला तपासासाठी एक आठवड्यांचा मुदत देण्यात आली होती. आजच एसआयटीला अहवाल सोपवला होता. मात्र आज सकाळीच एसआयटीला आणखी दहा दिवसांचा अवधी मिळाला.
भिवंडी : अंजूरफाटा चिंचोटी महामार्गावरील डुंगे गावाच्या हद्दीत एका चढणीवर भरधाव ट्रकला आग लागून ट्रकसह कोरोसिव्ह केमिकल पावडरचे ड्रम व कापडाचे तागे जळून खाक झाल्याची घटना रात्रि घडली आहे.ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच क्लिनर व ड्रायव्हरने जिवाच्या आतांकाने ट्रकमधून उड्या घेऊन घटनास्थळावून पलायन केल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली आहे. ट्रक चालकाने भिवंडीतील गोदामातून केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे ताके व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा माल भरून तो खाली करण्यासाठी गुजरात येथे चालला होता. त्यावेळी भरधाव ट्रक डुंगे गावच्या हद्दीतील एका चढणीवर असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक पलटी झाला.त्यावेळी ट्रकला भीषण आग लागल्याने ट्रकमधील केमिकल पावडरचे ड्रम , कापडाचे ताके व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा लाखो रुपयांचा माल ट्रकसह जळून खाक झाला आहे.या आगीत ट्रकचा केवल सांगाडा वाचला आहे. या आगीच्या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलास मिळताच अंजूर फाटा व स्व.इंदिरा गांधी रुग्णालया लगतच्या दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या तात्काळ रवाना घटनास्थळी दाखल झाल्या होत्या मात्र त्या पोहचेपर्यंत ट्रकसह संपूर्ण सामान जळून खाक झाला होता.या आगीची नोंद तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिराने करण्यात आली आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांचा लोकल मधून प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर रेल्वेकडून डबेवाल्यांना परावनगी देण्यात आली आहे. ओळखपत्र दाखवून रेल्वेने प्रवास करता येणार आहे. आधी क्यू आर कोड नसल्यामुळे डबेवाल्याना प्रवास नाकारण्यात आला होता. मात्र आता क्यू आर कोड ऐवजी आयकार्ड दाखवून मुंबईचे डबेवाले डबे पोहचणार.
दारुची अवैधपणे वाहतूक करताना पकडल्याने दारू माफियांनी एक्साईज अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणमधील एक्साईज कार्यालयासमोरच हा प्रकार घडला.
कोल्हापुरातील दोन कोविड सेंटर बंद, शिवाजी विद्यापीठ हॉस्टेलमधील दोन कोविड सेंटर बंद, कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांची माहिती, गेल्या 1 आठवड्यापासून कोल्हापुरातील रुग्णसंख्येत घट होत असल्याने निर्णय, सद्या जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 800
मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मराठा विद्यार्थी परिषदेची मागणी...
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेदरम्यान आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. आजही मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्याना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र, लॉग इन होत नसल्याने परीक्षा देता येत नाही. हेल्पलाइन क्रमांकावर सुद्धा कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा संभ्रमात पडले आहेत. तांत्रिक कारण दुरुस्त करण्याचं काम विद्यापीठाकडून सुरु आहे. आजच परीक्षा घेऊ विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा आणि चिंता करु नये असे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्यात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कात्रज ते नवले पुलाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. ऑर्किड स्कूलच्या समोर हा अपघात घडला. मालट्रकची धडक इतकी जोरदार होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला. याबाबत अधिक माहिती अशी की कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन एका मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढील वाहने एकमेकांना धडकत गेली. या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी आहेत. झालेल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर येऊन मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. क्रेनच्या सहाय्याने मालट्रक आणि अपघातग्रस्त वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
रत्नागिरी : बिअर बार, रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर आता वाचनालयं का सुरु होत नाहीत, याबाबत सवाल केला जात आहे. वाचनप्रेमींमधून देखील वाचनालयं किंवा ग्रांथालयं सुरु करा ही मागणी वाढत आहे. सारे नियम आणि अटी -शर्थींसह बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु झाली मग आम्ही देखील सारे नियम पाळून ग्रंथालयं सुरु करु असा सूर सध्या पाहायाला मिळत आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर पुस्तक रूपी मौल्यवान ठेवा देखील यामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचना प्रेरणा दिवसाचं निमित्त साधत का असेना वाचनालयं, ग्रंथालयं सुरु करा अशी मागणी आती पुढे येत आहे.
चंद्रपुरात RT1 वाघाच्या हल्ल्यात राजुरा तालुक्यात आठवा बळी गेला आहे. खांबाडा परिसरातील जंगलात पुन्हा वाघाचा हल्ला, गुरे चारण्यासाठी गेलेला मारोती पेंदोर (70) काल संध्याकाळ पासून घरी परतला नाही. अखेर शोधाशोध केल्यावर आज सकाळी शरीराचे तुकडे आढळले, वाघाने त्यांचे 60 टक्के शरीर खाल्ले. या भागातील सततच्या हल्ल्यांनी नागरिक संतापले, RT1 वाघाला जेरबंद करण्यासाठी गेले तीन महिने अभियान सुरु आहे. आतापर्यंत 8 बळी गेल्याने वनविभागाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरु होणार, प्रेक्षकांमध्ये एका सीटचं अंतर, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती
बेळगावसह परिसरात भात पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.बेळगावचा बासमती तांदूळ तर जगप्रसिद्ध आहे.यावर्षी हंगाम चांगला मिळाल्याने भात पीकही चांगले आले आहे.पण काही दिवसांपासून भात पिकावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शेतकरी करपा आणि मावा रोग नियंत्रणात आणण्यासाठी महागडी औषधे फवारत आहेत.तरीही रोगाचा प्रादुर्भाव होतच आहे. त्यामुळे कृषी खात्याने यावर उपाय सुचवून भात पिकावरील रोगावर नियंत्रण आणण्यास मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर उत्पन्न घटणार आहे.पंधरा दिवसात कापणीला आलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरील आंदोलनापूर्वीच आंदोलकांना ताब्यात घेऊन आज पहाटे पुण्यात सोडलं.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात बनावट नोटांची छपाई होत असल्याचे उघड, बनावट नोटा, प्रिंटर, कागदाचा गठ्ठा कुरुंदवाड पोलिसांकडून जप्त, 3 अटकेत, बनावट नोटांचं कर्नाटक कनेक्शन उघड, पोलिसांचं पथक कर्नाटकला रवाना, सीमा भागात बनावट नोटांची छपाई करणार मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात बनावट नोटांची छपाई होत असल्याचे उघड, बनावट नोटा, प्रिंटर, कागदाचा गठ्ठा कुरुंदवाड पोलिसांकडून जप्त, 3 अटकेत, बनावट नोटांचं कर्नाटक कनेक्शन उघड, पोलिसांचं पथक कर्नाटकला रवाना, सीमा भागात बनावट नोटांची छपाई करणार मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय
सांगली शहरावर आज पहाटेपासून दाट धुके पसरले होते. दाट आणि गर्द धुक्याचा अनुभव आज सांगलीकरांनी घेतला. 8 वाजेपर्यंत तरी मोठ्या प्रमाणावर धुके कायम होते. कृष्णा नदी काठ देखील पूर्णपणे दाट धुक्याने व्यापून गेला होता. सध्या वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. दिवसभर ऊन, संध्याकाळी पाऊस आणि पहाटे धुकं असे वातावरणत बदल दिसून येत आहेत. सांगली आणि परिसरात सकाळपासून वातावरणात धुक्याची चादर पसरली होती. यामुळे सकाळची रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी होती.
केंद्राच्या कृषी विधेयकाबाबत राज्यातील शेतकरी संघटनांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार, आज संध्याकाळी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ उपसमिती आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक होणार, या विधेयकातील त्रुटी आणि जाचक अटी-शर्तींसंदर्भात मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांची मतं जाणून घेणार, त्यानंतर राज्यात कृषी विधेयकाच्या अमंलबजावणीबाबत राज्य सरकार निर्णय घेणार
नागपूरातील दोन तरुणींना मध्यप्रदेशातील टिकमगढ येथे विकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोन्ही तरुणींची सुटका केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत.. आता पर्यंतच्या तपासानुसार नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी भांडे विक्री चा काम करायचा. आकाश नावाच्या व्यक्तीने त्या दोघींना मध्यप्रदेशात या व्यवसायाला संधी असून चांगला मोबदला मिळेल असा अमिश दाखविला. त्यामुळे दोन्ही तरुणी साडे तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील टिकमगढ ला गेल्या. मात्र, तिथे आकाश ने दोघीना टोळीतील इतर सदस्यांच्या मदतीने 1 लाख 90 हजार रुपयात एका वयस्कर माणसाला विकले. दोन्ही तरुणींचे बळजबरीने लग्न लावले गेले, आणि त्यानंतर दोघींना मारहाण आणि शारीरिक शोषणाचा क्रम सुरू झाला. दरम्यान, परराज्यातील दोन तरुणींना टिकमगढ ला आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचा बोभाटा त्या गावात झाला आणि माहिती मध्यप्रदेश पोलिसांपर्यंत पोहोचली.. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेत नागपूरात संपर्क साधले आणि हे सर्व प्रकार उघडकीस आले. दोन्ही तरुणींना नागपूरात आणण्यात आले असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आकाशला अटक केली आहे.. तर टोळीतील इतरांचा शोध घेतला जात आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...



आमचं सरकार असतं तर चीनी सैन्याला 15 मिनिटात बाहेर काढलं असतं : राहुल गांधी

 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधींनी हरियाणामध्ये बोलताना म्हटलं की, पंतप्रधान स्वत:ला देशभक्त म्हणवतात, मात्र संपूर्ण देशाला माहिती आहे की चीनचं सैन्य भारतात शिरलं आहे. मग हे असे कसले देशभक्त आहेत? मी सांगतो की आमचं (काँग्रेस) सरकार असतं तर चीनला देशाबाहेर काढायला 15 मिनिटही लागले नसते. भारतीय सैन्याने चीनी सैन्याला 100 किमी दूर केलं असतं.


जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की, आपल्या देशात पाऊल टाकण्याइतकी चीनची हिंमत नव्हती. आज संपूर्ण जगात एकच देश आहे ज्या देशामध्ये दुसर्‍या देशाच्या फौजेने घुसखोरी केली आहे आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की या देशाची जमीन कोणी घेतली नाही, असा शब्दात राहुल गांधींनी हल्लाबोल केला.



पांढऱ्या सोन्याला यंदा 5825 रुपये हमीभाव! कापूस नोंदणी प्रक्रिया सुरु


यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी कापसाची लागवड करतात. मागील हंगामाचा कापूस पणन महासंघाला जून महिन्यांपर्यत खरेदी करावा लागला होता. यंदा मात्र मागील वेळी झालेली धावपळ न बघता पणन महासंघ आणि सीसीआयने कापूस खरेदीच्या अनुषंगाने कापूस नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून जिल्हाभर सुरु केली आहे. यावेळी लांब धाग्याच्या कापसाला प्रती क्विंटल 5825 असा हमीभाव मिळणार असल्याने आता शेतकरी नोंदणी केंद्राकडे विचारपूस करण्यासाठी बाजार समितीमध्ये येताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. खरिपात जिल्ह्यात 9 लाख हेक्टरपैकी साधारण 5 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली आहे.


कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पावसाळा सुरु झाला तेव्हापर्यंत कापूस खरेदी करावी लागली होती. त्यात अनेक ठिकाणी बोगस नोंदणीसुद्धा झाल्या होत्या त्यामुळे कापूस खरेदी करताना मोठा गोंधळ उडाला होता. आता शेतकऱ्यांनीच कापूस खरेदी केला जावा या दृष्टीने कापसाची पूर्व नोंदणी सुरु केली आहे. कापूस खरेदीमध्ये कुठेही गडबड होऊ नये म्हणून पणन आणि सीसीआयचे लवकरच एक मोबाईल अँप सुद्धा पुढील काही दिवसात आणणार आहे. शिवाय कापूस नोंदणीसाठी यंदा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ग्रीन कार्ड तयार केले जाणार आहे. शासनाची कापूस खरेदी सुरु झाल्यावर नोंदणी केलेले शेतकरी तात्काळ कापूस विक्री करू शकतील. या ग्रीन कार्डद्वारे व्यापारी गैरफायदा घेऊ शकणार नाही, अशी यात प्रक्रिया आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली आहे.



शेतकऱ्याचा पोर झाला दख्खनचा राजा, सांगलीचा विशाल झळकणार जोतिबावरच्या मालिकेत

 

गुलाबी रंगाचा फेटा, पिळदार मिशा अशा रूपात जोतिबाचे दर्शन आजपर्यंत करोडो भाविकांनी घेतले आहे. कोल्हापुरातील जोतिबाच्या डोंगरावर असलेल्या या मंदिरात चैत्रयात्रेला मोठी गर्दी होते. दख्खनचा राजा या नावाने जोतिबा हे दैवत ओळखले जाते. जोतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. कोठारे व्हिजनने या मालिकेची निर्मिती केली असून जोतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता  सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम जोतिबाची भूमिका साकारणार असल्याचेही दिसून आलं आहे.

 

दरवर्षी विशिष्ट मालिकांचा ट्रेंड येत असतो. तसा छोट्या पडद्यावर काही महिन्यांपासून पौराणिक, देवी-देवतांच्या मालिकांचा ट्रेंड जोरावर आहे. खंडोबा, गणपती बाप्पा यांच्यासह आता ज्योतिबा देवाचीही मालिका तयार होऊ लागली आहे. कोल्हापुरातल्या चित्रनगरीमध्ये या मालिकेचं चित्रिकरण सुरू आहे. या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. म्हणजे, जो चेहरा फार लोकांना माहीत नाही अशा चेहरा घेऊन त्यातून ज्योतिबा लोकांसमोर आणण्याचा मानस मालिकाकर्त्यांचा होता. त्याला आता यश आलं आहे. विशाल निकम हा कलाकार आता ज्योतिबाच्या रुपाने आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी विशालने तब्बल 18 किलो वजन कमी केलं आहे. तर अनेक गोष्टी शिकूनही घेतल्या आहेत. विशाल यापूर्वी काही मालिकांत आणि चित्रपटात झळकला आहे.

 

IPL 2020, MIvsRR :मुंबई इंडियन्सचा विजयाचा चौकार, मुंबईकडून राजस्थानचा 57 धावांनी पराभव


अबुधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला 194 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 19.1 षटकात 136 धावात आटोपला. राजस्थानच्या जोस बटलरनं 70 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुंबईकडून जसप्रीत बुमरानं 20 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सननं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.


मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सहा सामन्यातला चौथा विजय ठरला. तर राजस्थानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्ससमोर 194 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं 47 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारचं यंदाच्या मोसमातलं हे पहिलच अर्धशतक ठरलं. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानं 35 तर हार्दिक पंड्यानं नाबाद 30 धावा फटकावल्या.



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.