रत्नागिरी : कोरोनामुक्तीकडे जाणाऱ्या जिल्ह्यापैकी एक जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. 1 मे रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र काहीसे असेच होते. कारण 26 एप्रिल रोजी जिल्हा रूग्णालयातून सहा महिन्याच्या बाळासह आणखी दोन कोरोना बाधितांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण वेगळेच होते. पण, 2 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन रूग्ण आढळून आले आणि त्यानंतर मात्र चित्र पालटत गेले. कारण, आजघडीला रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा 74वर पोहोचला आहे. बुधवारी रात्री उशिरा तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर जिल्ह्याची चिंता आणखीन वाढली. रत्नागिरीमध्ये 7, मंडणगडमध्ये 11 आणि दापोलीमध्ये 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा आकडा 74वर पोहोचला आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सारे जण मुंबईहून जिल्ह्यात आलेले आहेत. शिवाय, 2 मे ते 13 मार्च याकाळात तब्बल 68 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. तर, यामध्ये दोन नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 74 झाला आहे. तर अॅक्टीव रूग्णांची संख्या ही 67 झाली आहे. यापूर्वी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोनच दिवसापूर्वी मृत्यूच्या दोन दिवसानंतर एका रूग्णाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे.


पाहा व्हिडीओ : 18 तारखेनंतर लॉकडाऊन शब्द राहिल की नाही शंका आहे : प्रकाश जावडेकर



मुंबईहून येणाऱ्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा सर्वात जास्त


मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वास्तव्याला असलेले नागरिक गाव जवळ करत आहेत. त्यामुळे मुंबई- गोवा मार्गावर या शहरांमध्ये येणाऱ्यांची वर्दळ ही दिवसेंदिवस वाढत आहे. पास किंवा शक्य असेल त्या मार्गाने या शहरांमधील नागरिक आपल्या कोकणातील मुळगावी येत आहेत. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेत तपासणीकरता पाठवले जात आहेत. दरम्यान, मागील 8 ते 10 दिवसांचा विचार करता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आढळून आलेले रूग्ण हे मुंबईहून आलेले आहेत.


चिंताजनक! रत्नागिरीत कोरोना बाधितांचा आकडा पन्नाशी पार


गाव पातळीवर संभ्रम


या दोन्ही शहरांमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांना गावी घेण्यावरून गावा-गावांमध्ये सध्या दुमत असल्याचे दिसत आहे. काही गावांनी या शहरांमध्ये आपल्याच नागरिकांना गावी घेण्याबाबत सकारात्मता दर्शवली आहे. त्यानुसार त्यांना गावी घेत क्वॉरंटाईन करून ठेवले जात आहे. पण, अनेक गावांमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवण्याच्या नियमांवरून संभ्रम दिसून येत आहे. एका गावात एक तर, दुसऱ्या गावामध्ये दुसराच नियम असल्याचे देखील सध्या चित्र आहे.


संबंधित बातम्या :


नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई


मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा


मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे