मुंबई : राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. राज्यात आज कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाशीतील एका खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यूू झाला आहे.
कस्तुरबामध्ये दाखल झालेल्या महिलेला डायबिटीज आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने दाखल करण्यात आलं होतं. त्यात तिचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या तपासणी अहवालात तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक 65 वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांतून होऊन वाशी येथील खासगी हॉस्पिटल येथे दाखल झाली होती. या महिलेची स्थिती अत्यंत गंभीर होती. उपचारादरम्यान तिचा 24 मार्च रोजी रात्री मृत्यू झाला. मृत महिला करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.
आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 269 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता, पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.
राज्यातील जिल्हा आणि महापालिकानिहाय रुग्णांची आकडेवारी
- मुंबई - 49
- पिंपरी चिंचवड - 12
- पुणे - 18
- सांगली - 9
- नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली - 6
- नागपूर - 5
- यवतमाळ - 4
- अहमदनगर - 3
- ठाणे - 3
- सातारा - 2
- पनवेल - 2
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद -1
- रत्नागिरी - 1
- वसई-विरार - 1
- पुणे ग्रामीण - 1
- सिंधुदुर्ग - 1
- मृत्यू - 4
गेल्या 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 125 जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.
- Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार
- आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री
- Coronavirus | राज्यातील 15 रूग्ण कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी
- Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळ देणारा व्हिडीओ; नागपुरमधील कोरोनाग्रस्ताचा अनुभव