मुंबई : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 पार पोहोचला असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच सरकारने कोरोना व्हायरसबाबत देशातील प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. एवढचं नाहीतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने ईमेल आयडीदेखील जारी केले आहेत. देशातील नागरिक या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून कोरोनाबाबत माहिती आणि मदद मागू शकतात. पाहा संर्व राज्यातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी...
कोरोना व्हायरस हेल्पलाइन क्रमांक : +91-11-23978046
कोरोना व्हायरस साठी जारी केलेला ईमेल आयडी : ncov2019@gmail.com


महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक : 020-26127394
आंध्रप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0866-2410978
अरुणाचल प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 9436055743
आसाम हेल्पलाइन क्रमांक : 6913347770
बिहार, गुजरात, छत्तीसगढ, गोवा, हिमाचल, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कम, तेलंगाना, उत्तराखंड, पुडुचेरी, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमन दीव हेल्पलाइन क्रमांक : 104
हरियाणा हेल्पलाइन क्रमांक : 8558893911
केरल हेल्पलाइन क्रमांक : 0471-2552056
मध्यप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0755-2527177
मणिपूर हेल्पलाइन क्रमांक : 3852411668
मेघालय हेल्पलाइन क्रमांक : 108
मिजोरम हेल्पालाइन क्रमांक : 102
नागालँड हेल्पलाइन क्रमांक : 7005539653
ओडिशा हेल्पलाइन क्रमांक : 9439994859
राजस्थान हेल्पलाइन क्रमांक : 0141-2225624
तमिळनाडु हेल्पलाइन क्रमांक : 044-29510500
त्रिपुरा हेल्पलाइन क्रमांक : 0381-2315879
उत्तर प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 18001805145
पश्चिम बंगाल हेल्पलाइन क्रमांक : 1800313444222, 03323412600
अंदमान निकोबार हेल्पलाइन क्रमांक : 03192-232102
छत्तीसगढ हेल्पलाइन क्रमांक : 9779558282
दिल्ली हेल्पलाइन क्रमांक : 011-22307145
जम्मू कश्मीर हेल्पलाइन क्रमांक : 01912520982, 0194-2440283
लद्दाख हेल्पलाइन क्रमांक : 01982256462

जगभरातही कोरोनाचा हैदोस

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. चीनमध्ये स्थिती आटोक्यात आली असली तरी इटली, स्पेन, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत 1 लाख 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 33 हजार कोरोनाचे रुग्ण जगभरात आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे जवळपास 14 हजार 733 जण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 46 हजारांची तर बळींच्या आकड्यात 2306 ची भर पडली आहे.

संबंधित बातम्या :

Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख

परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा