मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. सध्या देशावर कोरोनाचं सावट असून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या गुरुवारी 1297 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. एकाच दिवसांत महाराष्ट्रात एकूण 162 नवे रूग्ण आढळून आले आहेत.महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आढळलेल्या एकूण 162 रुग्णांपैकी एकट्या मुंबईतच तब्बल 143 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 857 वर पोहोचली आहे. तर पुणे शहरात 168, पिंपरी-चिंचवड 22, ग्रामीण 14 अशी एकूण 204 रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. मुंबईसह, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या शहरांमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.


कोरोना बाधितांच्या संख्येसोबतच महाराष्ट्रातील मृत्यूदरही वाढला आहे. राज्यातील मृत्यूदर सहा टक्क्यांवर आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या 20 वर गेली असून त्यातील एक बारामतीत तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत.


Coronavirus | धारावीतील सर्व कोरोनाबाधितांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर


मुंबईत आकडा 857 वर


मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा आकडा मुंबईत झपाट्याने वाढत चालला आहे. आज नव्याने मुंबईत 143 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई महापालितका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 857 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा झपाट्याने वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईतील अनेक भाग कोरोना हॉटस्पॉटही घोषित करण्यात आले आहेत. मात्र मुंबई कोरोना संसर्ग वेगाने होण्याचं नेमकं कारण काय असेल याची चाचपणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या गेल्या काही दिवसातील वाढीची चार प्रमुख कारणे सांगण्यात आली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील 1 कोटी 20 लाखांची लोकसंख्या ही जास्त घनता असलेल्या भागांत राहते. या ठिकाणच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, या जास्त घनता असलेल्या क्षेत्राकडे महापालिका विशेष लक्ष देत आहे.


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर; राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 135वर



मुंबई कोरोनाबाधित रूग्ण संख्या वाढीची कारणे :


1. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना व्हायरस संशयित रुग्णांची तपासणीची क्षमता वाढवण्यात आली आहे.


2. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहिम तीव्र केली. तसेच, लक्षणे न दाखवणाऱ्या मात्र पॉझिटिव्ह पेशंटच्या नजीक संपर्कात आलेल्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत.


3. सर्वात जास्त केसेस वरळीच्या एका पॉकेट एरियातच आढळून आल्या आहेत.


4. वॉक्हार्ट हॉस्पिटलमधील मोठ्या संख्येचा कर्मचारी वर्ग कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.


संबंधित बातम्या : 


Rapid Testing | मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार


coronavirus | रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची का आहे ?