मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. रॅपिड टेस्टसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर आता मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला मुंबईत सुरुवात होईल, अशी माहिती आहे. रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे का याची तात्काळ माहिती मिळते. तसं इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.


राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने बाधित किंवा संशयीत रुग्णांना ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट (समूह तपासण्या) करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी आता एका पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने ज्याप्रमाणे आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासतो त्याचप्रमाणे ही तपासणी केली जाईल. त्यानंतर संबंधितास कोरोनाची पुढील तपासणी करण्याची किंवा आयसोलेशन किंवा क्वारंटाईन करण्याची गरज आहे की नाही, हे देखील स्पष्ट होईल.

coronavirus | रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची का आहे ?

याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यापूर्वीच माहिती दिली होती. मुंबईत अनेक भाग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले आहेत. ते भाग दाट लोकसंख्येचे आहेत. अशा ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठीचे सॅम्पल घेणे, त्याचा अहवाल येणे यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे या साथीवर नियंत्रण आणणे कठीण होईल म्हणून ही रॅपिड टेस्ट करावी, असा आग्रह राज्य सरकारने धरला होता. आम्ही या तपासण्या खाजगी लॅबच्या माध्यमातूनही करुन घेऊ शकतो, असे टोपे यांनी सांगितले होते.

कोरोनाची चाचणी आणि रॅपिड अँटी बॉडी टेस्टमध्ये काय फरक..?

  • कोविड 19 ची सध्याची टेस्ट आहे त्याला PCR (polymerase chain reaction) म्हणतात. त्यासाठी नाक आणि घशातील स्वॅब गरजेचे आहेत. त्याचा रिझल्ट येण्यासाठी पाच ते सहा तास लागतात.

  • रॅपिड अँटी बॉडी टेस्टही केवळ 15 मिनिटात रिझल्ट देते आणि त्यासाठी फक्त रक्ताचे नमुने तपासावे लागतात.


रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची का आहे ?





      • महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा यासह इतर राज्यांनी रॅपिड अँटी बॉडी टेस्टसाठी ICMR कडे परवानगी मागितली होती.

      • वरळी, धारावी, पुणे, सांगली यासारख्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं टेस्टिंगचं प्रमाण वाढलं तर ज्यांना कोरोनाची लागण आहे, मात्र लक्षणं दिसत नाहीत अशा रुग्णांना शोधणं सोपं जाईल.

      • कम्युनिटी स्प्रेडिंग रोखण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट असेल. जिथं कोरोनाचा धोका अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये ही किट्स पाठवली जातील





    Rapid Corona Test Kit | पाच मिनिटात रिझल्ट देणारं रॅपिड किट नेमकं कसं काम करतं? स्पेशल रिपोर्ट