कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra)निर्बंध पुन्हा एकदा कडक लावण्यात होते. ज्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात राज्याला मोठे यश आले. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यातच आज महाराष्ट्रात हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, मृत्युंच्या संख्येतही घट पाहायला मिळत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात केवळ 23 हजार 184 रुग्ण सक्रिय आहेत. ही राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक माहिती आहे.


60 टक्के मुलांमध्ये नैसर्गिक अँटिबॉडी, शाळा तात्काळ सुरु करा - डॉक्टरांचा सल्ला


आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 889 नवे रुग्ण आढळून आले. तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 1 हजार 586 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 66 लाख 3 हजार 850 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 64 लाख 37 हजार 25 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यातील रिक्वव्हरी रेट 97.47 वर पोहचला आहे. 


100 Crore Vaccination : लसोत्सव... देशात विक्रम 100 कोटी डोस पूर्ण, देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई!


देशात दरदिवशी 15 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 443 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 18 हजार 762 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


देशात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 89 हजार 774 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 67 हजार 367 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 4 लाख 54 हजार 712 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात एकूण 1 लाख 67 हजार 695 रुग्ण सक्रिय आहेत.