School Reopen : 60 टक्के विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडिज आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु कराव्यात असा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे. महिन्याच्या सुरुवातील राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांची तितकीशी उपस्थिती दिसत नाही. देशभरात अनेक ठिकाणी अद्याप शाळा उघडलेल्या नाहीत. उशीर न करता देशभरातील सर्व शाळा सुरु कराव्यात, असं डॉक्टरांनी म्हटलेय. शाळा बंद असल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी उशीर व्हायला नको, असं त्यांनी म्हटलं आहे. 


वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आधीच नुकसान झालं आहे. शारिरीक आणि मानसिक नुकसान तर होतच आहे. त्याशिवाय सामाजिक जडणघडणही होत नाही. यावर उपाय म्हणजे, लवकरात लवकर शाळा सुरु करायला हव्यात, असं राष्ट्रीय निओनॅटोलॉजी फोरमचे राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश तोमर यांनी सांगितलं. त्यांनी नुकतेच हरियाणा सरकारला ऑनलाइन शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबतची माहिती गिली. हरियाणामध्ये ऑनलाइन शाळा हा पर्याय नाही. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू केल्या आहेत. सर्व मुले योग्य पद्धतीने शिकत आहेत, असेही ते म्हणाले. 


एमएनएफचे अध्यक्ष डॉ. रंजनकुमार पेजवर म्हणाले की, 'सोमवारपासून कर्नाटकमध्ये शाळा सुरु होणार आहेत. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही धोका नाही. पालकांचेही लसीकरण पूर्ण झालं आहे. मुलं कोरोना नियमांचं पालन करत आहेत. ते सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा नियमीत वापर करत आहेत.'  23 ऑक्टोबरपासून नागपूरमध्ये मुलांच्या आजारासंदर्भात असणाऱ्या निओकॉन-2021 ही परिषद होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर लोक प्रत्यक्ष उपस्थित असलेला हा पहिलाच कार्यक्रम असेल. कोरोनाची परिस्थिती सुधारली आहे. आता सामान्य परिस्थिती झाली आहे. त्याप्रमाणे आपल्यालाही बदलायला हवं, त्यामुळेच या परिषदेचं आयोजन केल्याचं परिषदेचे अध्यक्ष डॉ. विजय धोत्रे यांनी सांगितलं. 


पुन्हा सगळं पूर्ववत झालं आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्यात कोणताही धोका नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा आपला सामना केला आहे. त्याला आपण चांगल्या पद्धतीने ओळखलेय. काय करायला हवं हे चांगलं माहित आहे. यामध्ये लहान मुलं सगळ्यात जास्त सुरक्षित आहेत. यापैकी अनेकजणांना यााधीच कोरोनाची लागण झाली अन् ते ठिकही झाले. काही मुलांमध्ये तर कोरोनाची लक्षणेही आढळली नाहीत. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवायला हवं, असं डॉ. सतिश डोपुजारी यांनी सांगितलं.