100 Crore Vaccination : लसोत्सव... देशात विक्रम 100 कोटी डोस पूर्ण, देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई!
पुण्यातील शनिवार वाडा : लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला या निमित्ताने देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई, पाहा फोटो!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोलघुमट विजापूर : ऐतिहासिक...विक्रमी...! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता.
मोढेराचे सूर्य मंदिर : या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
खजुराहो : देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले.
बिबी का मकबरा, औरंगाबाद : लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
कुतुब मिनार : आज देशात 24 तासांत 18 हजार 454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
सांचीचा स्तूप : 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
पुण्यातील आगाखान पॅलेस : भारताने आज जो शंभर कोटी लसींचा टप्पा पार केलाय, त्यासाठी ठीक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे.
हंपी : या महत्त्वपूर्ण दिवसाबाबत माहिती देण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात अनाउन्समेंट केली जात आहे. या अनाउंसमेंटमधून आजच्या दिवसाची माहिती दिली जातेय.
चारमीनार : आजचा दिवस ऐतिहासिक, 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम: पंतप्रधान नरेंद्र मोदी