- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Coronavirus LIVE UPDATES | कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा उद्रेक
Coronavirus LIVE UPDATES | कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा उद्रेक
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Apr 2020 10:25 PM
कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचा उद्रेक. लॉकडाऊनमध्ये महामार्गाचे काम बंद असल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. संतप्त कामगारांनी काल गुरुवारी दुपारी ऑफिस आणि गाड्यांची तुफान तोडफोड केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. महिनाभर पगार नाही, जेवण व्यवस्थित दिले नसल्याचा कामगारांचा आरोप. संतप्त कामगारांनी केलेल्या तोडफोडीत ऑफिस, केबिन आणि गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलीप बिल्डकाँन या कंपनीकडे आहे. या महार्गाच्या कामासाठी परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. साधारण तीनशेहून अधिक डंपर याठिकाणी कार्यरत असून त्यावर हे परप्रांतीय तरुण काम करत आहेत. 700 हून अधिक परप्रांतीय तरुण या प्रोजेक्टवर काम करत आहेत.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झालाय. 68 वर्षीय महिलेला 14 तारखेला पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आले होतं. पुण्यामध्ये आज दिवसभरात एकूण चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील मृत्यूंची संख्या 48 झाली आहे.
मालेगावमध्ये 14 रुग्णांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह. कोरोनाबाधीत संख्या पोहचली 60 वर. शहरातील विविध भागात हे सर्व रुग्ण सापडले आहेत.
पुणे : अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारुची विक्री करणाऱ्यावर कारवाई, पुण्यात बी.टी.कवडे रोडवर कृष्णानगरमधील एका दारूच्या अड्ड्यावर पुणे पोलिसांचा छापा, दोघांवर गुन्हे दाखल, दारूचे 25 कॅन मिळून 675 लिटर गावठी दारू जप्त, दारूची एकूण किंमत 1 लाख 25 हजार रुपये
अकलुज येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील फिवर क्लिनिकला सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलुज ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना साथीपासून होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी व रुग्णालयातील डॉक्टर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वॅब कलेक्शन करणेकरिता कोविड विस्क केबिन ही सुविधा उपलब्ध करून दिली..
बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांची पीएम केअर फंडला पाच कोटींची मदत.
कोरोनाबाबत भीतीमुळे ग्रामीण भागातही आता जागरूकता येण्यास सुरुवात झाली असून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे ग्रामस्थांनी गावकऱ्यांसाठी सॅनिटायझर टनेल उभे केले आहे. वस्तीवरून गावात येताच प्रत्येकाला या टनेलमधून जाऊन निर्जंतुक व्हावे लागते आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातील या जागरूकतेमुळे कोरोनाचा धोका ग्रामीण भागात कमी होण्यास मदत होणार आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात बंद असलेली कापूस खरेदी 20 एप्रिलनंतर सुरू होणार, ऑनलाईन बुकिंग आणि फोनवर बुकिंग करूनही कापूस खरेदी करणार, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे दाखल तर 10 हजार व्यक्तींना अटक, 32 हजार वाहनांवर जप्तीचा कारवाई, पोलीस विभागाची माहिती
सांगली : आयर्विन पुलावरची वाहतूक उद्यापासून पूर्णपणे बंद, अत्यावश्यक सेवा वाहतूक नवीन पुलावरून वळवली जाणार, सांगलीत कोरोनाचा रुग्ण येऊ नये यासाठी सांगली पोलिसांनी घेतला निर्णय, पोलिसानी सांगली शहरातील 44 हून अधिक गल्ल्या लॉक केल्या
ICMR च्या निकषांनुसारच कोविड -19 ची तपासणी करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, निकषात केलेल्या बदलांमुळे कोरोनाबधितांची संख्या कृत्रिमरित्या कमी दिसेल पण संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त असल्याची व्यक्त केली भीती, मुंबई महापालिकेने काढलेल्या 12 आणि 15 एप्रिलच्या आदेशांचा दाखला दिला
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामपंचायत स्तरावर बाहेरगावाहून आलेल्या व्यक्ती यांच्या नोंदणीची कामे सुरु आहेत. हिंगोलीमधल्या सेनगाव तालुक्यातील बन बरडा गावामध्ये आज आशा वर्कर बाहेरगावावरुन आलेल्या लोकांचा सर्वे करत असताना काही गावगुंडांनी एका महिलेला मारहाण केली आहे. प्रभावती सानप अस जखमी झालेल्या आशा वर्कर महिलेचं नाव आहे. काठीने मारहाण करुन चावा देखील घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सेनगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मारहाण झाल्याची तक्रार या महिलेने तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे दिली आहे.
सांगली : आयर्विन पुलावरची वाहतूक उद्यापासून पूर्णपणे बंद, अत्यावश्यक सेवा वाहतूक नवीन पुलावरून वळवली जाणार, सांगलीत कोरोनाचा रुग्ण येऊ नये यासाठी सांगली पोलिसांनी घेतला निर्णय, पोलिसानी सांगली शहरातील 44 हून अधिक गल्ल्या लॉक केल्या
मालेगावमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता तेथिल परिसराची साफ सफाई, स्वच्छतेचा भार सफाई कर्मचाऱ्यांवर अधिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्ग बंद करण्यात आलेले असून तेथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, बंदोबस्तावर असलेल्या काही सफाई कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून असे प्रकार बंद झाले नाही तर काम बंद करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. या कर्णचाऱ्यांकडे अत्यावश्यक सेवेचे कार्ड आणि ओळख पत्र असून सुध्दा त्यांना मारझोड होत असल्याच समोर आलय.
सोलापुरात तरुणांना गर्दी करु नका असे सांगणे नर्सच्या अंगलट आल्याची घटना समोर आली. सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी करु नका असे सांगणाऱ्या नर्स आणि तिच्या पतीची गाडी हुल्लडबाजानी जाळली. सोलापुरातील विडी घरकूल येथे ही घटना घडली. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत यादगिरी, नितीन यादगिरी, अंबादास दोरनाल, अशी आरोपींची नावे आहेत. भा दं वि 435, 34, 188 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब) नुसार तिघांना अटक करण्यात आलीय.
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लोकांचा असंवेदनशीलपणा. कांदे विकायला नेणारा ट्रक पंक्चर झाल्याची संधी साधत लोकांनी लूटले शेतकऱ्याचे कांदे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव हा आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील 103 गावे असून येथील तालुका आणि पोलीस प्रशासनाने ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे येथील नागरिक लॉकडाऊनचे काटेकोर पालन करताना दिसून येत आहेत. या लॉकडाऊनचा मारेगावमध्ये सकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येत आहे. वणी-यवतमाळ महामार्गावर हे मारेगाव असून वाहनांची मोठी वर्दळ येजा रोज या मार्गावर राहत असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका होती. आज लॉकडाऊननंतर येथील मार्गावर अपघात नाहीत. त्यामुळे एक सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई : पनवेलवरून पेणला जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या बाजूला असलेला गावठी दारूचा अड्डा उधवस्त केला. पनवेल शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात कारल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेकडो टन कारली जिल्ह्यातून मुंबईत विक्रीसाठी जातात. शेतकऱ्यांना कारल्याचे पीक घेण्यासाठी जीवापाड मेहेनत घ्यावी लागते. आज याच शेतकऱ्यांवर शेतात पिकवलेली कारली पुन्हा शेतात फेकून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात कारल्याचा प्रचंड साठा झाला आहे. मुंबईला कारली साठवण्यासाठी मार्केटमध्ये जागेचा तुटवडा आहे. याच कारणाने व्यापाऱ्यांनी कारली शेतकऱ्यांकडून नेण्यासाठी नकार दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कारल्याचे पीक पुन्हा शेतात फेकण्याची वेळ आली आहे.
राज्यातील लोकनाट्य कला केंद्रातील 5 हजार कलावंतांच्या मदतीला शरद पवार धावले,
प्रत्येकाच्या खात्यात 3 हजार रुपये तातडीची मदत राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून मदत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात,
अरुण मुसळे यांनी दिली माहिती
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने ऊस तोड मजूरांची अक्षरशः दैना उडाली आहे. कारखाना परिसरात राहणाऱ्या मजूरांच्या पाचशेहुन अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. उरले सुरले धान्य भिजले, अन्नात पाणी साचले. अंथरून पांघरून भिजले. त्यामुळे आम्हाला गावाकडे सोडा अशी मागणी या मजुरांनी केली आहे. पाऊस झाल्यानंतर काही क्षणात हजारो ऊसतोड मजूर एकत्र येऊन गोंधळ सुरू केला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मजूरांची समजूत काढली. दरम्यान मजूरांनी आख्खी रात्र जागून काढली. येथील दत्त कारखान्याच्या परिसरात सुमारे पाच हजार ऊस तोड मजूरांचे वास्तव्य आहे. कारखान्याने सर्व प्रकारची सोय, सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने सर्व काही अस्ताव्यस्त करून टाकले. जवळपास पाचशे खोप्या पडल्या, त्यात एक महिला जखमी झाली. यामुळे घाबरलेल्या मजुरांनी आम्हाला घरी सोडा, अशी मागणी केली आहे.
परभणी शहरात 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. परभणी महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बँका असतील किराणा दुकान भाजी सर्व सुविधा बंद आहेत. केवळ आरोग्य सुविधा सुरू आहेत. त्यामुळे शहर निर्मनुष्य झाले असून पोलीस प्रशासन या संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे दुसरीकडे जिल्ह्यामध्ये दुचाकी वरून दाखल होणाऱ्या 24 जणांना सीमेवरच क्वॉरन्टाईन करण्यात आले असून ज्यांच्या दुचाकी वरून हे 24 जण येत होते त्या आठ दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात आता कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. या कठिण काळात अन्नधान्याचा तुडवडा भासू नये म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पोहोचवले जात आहे. कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतुक मात्र सुरू आहे. कोकण असेल की केरळ, तामिळनाडू या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचं काम सध्या कोकण रेल्वे करत आहे. रत्नागिरीमध्ये देखील कोकण रेल्वेच्या साहाय्यानं 2655 टन धान्य आलं आहे. त्यानंतर हे धान्य आता प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचवलं जाणार आहे. आगामी काळात देखील आता सर्व गोष्टी सुरळीत होईपर्यंत मालवाहतूक करण्यास आणि जीवनावश्यक वस्तुंचा तुडवडा जाणवणार नाही याकरता कोकण रेल्वे प्रत्नशील असणार आहे. आज रत्नागिरीत दाखल झालेली मालगाडी ही हरियाणामधून आली आहे.
मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी आरबीआयने 20 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. तर नाबार्डला आरबीआयने 25 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. करोना व्हायरसचा छोटया आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. रिव्हर्स रेपो रेट 25 बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट 3.75 टक्के असणार आहे.
जगभरात मंदीचं सावट आहे. तसेच जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. यावर्षी 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.
सध्या मानवतेसमोर करोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
देशातील आर्थिक स्थितीवर आरबीआयची नजर आहे. बँक, वित्तीय कर्मचाऱ्यांचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आभार मानले .
देशाच्या अर्थव्यवस्थेवर आरबीआयची नजर : शक्तिकांत दास
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ऊसतोड कामगारांच्या संसाराच पाणी
झालं आहे. कोरोना संकटापेक्षा आमच्यावर आलेली परिस्थिती बिकट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मु सळधार पावसामुळे शिरोळमधील ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उध्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी सोडावं अशी मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आणखी चौघांना कोरोनाची लागण. एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश. हे चौघेही कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. शहराचा आकडा आता 52 वर जाऊन पोहचलाय. पैकी 12 कोरोनामुक्त तर 1 मृत्यू झालाय.
ठाणे जिल्ह्यात गुरुवारी 16 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 289 इतकी झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आढळून आलेल्या नऊ रुग्णांमध्ये दोन पोलिसांचा समावेश असून हा आकडा 110 वर पोहचला आहे. तर मिराभाईंदरमध्ये सापडलेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णामुळे तेथील रुग्णांची संख्या 50 झाली असून अशाप्रकारे 50 रुग्ण आढळणारी मिरा भाईंदर ही जिल्ह्यातील चौथी महापालिका ठरली आहे.
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 289 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 110 झाली असून त्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली- 60, नवीमुंबई- 54 आणि मिराभाईंदर- 50, भिवंडी, उल्हासनगर येथे प्रत्येकी एक, अंबरनाथ - 3, बदलापूर- 4 आणि ठाणे ग्रामीण- 6 असे रुग्ण सापडले आहेत. तर गुरुवारी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात पाच रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. तसेच केडीएमसी मध्ये 3, नवीमुंबईत-2 आणि मिराभाईंदर, ठाणे ग्रामीण येथे प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे संशयित रुग्णांच्या तपासणी अहवालात म्हटले आहे. 13 एप्रिल रोजी वाढलेल्या 56 रुग्णांनंतर रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसत असल्याने ती सुखदायक गोष्ट आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर गावातील एका सोनोग्राफी सेंटरमधील एका डॉक्टरचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 62 गरोदर महिलांना शिक्रापूर मधील हॉटेल्समधे गेले दोन दिवस कॉरंटाईन करण्यात आलं होतं. या सर्व गरोदर महिलांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. त्यानंतर या महिलांना घरी पाठवण्यात आलं आणि त्यांच्या घरामधे त्यांना कॉरंटाईन होण्यास सांगण्यात आलं आहे. 6, 7 आणि 8 एप्रिलला डॉक्टरंनी या गरोदर महिलांची तपासणी केली होती. 9 एप्रिलला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती जी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या एकूण 144 व्यक्तींचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामधे 62 गरोदर महिलांचा समावेश होता.
पार्श्वभूमी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यात आज 286 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 3202 वर
राज्यात आज कोरोनाच्या 286 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3202 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी तीन जण मुंबईचे तर पुण्याचे चार रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 56 हजार 673 नमुन्यांपैकी 52 हजार 762 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 71 हजार 76 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 6108 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 300 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 5 पुरूष तर 2 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 7 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 3202
मृत्यू - 194
मुंबई महानगरपालिका- 2073 (मृत्यू 117)
ठाणे- 13
ठाणे महानगरपालिका- 109 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 68 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 34 (मृत्यू 3)
रायगड- 6
पनवेल- 12 (मृत्यू 1)
नाशिक - 3
नाशिक मनपा- 5
मालेगाव मनपा - 40 (मृत्यू 2)
अहमदनगर- 19 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 9
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)
पुणे- 16
पुणे मनपा- 419 (मृत्यू 44)
पिंपरी-चिंचवड मनपा- 38 (मृत्यू 1)
सातारा- 7 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 12 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 3
कोल्हापूर मनपा- 3
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 28 (मृत्यू 2)
जालना- 2
हिंगोली- 1
परभणी मनपा- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 7
अमरावती मनपा- 5 (मृत्यू 1)
यवतमाळ- 13
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 1
नागपूर मनपा - 55 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 3
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5664 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 20.50 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.