coronavirus LIVE UPDATES | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र, तीन निर्णय तातडीने घेण्याची मागणी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Apr 2020 09:15 PM
भाजपा आमदार आशिष शेलार यांचे वडील बाबाजी शेलार यांचं 85 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन, गेल्या काही महिन्यांपासून बाबाजी शेलार हे आजारी होते. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बारामतीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, कोरोनाचे संक्रमण झालेल्या भाजी विक्रेत्याच्या 12 नातेवाईकांपैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, घराबाहेर न पडण्याचे बारामतीच्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचं नागरिकांना आवाहन
लोकांना अन्नधान्य मिळत नाही, एनजीओकडून सरकार मदत मागत आहे, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची सरकारवर टीका, पालकमंत्री आदित्य ठाकरे फोन उचलत नसल्याचाही आरोप, तबलिगी समाजबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची अबू आझमींनी भेट घेतली
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस स्थानकात जाऊन कोरोनाबाबत आढावा घेतला
पुण्यात करोनाबाधित असलेल्या तिघाजणांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तिघांचेही वय हे 60 वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
पुण्यात करोनाबाधित असलेल्या तिघाजणांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तिघांचेही वय हे 60 वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीन निर्णय तातडीने घेण्याची मागणी केली आहे. केंद्राच्या निर्णयानुसार गरिबांना मोफत धान्य उपलब्ध करुन द्या. फ्रण्टलाईन हेल्थ वर्कर्सना आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावलं उचला. ताब्लिगी जमातची ओळख लपवणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करा, अशा या तीन मागण्यात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही चैत्री एकादशी दिवशी संचारबंदी आणि जिल्हा बंदीचे आदेश मोडून विठूरायाची महापूजा करणारे भाजप आमदार सुरजितसिंह ठाकूर त्यांच्या पत्नी तसेच मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात गुन्हा दाखल केला होता. संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम याचे उल्लंघन करून विठ्ठल मंदिरात एकत्र आले. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे याची जाणीव असताना सुद्धा पूजा अर्चा केल्याचे आरोप आमदार सुरजित ठाकूर आणि मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांचे ठेवले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही चैत्री एकादशी दिवशी संचारबंदी आणि जिल्हा बंदीचे आदेश मोडून विठूरायाची महापूजा करणारे भाजप आमदार सुरजितसिंह ठाकूर त्यांच्या पत्नी तसेच मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात गुन्हा दाखल केला होता. संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम याचे उल्लंघन करून विठ्ठल मंदिरात एकत्र आले. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे याची जाणीव असताना सुद्धा पूजा अर्चा केल्याचे आरोप आमदार सुरजित ठाकूर आणि मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांचे ठेवले आहेत.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठक, मुख्यमंत्री वर्षावरून व्हिसीद्वारे बैठक घेणार , त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल परब, आदित्य ठाकरे उपस्थित

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रीमंडळ बैठक, मुख्यमंत्री वर्षावरून व्हिसीद्वारे बैठक घेणार , त्यांच्याबरोबर छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल परब, आदित्य ठाकरे उपस्थित
कोरोना व्हायरसबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच चुकीच्या पोस्ट किंवा जातीय तेढ निर्माण होतील, अशा पोस्ट शेअर झाल्यास अॅडमिनवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. व्हॉट्सअॅपवर फक्त ग्रुप अॅडमीन पोस्ट करेल अशी सेटिंग करा तसंच फेसबुकवरही टॅगिंग ऑप्शन ऑफ करा. तसंच फेसबुकवर टॅग करणारा आणि ज्याला टॅग केलंय अशा दोघांवर होणार कारवाई, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद पैठण तालुक्यातील पाचोड केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्राअंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळसह मुग डाळ,मटकी डाळ, तूर डाळीचे सम प्रमाणात वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेला 16 मार्चपासून सुट्या देण्यात आल्या आहेत. तसेच यंदा पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा रद्द करुन त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं नियम पालन करत शालेय पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी प्रत्येक पालकमंत्र्यांशी चर्चा करुन जिल्हानिहाय आढावा घेतला जाईल. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर सारख्या जास्त रुग्ण असलेल्या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता कमी आहे. तर ग्रामीण भागात कमी रुग्ण संख्या आलेल्या जिल्ह्यांमध्ये सक्त नियमावली आखून लॉकडाऊन शिथिल करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शेतीकामात अडथळा येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. आज संध्याकाळी राज्य सरकारकडून या आढाव्याचा अहवाल तयार करुन तो केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर लॉकडाऊन उठवण्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.
पालघर जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामध्ये 4 मृतांचा समावेश आहे. पालघर तालुक्यात आतापर्यंत 2 कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वसई तालुक्यात 21 कोरोना पॉझिटिव्ह असून, त्यातील तीन जण वसई ग्रामीण भागातील आहेत आणि 18 जण महानगर क्षेत्रातील आहेत. महानगर क्षेत्रातील 18 पैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 199 तपासणी अहवालांमध्ये 176 निगेटिव्ह आणि 23 पॉझिटिव्ह (90 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी) पालघर तालुक्यातील 3 संशयास्पद मृत्यू झालेल्यांचे घशाचे नमुना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
26 एप्रिलला होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच 10 मे रोजी होणारी दुय्यम सेवा अरापत्रित परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षांच्या तारखा उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल असंही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच उमेदावारांनी वेळोवेळी आयोगाची वेबसाईटही चेक करावी, असं सांगण्यात आली आहे. एमपीएससीची पूर्वपरीक्षा आधी 4 एप्रिलला होणार होती. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ती पुढे ढकलून 26 एप्रिल रोजी घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं. आता मात्र 26 एप्रिलपासून पूर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंब्रा परिसरात लोकांना अजूनही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही. जसे की, लॉकडाऊन नावाचा प्रकार नाहीच आहे, अशा आवेशात सर्व रस्त्यावर, गल्लोगल्ली फिरत आहेत. चौका चौकात उभे राहून पोलीस विनंती, आवाहन आणि कारवाई करताना दिसत आहेत. मात्र लोक त्यांना साथ देत नाहीत. काही पोलीस तर आजारी देखील पडले आहेत. पालिका प्रशासनाने काल पासून येथील भाजी मार्केट बंद केले आहे. त्यामुळे गर्दी कमी होईल असे वाटत असताना आज सकाळपासून तीच परिस्थिती दिसून आली. मुंब्रा हा अतिशय दाटीवतीचा परिसर आहे. तिथे या आधी 2 कोविड-19 चे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे आवश्यक असताना नागरिक मात्र त्याच्या उलट करत असताना दिसत आहेत.

काही शंकाकुशंका करण्याचं कारण नाही.

एक रुग्ण मिळाला आहे,

त्याची काळजी घेतली जात आहे, त्यासोबतच्या लोकांचे सॅम्पल्स घेतले आहे.

हा चहावाला मतोश्रीपासून दूर आहे. त्यामुळे चर्चा आणि शंका करण्याचा करण नाही

. ज्या कर्मचाऱ्यांचा संपर्क आला होता. त्यांची तपासणी सुरू आहे

. झोपडपट्टीत कोरोना

चिंतेची बाब म्हणजे, झोपडपट्टीमध्ये कोरोना गेला तर त्याची लागण वेगाने होते.

पोलीस आणि पालिका संयुक्त कारवाई करत आहे

. कर्मचारी दिवसरात्र काम करत आहे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आहे, असंही बोलताना अनिल परब यांनी सांगितलं आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी या परिसराला भेट दिली असून मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारीही इथे उपस्थित आहेत. परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी; शिवसेना मंत्री अनिल परब यांची भूमिका

, संकट आहे ह्यात आमदार आणि खासदार यांनी पुढे असले पाहिजे अस माझं आणि शासनाचे मत आहे

, याबाबत कॅबिनेट निर्णय घेईल, असं शिवसेना मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे.
धारावीनंतर वांद्र्यातील बेहरामपाड्यात कोरोनाचा शिरकाव, मुंबईच्या मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनानं हात-पाय पसरले , बेहरामपाड्यात कोरोनाचा एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला, सापडलेला रुग्ण निझामुद्दीन येथून आलेला होता, बेहरामपाड्यात रुग्ण राहत असलेली इमारत सील करण्यात आलीय
COVID-19 च्या महामारीत माणुसकीच्या दृष्टीने कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या अमेरिकेसह शेजारच्या देशांना भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करणार, पराराष्ट्र मंत्रालयाची माहिती


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होणार, आज दुपारी एक वाजता बैठक, कोरोनासंदर्भात या बैठकीत होऊ शकतात अनेक महत्वाचे निर्णय
जालन्यातील कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. रांजणी गावातील 1200 लोकांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. संबंधित शिक्षिकेने शालेय पोषण आहाराचे 2 तारखेला वाटप केले होते. अद्याप या शिक्षिकेचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रांजणी गाव सील केले आहे.
जालन्यातील कोरोनाग्रस्त शिक्षिकेच्या संपर्कात आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. रांजणी गावातील 1200 लोकांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. संबंधित शिक्षिकेने शालेय पोषण आहाराचे 2 तारखेला वाटप केले होते. अद्याप या शिक्षिकेचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रांजणी गाव सील केले आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत असतानाच, शेतकऱ्याचे दूध न नाकारता त्याचे पैसे देत, हे जादा झालेले दूध शेतकऱ्याने चक्क सामाजिक वनीकरणातील झाडांना घातले. पंढरपूर तालुक्यातील भांडीशेगाव इथल्या पंढरी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टच्या गणेश पाटील यांच्याकडे सध्या दुधाचे जादा संकलन होत आहे. हे दूध शेतकऱ्यांकडून न घेतल्यास शेतकरी अडचणीत येतो आणि नाही घेतले तर वाया जाते,अशी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना अडचणीत न आणता गणेश पाटील पैसे देऊन हे दूध खरेदी करत आहेत. मात्र हे जादा झालेले दूध टँकरने ते सामाजिक वनीकरणांच्या झाडांना घालत आहेत. 42 एकरवर असलेल्या वनीकरणाच्या झाडांना जिथे पाणी मिळणे मुश्किल आहे, तेथे आता गणेश पाटील यांच्यामुळे दुधाचा अभिषेक होत आहे.
अमरावती शहरातील 59 वर्षीय संशयित रुग्णाचा रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

हा रुग्ण काल 6 तारखेला सकाळी खाजगी रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णाची बायपास सर्जरी झालेली आहे. एक्सरे पाहून संशय आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याचा थ्रोट स्वँब घेण्यात आले असून त्याच्या मुलाला आणि पत्नीला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले. या रुग्णाची कुठेही बाहेरगावी जाण्याची हिस्ट्री नाही असल्याची प्राथमिक माहीती मिळते.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने लॉकडाऊन देखील केलं आहे. मात्र भिवंडीतील भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करत गर्दी केली जात आहे. भिवंडी महापालिका प्रशासनाने भाजीपाला खरेदीसाठी शहरात दोन ते तीन ठिकाणी केंद्र तयार केले आहेत. मात्र मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने सरकारच्या कोणत्याही आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे भिवंडी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. भिवंडीकरांना अजूनही गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यामुळे भिवंडीकरांनी किमान गर्दी टाळावी एवढीच अपेक्षा आहे.
लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री बंद असताना ग्रामीण भागातून मोहफूलाची (देशी) दारू शहरात आणून विकण्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

प्रकाश बावनगडे असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो शनिवारी रात्री कारमधून देशी दारू शहरात तस्करी करताना पकडला गेला होता.

दिवसभर ड्युटी करणं आणि रात्री दारू तस्करी करून नंतर ब्लॅकमध्ये विकणं असा प्रकाश बावनगडेचा दिनक्रम होता.
महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी साजरी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
बारामतीत भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश, बारामतीत सोमवारी कोरोनाचा दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने बारामती नगरपरिषदेचा निर्णय
बारामतीत भाजीपाला, फळे आणि चिकन-मटणची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश, बारामतीत सोमवारी कोरोनाचा दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने बारामती नगरपरिषदेचा निर्णय
कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे महानगरपालिकेने कळवा विभाग पूर्णतः सील करण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा प्रभाग समितीतील सर्व विभाग हे सील केले जातील. गेल्या काही दिवसात ठाण्यातील सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे कळव्यात आढळून आलेले आहेत. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांनी सोमवारी मुंबईत केली आहे.
जगभरात साडे 13 लाख रुग्ण, बळींची संख्या 75 हजारांच्या जवळ, तर दोन लाख 79 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजुन जवळपास साडे नऊ लाख 93 हजार लोक कोरोनाग्रस्त, त्यातील पाच टक्के म्हणजे 47 हजार 518 गंभीर

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात 120 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 868 वर पोहोचली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तात्काळ तपासणी करुन घ्या अस शासनाकडून सांगितलं जातंय. मात्र ही तपासणी कुठे करायची हेच अनेकांनी माहित नाही. राज्यात कोविड 19 ची तपासणी कुठे कुठे होते याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे.

जिल्हानिहाय आणि संस्थानिहाय कोव्हिड-19 तपासणी केंद्रांची यादी




    1. मुंबई महानगर महापालिका - कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई



 




    1. ठाणे जिल्हा, रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका - ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा, मुंबई





    1. पालघर जिल्हा, उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका - हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई





    1. सातारा जिल्हा - बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे





    1. पुणे जिल्हा - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे





    1. अहमदनगर जिल्हा आणि नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे





    1. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, सांगली





    1. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याकरिता - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर





    1. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) - श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे





    1. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्याकरिता - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद





    1. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्याकरिता - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर





    1. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.