एक्स्प्लोर

Corona | मुंबई, पुण्यात नव्या कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता

लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत.

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांची चाचणी करण्याकरता अधिक चाचणी केंद्रे उपलब्ध व्हावेत, या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे आणखी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याची विनंती केली होती. यानुसार मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबई येथे दिली. अमित देशमुख पुढे म्हणाले की, मुंबईतील भायखळा येथील जे.जे.महाविद्यालय रुग्णालयात अशा प्रकारचे चाचणी केंद्र उभारण्यात आले असून यालाही उद्याच मान्यता मिळणार आहे. यामुळे या तीनही तपासणी केंद्रातून दररोज सहाशे नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूर येथे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा चाचणीसाठी केवळ एकच केंद्र उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच मुंबईतील सात खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी मान्यता देण्यासंदर्भातही वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडे केली होती. यानुसार पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस.आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. या प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. दररोज प्रत्येकी 100 नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे. लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता दोनशे तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी शंभर आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सध्या केवळ नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील करोना तपासणी करण्यात येते आणि याची क्षमता 100 तपासण्याचीच आहे. उद्यापासून मुंबई आणि पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या चाचणी केंद्रामुळे सहाशे चाचण्या करण्याची सुविधा नव्याने निर्माण होणार आहे. खाजगी केंद्रांमधून दररोज सातशे तपासण्या होतील. त्याचप्रमाणे लवकरच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रातून 800 चाचण्या अशा एकूण बावीसशे करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Embed widget