नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचं मृत्यूतांडव काही थांबायचं नाव घेत नाही. मागील 24 तासांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 638 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व देशांमध्ये इटलीमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 349 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण चीनमध्ये मात्र मत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. काल चीनमध्ये कोरोनामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम इराणवर झाला आहे. इराणमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 129 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाणून घ्या कोणत्या देशात काय परिस्थिती?

देश एकूण मृत्यू गेल्या 24 तासांतील एकूण मृत्यू  एकूण कोरोना बाधित 
चीन 3226 13 80881
इटली 2158 349 27980
इराण 853 129 14991
स्पेन 342 48 9942
फ्रान्स 148 21 6633

चीन, इटली, इराण, स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांसारख्या देशांचाही समावेश आहे. अमेरिकेमध्ये 19, ब्रिटनमध्ये 20 आणि जर्मनीमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त जपान, स्वीडन, कॅनडा, इजिप्त आणि पोर्तुगालसह 21 देशांमधील लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ : #Coronavirus | खारघरमधील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची क्रिकेट मॅच | स्पेशल रिपोर्ट

जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 7158 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घातक व्हायरसमुळे 1 लाख 82 हजारपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून जवळपास 79 हाजारांहून अधिक जण बरे झाले आहेत. आता जगभरात जवळपास एक लाखांहून कोरोनाग्रस्त आहेत. यांपैकी 6 हजारांहून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

भारतामध्ये 114 लोकांना कोरोनाची बाधा, पाकिस्तानमध्ये मागील 24 तासांमध्ये भारतापेक्षा जास्त आकडा

भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 114 आहे, तर शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये ही संख्या मागील 24 तासांमध्ये वाढली आहे. पाकिस्तानमध्ये 131 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथे एकूण 184 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

भारताबाबत बोलायचे झाले तर येथे सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत. येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 40 वर पोहोचली आहे. केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, भरतात 4 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ओडिशामध्ये एक, केरळमध्ये 23, लडाखमध्ये चार आणि जम्मू-काश्मीरमध्ये तीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू कर्नाटकात, तर दुसरा मृत्यू देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट

Coronavirus | पाकिस्तानमध्येही कोरोनाचा हैदोस; काय आहे परिस्थिती?