एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका, ३० कंटेनर द्राक्ष पडून तर कापसाची निर्यात ठप्प
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस निर्यात ठप्प झाली आहे. तर तीस कंटेनर द्राक्ष ही कोल्ड स्टोरेज पडून राहील्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.
मुंबई : जगाला सध्या या एकच नावानं अक्षरश: कापरं भरवलंय. अनेक क्षेत्रांची अर्थव्यवस्था कोरोनामूळं ढासळली आहे. या विषाणूमूळे चीनसह सर्व जगातील अनेक क्षेत्रं प्रभावित झाली आहेत. याच सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस निर्यात ठप्प झाली आहे. तर तीस कंटेनर द्राक्ष ही कोल्ड स्टोरेज पडून राहील्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत.
कापूस निर्यात ठप्प, महाराष्ट्रात आतापर्यंत 500 कोटींचं नुकसान
जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूचा मोठा फटका कापूस उद्योगाला बसलाय. कोरोनामूळे कापुस निर्यात ठप्प झाल्याने एकट्या महाराष्ट्राचं आतापर्यंत 500 कोटींचं नुकसान झालं आहे.
जगातील सर्वात मोठ्या कापूस बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश आहेय. भारतातून चीन, पाकीस्तान, बांगलादेशासह जगभरात निर्यात होतेय. मात्र, कोरोनामूळे ही निर्यात सध्या संपुर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती आहे. यामूळे देशभरात कापसाच्या भावात मोठी घसरण झाली आहे.
Corona Effect | कोरोनामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत; तब्बल 30 कंटेनर द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून
तीस कंटेनर द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. रोज द्राक्षाची दोन कोटींची उलाढाल होणाऱ्या पुण्यातील जुन्नरमधील बाजारपेठ ठप्प झाली आहे. सध्या तीस कंटेनर द्राक्ष ही कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत.
एका कंटेनरमध्ये पंधरा हजार किलो म्हणजे तब्बल साडे चार लाख किलो द्राक्ष निर्यातीच्या प्रतीक्षेत आहेत. तीन दिवसात विक्री न झाल्याने तब्बल पाच कोटींच्या आसपास ही द्राक्ष पडून आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर हा आकडा वाढणार आहे.
Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एसटी महामंडळाच्या तब्बल 18 हजार बसेसची स्वच्छता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement