LIVE UPDATES | कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, आज कोर्टात सादर करणार आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला जवळपास 320 कोटी रुपयांंच्या 28 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी, रोजगारांची होणार निर्मिती बोगदा बनवून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी; नगरोटा चकमकीनंतर सुरक्षा यंत्रणांचा मोठा खुलासा दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Nov 2020 07:37 AM
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिकरुग्णासारखी वक्तव्य करत आहेत.चंद्रकातदादा वेड्यासारखं आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वक्तव्य करून ते आपलं हसं करून घेत आहेत, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. शरद पवार यांना छोटे नेते म्हटल्या वरून मंत्री मुश्रीफ यांनी घेतला चंद्रकांत दादांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.
भाजपवर धनंजय मुंडे यांची सडकून टीका. आता कोरोनासुद्धा आघाडी सरकारने आणला असेही म्हणतील. पदवीधर निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार चव्हाण यांच्या प्रचारात आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.
राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेत यावे, सत्तारांची विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर. विखे पाटील अनुभवी नेतृत्व, विखे पाटलांच्या नेतृत्वाची राज्याला गरज. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे श्रीरामपुरात मोठे विधान. श्रीरामपूर पंचायत समिती नूतन इमारत भूमिपूजन प्रसंगी दोघे एकाच मंचावर. भूमिपूजन सोहळ्यानंतर वक्तव्य केलं.
26 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या आजच्या बैठकीत असं ठरलंय. पण पंढरपूर आणि देहूतील मंदिरं तेव्हा बंद आहेत. तेव्हा भाविकांनी आळंदीत गर्दी केल्यास त्यावेळची परिस्थिती पाहून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर 13 डिसेंबरचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडेल, याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे.
26 नोव्हेंबरच्या कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर बंद ठेवण्याबाबत निर्णय झालेला नाही. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या आजच्या बैठकीत असं ठरलंय. पण पंढरपूर आणि देहूतील मंदिरं तेव्हा बंद आहेत. तेव्हा भाविकांनी आळंदीत गर्दी केल्यास त्यावेळची परिस्थिती पाहून मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर 13 डिसेंबरचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडेल, याचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता राज्यातल्या जनतेला संबोधणार
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
कल्याण आणि डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्री पुलाचं गार्डर जोडण्याचे काम थांबविण्यात आलं असून केवळ दहा मीटरचे काम शिल्लक असतानाच मेगाब्लॉकची वेळ संपल्याने अखेर हे काम थांबविण्यात आलं आहे. गर्डर जोडत असताना बारा एमएम गर्डर बाजूला सरकल्याने तो पूर्ववत करण्यासाठी वेळ लागला होता. गार्डर जोडण्याचं काम रात्री उशिरा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीतील रेल्वे अधिकाऱ्यांसोबत फोनवरून बोलणी सुरु आहेत.
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिकमधील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 4 जानेवारी पासून नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आजच्या बैठकीत घेण्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापूर : मोहोळ कुरूल रोवर कंटनेर आणि केमिकल टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांना भिषण आग लागली आहे. दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत, तर सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबली आहे.
कल्याण डोंबिवली या दोन नगरांना जोडणाऱ्या पत्रि पुलावरील गर्डर लॉन्चिंगचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. सर्वात मोठ्या साडेसातशे टनाचा गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. काही वेळातच हे काम पूर्ण होणार आहे.
LIVE UPDATES | सोलापुरातल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत समर्थक आक्रमक; बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने कार्यकर्ते आक्रमक
पंढरपूर शहरातील सर्व मठ, धर्मशाळांना पोलीस प्रशासनाने बजावल्या 149 च्या नोटीस, एकही भाविकाला मठात न ठेवून घेण्याचे आदेश
पालघर_मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास चार ते पाच किमी मीटर च्या रांगा असून वाहन शुल्क आकारणीस विलंब होत आहे.
नाशिक : नाशिकमधील शाळा सुरु कराव्यात की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी, मुख्याध्यापक आणि पालक संघटनांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे.
सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक होणार आहे. बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री सतेज पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. विश्वजित कदम उपस्थित राहणार आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्तिकी निमित्त 25 , 26 व 27 हे तीन दिवस विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरात 24 तास अखंड विणेची सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांपैकी एकाची मानाचा वारकरी म्हणून निवड होणार. उपमुख्यमंत्री अजितदादा एकादशी दिवशी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांपासून तीन वाजून 30 मिनिटांपर्यंत सपत्नीक करणार विठ्ठल रुक्मिणीची महापूजा.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील 178 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर सोलापूर शहरात आतापर्यंत प्राप्त झालेले सर्व 330 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास 10 हजार 799 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
कार्तिकी निमित्त 25 , 26 व 27 हे तीन दिवस विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिरात 24 तास अखंड विणेची सेवा देणाऱ्या विणेकऱ्यांपैकी एकाची मानाचा वारकरी म्हणून निवड होणार. उपमुख्यमंत्री अजितदादा एकादशी दिवशी पहाटे 2 वाजून 20 मिनिटांपासून तीन वाजून 30 मिनिटांपर्यंत सपत्नीक करणार विठ्ठल रुक्मिणीची महापूजा.
लातूर : जिल्ह्यात काल दिवसभरात 68 नव्या करोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. काल 938 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात 25 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. तर 999 रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली होती त्यात 43 रुग्ण कोरोनाबाधित आढळले. असे एकूण 68 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तीन करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे या मृत्युमुळे जिल्ह्यातील करोना मुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या 638 वर गेली आहे
हिंगोली : ढगाळ वातावरण आणि हवामानाच्या बदलामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली. काल पडलेल्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात हवामानात बदल झाला आहे. या धुक्याचा शेतातील तूर, हरभरा, गहू, झेंडू, तसेच भाज्या सोबत, फळ पिकांना देखील मोठा फटका बसणार आहे.
कार्तिकी एकादशी दरम्यान देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर बंद राहणार. कोरोनाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या सोहळ्याला गर्दी होऊ नये, म्हणून देवस्थानचा निर्णय. त्यामुळे 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान दर्शन बंद असेल.
कार्तिकी यंत्रकाळात पंढरपूर वरून जाणाऱ्या एसटी बसेस सुरू राहणार मात्र फक्त पंढरपूर मधील नागरिकांना शहराबाहेर उतरत येणार.. एकही भाविकाला पंढरपूरमध्ये नाही उत्तरात येणार ...
सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय
रत्नागिरी : चिपळूणमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे हवेत गारवा
पुण्यातील शाळा बंदच राहणार, पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत 'जैसे थे'च. 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार. पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार.
सोमवार पासून धुळे जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरू होण्याची शक्यता नाही.सोमवारी पुन्हा शिक्षण विभागाची बैठक बोलावण्यात आलीय .त्यात पुढील रूपरेषा ठरणार . जिथं शिक्षक पॉझिटिव्ह आढळेत तेथील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी.-धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची माहिती .
नागपूर जिल्ह्यात शाळा उघडण्यापूर्वीच धोक्याची घंटा, जिल्ह्यात आतापर्यंत 41 शिक्षक कोरोना पॅाजिटीव्ह. ग्रामीण भागात 25 शिक्षकांना कोरोनाची लागण. नागपूर शहरात 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॅाजिटीव्ह. जिल्ह्यात आतापर्यंत 6823 शिक्षकांच्या RTPCR चाचण्या पुर्ण. 9 ते 12 साठी नागपूर जिल्ह्यात 12031 शिक्षकांची आवश्यकता. 23 तारखेपासून जिल्ह्यातील शाळा होणार सुरु.
पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार, महापालिकेचा निर्णय
येवला तालूक्यातील राजापूर येथे मुथ्य रस्त्यावरील चौफुलीवर रात्रीतून अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फुटी भव्य पुतळा विनापरवानगी बसविल्याने राजापूर गावात चांगलीच खळबळ उडाली होती.या घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता परसली होती.घटनेची माहिती मिळत येवला तालूका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले,विनापरवानगी शासनाची कुठलीही परवानगी नसतांना हा पुतळा अज्ञातांनी बसविलेला असल्याने ग्रामस्थस,पोलिस प्रशासन यांच्या मदतीने पुतळा तेथून हटविण्यात आला.हा पुतळा रात्रीतून कोणी बसविला याचा पोलिस अधिक तपास करीत आहे. 
गरज पडल्यास ट्रेन, विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असं वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

औरंगाबाद मनपा क्षेत्रातील शाळा 3 जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार, केवळ विद्यार्थ्यांसाठी 3 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय, शिक्षकांना मात्र शाळेत यावं लागणार
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची गरज नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी केलं आहे. यावरुनच भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेला सवाल विचारला आहे. काँग्रेसच्या भूमिकेचं शिवसेना समर्थन करणार का, असं कदम म्हणाले.
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षच्या घरी एनसीबीचा छापा, एनसीबीकडून अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात शोधमोहीम, ड्रग पेडलरच्या माहितीवरुन एनसीबीचा छापा
राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा मे-जूनमध्ये घेण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी पालक संघटनाकडून केली जाती आहे. सीबीएसईकडून बोर्डाच्या परीक्षाबाबत वेळापत्रक जाहीर करुन लवकरच या परीक्षा कशा घेण्यात येतील? याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याच सीबीएसई कडून सांगितलं आलं आहे. जर राज्यच्या बोर्डाच्या परीक्षा मे मध्ये घेत आहेत तर मग सीबीएसई आयसीएसई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात नाहीतर हा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अस इंडिया वाईड परेन्ट्स असोसिएशनचे म्हणणं आहे. या सीबीएसई, आयसीएसई परीक्षा या फेब्रुवारी मार्च 2021 मध्ये न घेता काही दिवस पुढे ढकलल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल असा पालकांचा म्हणणं आहे. शिवाय, या परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या तर कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नसेल आणि योग्य खबरदारी घेता येईल, अशी सुद्धा पालकांकडून करण्यात येत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. पहाटे पाच वाजल्यापासून जिल्ह्यातील काही भागात रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला असून याचा परिणाम तुरी, गहू, हरभरा पिकांवर बघायला मिळतो आहे.
कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, काल पंतप्रधान मोदींनी देशातील स्थितीचा आढावा; तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली, अहमदाबाद, मध्य प्रदेशात लॉकडाऊनची तयारी
कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक करणार, निवडणूक आयोगाची परवानगी
कार्तिकी यात्रेसाठी 22 नोव्हेंबर रात्री 12 पासून 26 नोव्हेंबर म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत एसटी बस सेवा बंद राहणार आहे. 25 नोव्हेंबर रात्री 12 पासून 26 नोव्हेंबर रात्री 12 पर्यंत शहर व परिसरातील 5 किलोमीटर अंतरापर्यंत संचारबंदी राहणार आहे. मंदिर परिसरात कोणी पोहचू नये यासाठी तिहेरी बॅरिकेट्स लावले जाणार आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर दिंड्या आणि वारकऱ्यांना अडवून परत पाठवले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेकडून 29 मॉल्सना नोटीस, मॉल्समधील अग्निसुरक्षेकडे लक्ष देण्याची सूचना, सिटी सिटी सेंटर मॉलच्या आगीनंतर बीएमसीकडून मॉल्सचा आढावा
दिवाळीनंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार; वीज बिलावरून शॉक देणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा झटका. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
पंढरपूर : लाखो भविकांना विठुराया इतकीच वंदनीय असलेल्या चंद्रभागेत काळ्या सोन्याची रोज वाळू माफियांकडून तिचे वस्त्रहरण केले जात असून लाखो रुपयांचा अवैध वाळू उपसा आता वारकरी भाविकांच्या जीवावर उठला आहे. चंद्रभागेच्या वाळूला पुण्यात मोठी मागणी असून 8 ते 10 रुपये ब्रास इतका सोन्याचा दर असलेली येथील रोज 800 ते 1000 ब्रास वाळूचा शहर व तालुक्यातून बेकायदा उपसा होत असतो. याची सर्व माहिती प्रशासनाला असली तरी राजकीय कार्यकर्ते, उद्दाम झालेले गुंड आणि अधिकाऱ्यांचे हस्तकांचा येथे हैदोस सुरु आहे. वाळूवर एखाद्या अधिकाऱ्याने कारवाई करताच लगेच राजकीय दबावापुढे त्यांना झुकावे लागते. यात वारकरी संप्रदायाचे अनेक मंदिरे व समाध्या बेकायदा वाळू उपशामुळे कोसळण्याची शक्यता आहे.
अमरावती : मेळघाटातील धारणीत आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीत 15 दुकानं जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. धारणी येथील बस स्थानक लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील 10 दुकानांना अचानक आग लागल्याने अंदाजे 15 दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र, या आगीत दुकानात ठेवलेला लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. धारणी पोलीस अधिकारी सह नगर पंचायतचे कर्मचारी, नगरसेवक, यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात नगर पंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी यश मिळालं आहे.
अमरावती शहरात पावसाला सुरूवात...

शहरासह अनेक ग्रामीण भागात अवकाळी पाऊस...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसेच कार, जीप, एसटी व स्कूल बसेस व हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
दिवाळी होताच नाशिकमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळत असून आज देखील जिल्ह्यात 257 संशयित रुग्णाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः एकनाथ खडसे यांनी दिली, प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी ही आपली तपासणी करून घ्यावी, मी लवकर बरा होऊन घरी परत येईल असा विश्वास देखील खडसे यांनी यावेळी व्यक्त केला
राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
शिर्डी आणि राहाता परिसरात अवकाळी पावसाची हजेरी ...
अर्धा तास सुरू होता पाऊस
नगर जिल्हयाच्या‌ उत्तर भागात सर्व दूर ढगाळ वातावरण...
अवकाळी पावसामुळे सरासरी तापमानात वाढ....
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय....
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता....
बुलढाणा - मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्यासह सहा जणांना अटक, दारु पिऊन शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई
उद्यापासून पुण्यात स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव करण्यास परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे उद्या पुण्यातील स्विमिंग पूल अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर उघडले जाणार आहेत. राज्य स्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पोहण्याचा सराव करता यावा यासाठी स्विमिंग पूल सुरू करत असल्याचं महापालिकेनी काढलेल्या आदेशात म्हटलंय. या आधी अनलॉकची प्रक्रिया राबवताना खेळाची मैदानं आणि इन डोअर गेम सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली होती. मात्र, स्विमिंग पूलना त्यातून वगळण्यात आलं होतं. मात्र उद्यापासून पुण्यात स्विमिंग पूल देखील सुरू होणार आहेत.
बारामतीतील नागरिकांनी दिवाळीला सोने खरेदीवर मोठा भर दिला. दसरा ते दिवाळी या दरम्यान बारामती तालुक्यात तब्बल 15 कोटींचे सोन्याची विक्री झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक सोनं खरेदीला पाठ फिरवतील अस सराफांना वाटलं होतं. परंतु ऐन दिवाळीत सोन्याचे भाव हजार ते दीड हजाराने कमी झाल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली. दिवाळी झाली की लग्नाचा मोसम सुरु होतो. दसरा आणि दिवाळीला सोने खरेदी करण्याचे मुहूर्त असतात. म्हणून लोकांनी लग्नसराईत लागणाऱ्या सोन्याची देखील दिवाळीतच खरेदी केली. तर काही लोकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केलं.
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सह 16 जणांवर औरंगाबादच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत शिवसेनेच्या कृष्णा डोनगावकर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. सभासदांची तब्बल 15 कोटींची फसवणूक केल्याचा बंब यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सभासदांचे पैसे स्वत:च्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या नावावर वळते केले असा आरोप कृष्णा पाटील डोनगावकर यांनी केला आहे. याविषयी प्रशांत बंब यांना विचारले असता, राजकीय आकसापोटी आणि बदनामी व्हावी म्हणून हा गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे .ज्यांनी ही तक्रार केली आहे तेच गेल्या दहा वर्षांपासून कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील बंब म्हणाले आहेत
विजेचा शॉक लागून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव पिंपळे येथे घडली आहे. ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव, रामेश्वर अप्पासाहेब जाधव आणि सुनील अप्पासाहेब जाधव अशी तिघांची नावं आहेत. रात्रीच्या वेळेला ज्ञानेश्वर हा शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरु करण्यासाठी गेला होता. मात्र त्याचवेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी दोघे भाऊ गेले असता या दोघांनाही विजेचा धक्का बसल्यानंतर ते दोघे विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली, दरम्यान तिघा भावांचा एकाच वेळी दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होती आहे.
'ती' नटी भाजपचीच कार्यकर्ती; नाव न घेता कंगनावर संजय राऊत यांचा हल्लाबोल, तर कंगनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपचाही राऊतांकडून समाचार
भाजपचा भगवा भेसळयुक्त आहे : संजय राऊत
मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा घाट : संजय राऊत
मुंबईवर शुद्ध भगवा कुणाचा हे जनताच ठरवेल; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
औरंगाबाद : बनावट दस्ताऐवज प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. गंगापूर साखर करखाण्याच्या सभासदांची फसवणूक केल्याचा आरोपही आमदारांसह 16 जणांवर लावण्यात आला आहे.
काल पुणे जिल्ह्यात 722 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीय तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत होती आणि पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 500 होऊन कमी रुग्णांची नोंद होत होती. मात्र बुधवारी पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून आलीय. अर्थात या पाठीमागे चाचण्यांचे वाढलेले प्रमाण हे देखील एक कारण आहे. मात्र दिवाळीच्या खेळात खरेदीसाठी झालेली लोकांची गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत तर ठरणार नाही ना अशी भीती या वाढलेल्या रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येमुळे व्यक्त होतय.
धडगाव तालुक्यातील शहादा रस्त्यावरील धावलघाटपासून तीन किलोमीटर अंतरावर मजुरांना घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात. यात तीन मजूरांना गंभीर दुखापत झाली आहे तर 20 मजूर जखमी लागल्याने शहादा येथे रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
उत्तर भारतीयांच्या छटपूजेचा उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता
कोरोनामुळे समुद्रकिनारी गर्दी न करता घरीच राहून उत्सव साजरा करा,
कृत्रिम तलावांची व्यवस्था करा,
फटाके, आतिषबाजी, ध्वनिक्षेपक यांना बंदी,
मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे हे नियम कटाक्षाने पाळा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी पदी नियुक्ती..

स्वबळावर भाजपाचा महापौर आणू...भातखळकर यांनी मुंबई भाजप कार्यकारिणीत व्यक्त केला विश्वास.
यंदाच्या ६ डिसेंबरच्या महपरिनिर्वाण दिनावर कोरोनाचे सावट आहे
- कोरोनामुळे चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांनी गर्दी न करण्याचे राज्य सरकारचे आवाहन
- चैत्यभूमीवरील दर्शन अनुयायांना घरी बसून लाईव्ह घेण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार
- दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना आदरांजली अर्पण करत असतात
- मात्र यावर्षी कोरोनामुळे चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं सरकारचं आवाहन
- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज चैत्यभूमीची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा भाजपवर आरोप, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे
,
मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने 'सरासरी' कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे
,
भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींच्या जवळपास पोहोचली
,
कोरोना काळात वीज बिले भरले न गेल्याने महावितरणची थकबाकी 9 हजार कोटींनी वाढुन ऑक्टोबरमध्ये 59,102 कोटींवर पोचली
परभणी शहरातील जमजम कॉलनीत चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीचा त्याच्याच पत्नी आणि सासूने दगड -विटानी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या पत्नी आणि सासूला अटक केलीय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगावसह अन्य भाग महाराष्ट्रात सामील करण्याचे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करू असे वक्तव्य केल्याबद्दल कन्नड संघटनांनी अजित पवार यांचा निषेध केला आहे.
दिवाळी काळात कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे. अकोला जिल्ह्यात आज 59 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याची रूग्णसंख्या 8836 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 382 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी आज फुटण्याची शक्यता, जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे अध्यक्ष आणि स्वाभिमानीची आज दुपारी कडेगाव मध्ये होणार दुसरी बैठक , कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर ठरल्याने या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष
गुजरात : गुजरातमधील वडोदरामध्ये भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात 11 जण जागीच ठार झाले आहेत, तर 17 जण गंभीर जखमी आहेत.
मुंबई : तासाभरानंतर मुंबई मेट्रोतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. परंतु, घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा अजूनही विस्कळीत आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोलीला मुंबई पोलिसांकडून तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. 23 आणि 24 नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. वांद्रे कोर्टाच्या आदेशानंतर कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : 'जनआक्रोश' यात्रेपूर्वी ताब्यात घेतलेल्या भाजप नेते राम कदम यांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. राम कदम यांच्या भेटीसाठी नारायण राणे, नीलेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.
मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशनवर तांत्रिक बिघाड; मुंबई मेट्रो सेवा उशिराने
पालघर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना घरातच केलं स्थानबद्ध, प्रमुख कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी बाजाविल्या नोटीसा, गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात घटनास्थळी आंदोलन करणार होते.
मिशन बंगालसाठी भाजपची नवी रणनीती, बंगालची पाच भागांमध्ये विभागणी करून पाच प्रभारी नियुक्त, सुनील देवधर आणि विनोद तावडे या दोघांचा पाचांमध्ये समावेश, विनोद तावडे हे हरियाणाचे प्रभारी, तर सुनील देवधर हे आंध्र प्रदेशचे प्रभारी ही आहेत.. सोबतच बंगालमध्येही जबाबदारी
एबीपी माझाच्या इम्पॅक्टनंतर समितीने आजपासून दोन हजार भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था सुरु केली असून संख्या दुपटीने वाढवूनही काल पहिल्या तासातच ऑनलाईन बुकिंग फुल झाले. गेल्या आठ महिन्यांपासून विठुरायाच्या दर्शनाचा विरह सहन करणारे देशभरातील भाविक ऑनलाईन दर्शन संकेतस्थळ सुरु होताच बुकिंग मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि यामुळेच पहिल्या तासातच दिवसभरातील 10 स्लॉट फुल होताना दिसत आहेत. मंदिर समितीने अजूनही दर्शन संख्या वाढवायची मागणी भविकातून होत असून वाढवलेल्या संख्येमुळे भविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
एबीपी माझाच्या इम्पॅक्टनंतर समितीने आजपासून दोन हजार भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था सुरु केली असून संख्या दुपटीने वाढवूनही काल पहिल्या तासातच ऑनलाईन बुकिंग फुल झाले. गेल्या आठ महिन्यांपासून विठुरायाच्या दर्शनाचा विरह सहन करणारे देशभरातील भाविक ऑनलाईन दर्शन संकेतस्थळ सुरु होताच बुकिंग मिळवण्यासाठी धडपडत असतात आणि यामुळेच पहिल्या तासातच दिवसभरातील 10 स्लॉट फुल होताना दिसत आहेत. मंदिर समितीने अजूनही दर्शन संख्या वाढवायची मागणी भविकातून होत असून वाढवलेल्या संख्येमुळे भविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील खारघर टोलनाक्यावर कोल्हापूरहून बदलापूरकडे जाणाऱ्या बसचा सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये पंचवीस ते तीस जण होते. त्यापैकी बारा ते पंधरा जण जखमी झाले आहेत. जखमींना कळंबोली रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. जखमींमध्ये दोन गरोदर महिलांचा समावेश आहे. जवळपास एक तास प्रवासी या बसमध्ये अडकून होते.
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खंडाळा बोगड्याजवळ अपघात ... मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दुधाचा टँकर पलटी, एक मृत ...
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खंडाळा बोगड्याजवळ अपघात ... मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर दुधाचा टँकर पलटी, एक मृत ...
उरण शहरालगत असलेल्या भवरा येथे अज्ञात इसमाने मोटारसायकल जाळल्या , आठ मोटारसायकल जळून खाक.. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जाळल्या मोटारसायकल.. अज्ञात व्यक्ती विरोधात मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट मेल आयडी तयार केला असून हा मेल आयडी अधिकृत नसून यास कोणी कुठलाही प्रतिसाद न देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले आहे
.Dr.Manik Gursal I. A. S exec.director72@mail.com अशा नावाने हा मेल आयडी असून जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी आपण कोणालाही मेल केला नसून अशा प्रकारच्या बनावट इमेल द्वारे फसवणूक टाळण्यासाठी त्यास प्रतिसाद देऊ नये असे आवाहन केले आहे.
काही शासकीय अधिकाऱ्यांना या मेल आयडी वरून वैयक्तिक मेल गेल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांना विचारणा केल्यावर हा प्रकार उघड झाला. या अज्ञात व्यक्ती च्या विरोधात सायबर सेल मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून PSI दीपाली लंभाते पुढील तपास करीत आहेत.
अलिबागनजीक वाडगाव येथे पीकअपने दोन महिलांना उडवले, एका महिलेचा मृत्यू..

प्रेरणा प्रदीप पवार यांचा मृत्यू, सुशीला वसंत आग्रे जखमी..

सुशीला आग्रे यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल ..
धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कोविडमुळे 1 एप्रिल 2020 रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता मंगळवारी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार आहे.
विठ्ठल भक्तांना खुशखबर, उद्यापासून ऑनलाईन दर्शन भाविक संख्येत दुपटीने वाढ, आता तासाला 200 भाविकांना घेता येणार विठ्ठल दर्शन, उद्यापासून आता रोज 2 हजार भाविकांना मिळणार दर्शन
शिर्डी : धार्मिक स्थळ सुरू करतांना सोशल डिस्टनसिंगचं पालन आणि मास्क घालणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र या दोन्ही गोष्टींचा फज्जा उडाल्याचं दिसून येतंय. 65 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांसह 10 वर्षीय लहान मुलांना देखील दर्शनाला प्रवेश दिला जात असल्याच समोर आलं आहे.
वर्धा : पुलाची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी अर्धदफन आंदोलन, युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली पुलाजवळच अर्धदफन करून घेत आंदोलन, भिडी जवळ भिडी ते आकोली मार्गावर आंदोलनात परिसरातील गावकऱ्यांचा सहभाग, तातडीने पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी
औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळत आहे. माजी खासदार जयसिंह गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पदवीधर निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं.
वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं.
मुंबई : मुंबईच्या अंधेरीतील साकीनाकामध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कसारा : काल रात्रीच्या सुमारास जुना कसारा घाट, हिवाळा ब्रीज जवळ ट्रक 80 ते 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. नाशिकच्या दिशेने शेणखत घेऊन जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे. पोलीस ,आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिकांच्या मदतीने अपघातातील 3 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. तिघांना उपचकरता इगतपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाऊसाहेब गबाले, भागवत पाठक आणि राहुल कुलकर्णी अशी जखमींची नावे आहेत.
मुंबईच्या अंधेरीतील साकीनाका परिसरात मोठी आग, अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची भीती, अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
मुंबई : अंधेरीतील साकीनाका परिसरात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दिल्ली : दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश आलं आहे. जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशिरा ही कारवाई केली.
दिल्ली : दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश आलं आहे. जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी दिल्ली पोलिसांनी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशिरा ही कारवाई केली.
नागपूर : सोनेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जयताळा परिसरात गवतामध्ये एका पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह. मृत महिला तीस ते चाळीस वयोगटातील असून तिची ओळख पटलेली नाही.
पोत्यात भरलेला मृतदेह कुजल्यामुळे अवतीभवती वास पसरल्याने सदर घटना उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविले असून त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, मृत महिलेचे एक हात कापलेल्या अवस्थेत असल्याने हत्येची शक्यता आहे.
शेगावचं श्री संत गजानन महाराज मंदिर आज सकाळपासून भक्तांसाठी खुलं केल्याने आज मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. आज नाशिक, नागपुर अशा शहरांतून भाविक ऑनलाइन ई-पास काढून दर्शनासाठी येत आहेत. संत गजानन महाराज मंदिर संस्थान हे कड़क शिस्तीसाठी ओळखल्या जातं. इथे नियमांच कडेकोट पालन केलं जातय. पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झालीय, भक्त ही शिस्तीने दर्शन घेत आहे. सोशल डिस्टनसिंग, मास्क घालणे यांसारखे कोरोनासंबंधीच्या नियमांच पालन करण्यात येत आहे.
राजू शेट्टीच्या टीकेला सदाभाऊ खोतांचे प्रत्युत्तर, राजू शेट्टीनी 25 वर्ष माझ्या हातात हात घालून काम केले. माझे हात स्वच्छ नव्हते तर 25 वर्षे सोबत काम करताना कसं चालत होते. मी चारित्र्यहीन माणूस आहे, तर शेट्टी आता काय दररोज गोमूत्राने अंघोळ करत आहात काय? राजू शेट्टी यांना निर्वाशासारखं राज्यपालांच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. सदाभाऊ खोत आणि रयत क्रांती संघटनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नावाची गरज आम्हाला नाही.
रतनलाल सी बाफना ज्वेलर्स चे संचालक आणि शाकाहारी चळवळी चे प्रणेते रतनलाल बाफना यांचं रुद्धाप काळाने निधन मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते,गेल्या काही दिवस पासून ते आजारी होते
लातूर जिल्ह्यातील आशिव या गावांमध्ये काल अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे..दारूच्या नशेत असलेल्या वडीलांनी पत्नी बरोबर झालेल्या भांडणाच्या रागात मुलीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला आहे. घटनेची माहिती कळताच भादा पोलिसांनी आरोपी पित्यास अटक केली आहे.
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावलं आहे. कडकनाथमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, पुतना मावशीचे प्रेम नको.
आज पासून महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळ उघडण्याच्या निर्णय दिल्या नंतर हा निर्णय म्हणजे भाजप चा विजय असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरु मंदिर परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून जल्लोष व्यक्त करित मंदिर उघड़नयसाठी भाजपा च्या आंदोलनाच यश प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात फोडलेल्या मात्र फटाके फोडल्याने मन्दिर परिसारत मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीने नाराजी वेक्त करण्यात आली फटाकया बद्दल गुरु मंदिरच्या सेवकानी नाराजगी व्यक्त करित म्हटले की मोदीजिंच्या स्वच्छ भारत अभियानाला भाजपा कार्यकर्त्यांनी डाग लावला.
कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेले ठाण्यातील प्रती शिर्डी साई बाबा मंदिर आज पाडव्याच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे भाविकांना साईंचे दर्शन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक असून दर्शनाच्या रांगेत 3 फुटांचे अंतर देखील ठेवण्यात यावे यासाठी चौकानी बॉक्स करण्यात आले आहे. तसेच साई बाबा मंदिरात दुपारची आरतीसाठी फक्त 50 जणांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळपासून या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. मंदिर सुरू झाल्याने शिर्डीला जाऊ न शकणारे भाविक इथे दर्शनाला येऊन आनंदित झाले आहेत.
बीड : राज्यासह बीड जिल्ह्यात मंदिर उघडावी यासाठी , भाजप कडून अनेक वेळा आंदोलन करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज राज्य सरकारने, कोरोनाचे नियम पाळून मंदिर खुली करण्यास परवानगी दिली आहे.बीड शहरातील बालाजी मंदिर , मारोती मंदिर यासह जिल्ह्यातील वैजनाथ मंदिर ,योगेश्वरी मंदिर ,त्वरिता देवी मंदिर, कंकालेश्वर मंदिर ,खंडेश्वरी मंदिर खुली करण्यात आली आहेत.दरम्यान यावेळी मंदिर उघडल्यानंतर , बीड भाजपच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.दरम्यान हे मंदिर केवळ दिवाळी पुरतेच खुली न राहता ,कायमस्वरूपी सुरू ठेवावे.अशी मागणी करत कोरोनाचे संकट दूर करावं. असं साकडं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी घातलं आहे.
सिंधुदुर्ग : राज्य सरकारने आजपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मीयांची चर्च खुली होणार नाहीत. जोपर्यंत धर्मगुरूचा आदेश येत नाही तोपर्यंत ही चर्च उघडण्यात येणार नसल्याची माहिती सावंतवाडीतील मिलाग्रीस चर्च चे फादर कॅजिटल राॅड्रीक्स यांनी दिली. ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू यांच्याकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत, तो
पर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चर्च पूर्णपणे बंद आहेत. मात्र ही चर्च धर्मगुरूंचे आदेश आल्यानंतर लवकरच सुरु करणार येतील.
तब्ब्ल आठ महिन्यानंतर देवा चरणी लीन होण्याकरता मिळाल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. गणपतीपुळे येथे देखील भाविक दाखल झाले असून गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आहेत. यावेळी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप काही सांगून जातोय. आज पाडव्याच्या दिवशी मंदिरं खुली झाल्यानं आजचा दिवस आमच्यासाठी खरा दिवाळी दसरा असल्याची प्रतिक्रिया भाविक देत आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून भाविक गणपतीपुळे येथे दाखल झाले असून या ठिकाणच्या समुद्र किनारा देखील हळूहळू गजबजताना दिसत आहे. शिवाय, स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला असून निर्णयाबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
बुलढाणा : सरकारने धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुनी मस्जिद जामा मस्जिद तब्बल आठ महिन्यानंतर उघडण्यात आली.
कोरोनाच्या पार्षभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद होती. आता ती उघडण्यात आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुन्या जामा मस्जिदचे मौलाना हाफिज रहमत खान कुरैशी इमाम जामा मस्जिद यांनी तमाम मुस्लिम समुदायाकड़ून ठाकरे सरकारचे आभार मानले आहेत. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
अनेक भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या चांदवड येथिल रेणूका देवीचे मंदीर आज अखेर आठ महिन्यां नंतर भाविकांसाठी उघडे झाले.सकाळीच देवीचा अभिषेक झाल्यानंतर भाविकांना थेट देवीच्या गाभा-यात जाऊन दर्शन घेता आले.मंदीरात प्रवेश करण्यापुर्वीच सर्वप्रथम हात  सॅनेटराईज करुन आत सोडण्यात येत होते.मंदीर उघडल्याने आठ महिन्या पासून बंद असलेली हार-फुल,प्रसादाची दुकान सुरु झाली. 
मुंबईकरांना नव्या डबलडेकर बस मिळणार आहेत. बेस्टच्या ताब्यात नव्या 100 डबल डेकर बेस्ट बस
येणार आहेत. बेस्टच्या ताब्यातील काही डबल डेकर बसचे आयुर्मान संपल्यामुळे आता नव्या 100 डबल डेकर बस खरेदी करण्यात येणार आहेत. या करता बेस्ट प्रशासनाने टेंडर मागवले आहेत. काही कालावधीतच नव्या डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. या बसची रचना जुन्या डबल डेकर प्रमाणे नसेल. नव्या डबल डेकर बसला मागे आणि पुढे असे दोन दरवाजे असतील ते बंद असणार आहेत. मागे आणि पुढे दोन जिने आहेत. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील. या बसमध्ये 70 प्रवासी बसण्याची क्षमता असणार आहे. बसमध्ये इलेक्ट्रिक बोर्ड असेल त्यावर बस कुठून कुठे जाणार याची माहिती प्रदर्शित होईल, त्यामुळे प्रवाश्यांना अचूक थांब्याची अचूक माहिती मिळेल. डबल डेकरमधील खालच्या आणि वरच्या मजल्यावरील वाहकांना एकमेकांशी संपर्क साधायचा असेल तर ती साधनेही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेस्टच्या ताब्यात असलेल्या बसेसचे आयुर्मान संपले की, त्या स्क्रॅप कराव्या लागतात त्यांच्या बदल्यात नवीन बस घ्याव्या लागतात. त्याच पद्धतीने या बसेस घेण्यात येत आहेत.
पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आलेले नागपूरचे भूषण सतई यांनाही आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. कामठीच्या कॅन्टोन्मेंटमध्ये असलेल्या अमर योद्धा इथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांना पुष्पचक्र अर्पण केलं. यानंतर काटोल येथे त्यांच्या घरी पार्थिव नेलं जाईल. गावात त्यांची अंत्ययात्रा निघेल, त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.
कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना आज शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात येत आहे. ऐन दिवाळीत ऋषिकेश शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी ऋषिकेश यांना वीरमरण आलं. ऋषिकेश हे एकुलते एक होते. एकुलता एक असल्याने कुटुंबीयांनी सैन्यात जाण्याला विरोध केला, पण 2018 साली एकदा प्रयत्न करतो म्हणून घरातल्यांनी समजूत काढली आणि पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश सैन्यात भरती झाले. पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाले. गेल्या बुधवारी ऋषिकेश यांचा वडिलांसोबत फोनवरुन संवाद झाला होता. त्यावेळी फोनमधून फायरिंगचा आवाज वडिलांना येत होता. ऋषिकेश यांना एक छोटी बहीण आहे. आज भाऊबीजचा दिवस भावाला ओवळण्याचा दिवस. मात्र आजच्याच दिवशी ऋषिकेश यांची बहीण कल्याणीला भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे.

बीड अॅसिड हल्ला प्रकरण, आरोपी अविनाश राजूरे याला नांदेड पोलिसांनी केली अटक, प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेल्या गंभीर भाजलेल्या जखमी पीडितेचा उपचरा दरम्यान मृत्यू
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सायंकाळी राणा दाम्पत्य जवळपास 500 च्या वर शेतकरी, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होणार होते. उद्या मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून निवेदन देणार, जर मुख्यमंत्री यांनी भेट दिली नाही तर त्याठिकाणी करणार आंदोलन होते.
कार आणि मालवाहू टाटा एसच्या अपघातात चारजण जागीच ठार. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे हा अपघात झाला. संकेश्र्वर यर गट्टी मार्गावर झालेल्या अपघातात चार वर्षाची मुलगी, दोन महिला आणि एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत हे रामदुर्ग तालुक्यातील मुरकिटनाळ गावचे आहेत. गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात सदर अपघाताची नोंद झाली आहे.
विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी जोरदार आंदोलन करणारे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपूरला येण्याची शक्यता
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील शहीद जवान भूषण सतई यांचं पार्थिव नागपूरला दाखल झाले आहे...

श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्थान कडून झालेल्या भ्याड हल्ल्यात झाले होते भूषण शहीद...

नागपूरात शहीद जवान भूषण यांचे पार्थिव आज रात्री कामठीच्या गार्ड रेजिमेंटच्या कॅन्टोन्मेंट परिसरात ठेवण्यात येणार आहे

उद्या सकाळी त्यांना तिथेच सैन्याकडून मानवंदना दिली जाईल, त्यानंतर शहीद भूषण यांचे पार्थिव त्यांच्या काटोल या गावी नेले जाईल, तिथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्य संस्कार केले जाईल..
कोरोना काळात भरघोस आलेल्या बिलांबाबत राज्य सरकार सवलत देण्याची शक्यता मावळली?


महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केला

त्यामुळे वीज बिल वसुली करण्याचे निर्देश महावितरणने दिले

यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केले
बीडमध्ये अॅसिड हल्ला झालेल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील उद्यानं खुली करताना घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झाल्यानं, सारसबाग पुन्हा एकदा बंद करण्यात आलीये. शहरातील 204 छोट्या-मोठ्या उद्यानांपैकी 81 उद्यानं 1 नोव्हेंबरला सुरू करण्यात आली होती. पण 10 वर्षाखालील मुलं, 65 वर्षावरील वृद्ध, गरोदर महिला, आजारी नागरिकांना इथं प्रवेश बंदी होती. तसेच मास्क आणि सोशल डिस्टनसिंग राखणं बंधनकारक होतं. पण याबाबत सुरक्षरक्षकांनी खटकलं की नागरिक वाद घालत असल्याचं दिसून आलं. म्हणून महापालिकेने ही कारवाई केली आहे.
कर्नाटकात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे.मराठा समाजाचा आर्थिक,शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी स्वतंत्र मराठा समाज प्राधिकरण स्थापन करणे आवश्यक आहे.त्यामुळे या बाबत तातडीने कार्यवाही करावी असा आदेश मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्य सचिवांना दिला आहे. कर्नाटकातील मराठा समाजाच्या आमदार आणि लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून निवेदन देवून मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या होत्या.त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बाईक अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,,धुंदलवाडी नाका येथे कंटेनर ने बाईकला जोरदार धडक दिल्याने घडला अपघात
संगेश जानू पाटील 32 आणि निकेश वाढान 30 अशी मृतांची नाव असुन तलासरी पोलीस अधिक तपास करत आहेत
राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी‌ महाविकासआघाडीची राज्यपालांना मुदतीची शिफारस. 15 दिवसात सदस्य नेमण्याची‌ केली सरकारनं शिफारस. 12 आमदारांच्या‌ नावाची‌ यादी देतानाच 15 दिवसात नियुक्तीसाठी शिफारस, सुत्रांची‌ माहिती. 21 तारखेपर्यंत‌‌ राज्यपालांनी राज्यपाल नियुक्त‌ आमदार जाहीर करण्याची शिफारस.
कराड नगरीच्या ज्येष्ठ कलाकार, माजी मुख्याध्यापिका कमलताई ठोके (जिजी) यांचे आज दुपारी बँगलोर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

शिक्षकी पेशा सांभाळत आपला अभिनय जागृत ठेऊन नाटक, राज्य नाट्य स्पर्धा मध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी मराठी चित्रपट शृष्टीला पण आपला बहुमोल वेळ दिला. सासर माहेर, सखाभाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अश्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या व सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी अभिनयाची सेवा सोडली नाही. अल्पावधीत प्रसिद्धीचे शिखर पार करणारी झी मराठीची लागीर झालं जी या सिरीयल मधून त्या घरा घरात जिजी या नावाने परिचित झाल्या आणि नावलौकिक मिळवला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. कमलताई ठोके यांचा मृतदेह 15 नोव्हेंबर 2020 रोजी कराडला सकाळी 6 वाजता मंगळवार पेठ कमलेश्वर मंदिर येथील निवासस्थानी येणार आहे. अंत्यदर्शनानंतर अंत्यविधी कमलेश्वर मंदिर शेजारील स्मशान भूमीत सकाळी 10 वाजता होणार आहे.
औषध पुरवठा करणाऱ्या कोणत्याही वितरकाचे पैसे बुडणार नाहीत योग्य ती माहिती आणि तपशील घेऊन लवकरच कारवाई करण्यात येईल असे मत मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे ..मागील काही दिवसांपासून वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे वितरकांनी औषध पुरवठा बंद केला होता त्यावर वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रतिक्रीया दिली आहे
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
मंदिरे/धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, नक्कीच त्यात उशीर झाला आहे. हे नियमांचे पालन करून आधीच झाले असते तर चांगले झाले असते. आता सोशल डिटन्सिंगचे पालन करून लोकांनी ही मंदिरांमध्ये कोरोनाचा संक्रमण होणार नाही याची काळजी घेत दर्शन घ्यावे. कोरोनाच्या संकट काळात मंदिरे बंद असल्याने मानसिक स्वास्थ्यावर नक्कीच विपरीत परिणाम झाले, आता मंदिरे उघडल्याचे आनंद असल्याच्या प्रतिक्रिया भक्तांनी दिल्या आहेत.
कोल्हापुरातील पन्हाळागडावर धनत्रयोदशीनिमित्त पार पडला दीपोत्सव सोहळा, कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर हायकर्सच्या उपक्रमाचे हे आठवं वर्ष होतं. कोरोनामुळे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांनाच दीपोत्सवासाठी परवानगी देण्यात आली होती.
गेली दोन ते तीन दशके ठाण्यात दिवाळी पहाट ही मासुंदा तलावाच्या शेजारीच, जल्लोषात साजरी केली जाते. अनेक पिढ्या न चुकता दिवाळीच्या पहिल्या दिवशी तलाव पाळी आणि राम मारुती रोडवर भेटीगाठी करायला येतात. पारंपरिक गणवेशात, मराठी संस्कृती सांभाळत ठाणेकर दिवाळी साजरी करतात. मात्र या वर्षी मोजके तरुण तरुणी या परिसरात दिसून आले. काही जण आपल्या तरुणपणापासून इथे येतात ते आज आपल्या मुलांना घेऊन दिवाळी साजरी करायला इथे आले आहेत. यावर्षी जरी जल्लोषात दिवाळी साजरी करता आली नसती तरी पुढच्या वर्षी कोरोनाला हरवून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करु असा निर्धार यावेळी ठाणेकरांनी बोलून दाखवला.
पश्चिम बंगालला केंद्र सरकारची 2707.77 कोटींची मदत आणि महाराष्ट्राला फक्त 268 कोटींची मदत. कमीत कमी आपदाग्रस्तांना मदत करताना भाजपने निवडणूक आणि राजकारण बाजूला ठेवायला हवे. सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्राकडून घ्यायचा आणि सर्वात कमी मदत महाराष्ट्राला द्यायची. महाराष्ट्रासोबत भेदभाव करणारी केंद्र सरकारची आणि भाजपची ही भूमिका निषेधार्ह आहे .
पूर, चक्रीवादळ आणइ इतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या राज्यांना केंद्र सरकारने 4382 कोटी रुपयांची मदत देताना महाराष्ट्रासोबत भेदभाव केला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांचं ट्वीट
कोरोनामुळे मुंबईकर यंदाची दिवाळी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरी करत आहेत. दरवर्षी मुंबईकर दिवाळीच्या पहाटे मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन दिवाळी साजरी करत असतात. यंदा मात्र सिद्धिविनायक मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. काही नागरिक मंदिराच्या बाहेरूनच सिद्धिविनायकाला नमस्कार करून प्रार्थना करताना दिसत आहेत.
कोरोनामुळे मुंबईकर यंदाची दिवाळी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून साजरी करत आहेत. दरवर्षी मुंबईकर दिवाळीच्या पहाटे मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन दिवाळी साजरी करत असतात. यंदा मात्र सिद्धिविनायक मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. काही नागरिक मंदिराच्या बाहेरूनच सिद्धिविनायकाला नमस्कार करून प्रार्थना करताना दिसत आहेत.
दिवाळीनिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून समाधी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी बंद असले तरी साई मंदिरात साध्या पद्धतीने दीपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
भाजपमध्ये केंद्रीय कार्यकारिणीत असलेल्या राज्यातील नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या,

पक्षनिष्ठा दाखवणाऱ्या नेत्यांना केंद्रीय राजकारणात महत्वाचे स्थान,

हरियाणा प्रभारी पदी विनोद तावडे,

मध्यप्रदेश सहप्रभारी पंकजा मुंडे,

दीव दमण, दादरा नगर हवेली प्रभारी विजया रहाटकर,

तर आंध्र प्रदेश सहप्रभारी सुनील देवधर

आरक्षणाच्या मुद्यावर समता परिषद आक्रमक,

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषद तालुका स्तरावर काढणार मोर्चे, 30 नोव्हेंबर आधी निघणार मोर्चे,

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायला नको, समता परिषदेची भूमिका,

आरक्षणाच्या मुद्यावरून पेच प्रसंग निर्माण झाल्याने भूमिका मांडण्यासाठी मोरच्यांच आयोजन,

समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी भुजबळ फार्मवर समता परिषदेची बैठक पार पडली,

बैठकीत नाशिक जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
आरक्षणाच्या मुद्यावर समता परिषद आक्रमक. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी समता परिषद तालुका स्तरावर काढणार मोर्चे. 30 नोव्हेंबर आधी मोर्चे निघणार. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायला नको, समता परिषदेची भूमिका. आरक्षणाच्या मुद्यावरून पेच प्रसंग निर्माण झाल्याने भूमिका मांडण्यासाठी मोर्चाचं आयोजन. समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी भुजबळ फार्मवर समता परिषदेची बैठक पार पडली. बैठकीत नाशिक जिल्हातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला भुजबळ उपस्थित नव्हते, पण त्यांच्या निवासस्थानी बैठक झाल्यानं महत्व.
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान शहीद. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे असं शहीद झालेल्या जवानाचे नाव. ऐन दिवाळीत ऋषीकेश शहीद झाल्याची माहिती समजताच गावावर शोककळा.
यावर्षी शनिवार 14 नोव्हेंबर रोजी पहाटे चंद्रोदयकाली आश्विन कृष्ण चतुर्दशी व प्रदोषकाली आश्विन अमावास्या आहे, त्यामुळे नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आले आहे. लक्ष्मीपूजन प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 8-32 पर्यंत करावयाचे आहे. यावर्षी सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी द्वितीया क्षयतिथी आहे. त्यामुळे बलिप्रतिपदा व भाऊबीज एकाच दिवशी साजरे करावयाचे आहेत. असा योग पूर्वी सन 2009 मध्ये आला होता. आता यानंतर सन 2039 मध्ये असाच योग येणार आहे : दा. कृ. सोमण
रेल्वेने शिक्षकांना आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर उपनगरी सेवांमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
आमदार रवी राणासह 18 शेतकऱ्यांवर अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. सर्वांची वैद्यकीय चाचणी करून थोड्यावेळाने या सगळ्यांना अमरावती जिल्हा न्यायालयात आणलं जाणार आहे. आज आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना घेऊन मोझरी येथे रास्तारोको आंदोलन करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालणाऱ्या सरकारचा निषेध करत आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात म्हणून मी पण माझी दिवाळी कारागृहात काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आणि अन्नत्याग आंदोलन करेल अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली.
वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा. संप होणार नाही, दिवाळीत नागरिकांना मोठा दिलासा.
भाजपमध्ये केंद्रीय कार्यकारिणीत असलेल्या राज्यातील नेत्यांना नव्या जबाबदाऱ्या. पक्ष निष्ठा दाखवणाऱ्या नेत्यांना केंद्रीय राजकारणात महत्वाचे स्थान. हरियाणा प्रभारी पदी विनोद तावडे. मध्यप्रदेश सहप्रभारी पंकजा मुंडे. दीव दमण, दादरा नगर हवेली प्रभारी विजया रहाटकर. तर आंध्र प्रदेश सहप्रभारी सुनील देवधर.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबतची राज्यभरातील 25 संघटनांची ऑनलाइन सुरू असलेली बैठक फिस्कटली. संघटनांची कामगारांना सानुग्र अनुदान आणि पगारवाढीचा दुसरा हफ्ता देण्याची मागणी.
चक्रीवादळ निसर्गसाठी (Nisarga) महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपयांची मदत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून चार राज्यांना एकूण 4381.88 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.
चंद्रपूर : केंद्र सरकारने आपत्ती मदतीत गलिच्छ राजकारण केले, केंद्र सरकारला या राज्यातील जनतेने मतदान केले, कोकणात प्रचंड नुकसान झाले असताना केंद्र सरकारने सापत्न वागणूक दिली. केवळ महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवले असे नाही बिहार मध्येही हीच स्थिती होती. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने केंद्राने मदतीत सूड उगविल्याची मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया.
अमरावती : आमदार रवी राणा आणि काही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूर महामार्ग मोझरी येथे पोलिसांकडून तब्बल दोन तास थांबविण्यात आला होता. मोझरी येथे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टीकडून शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन सुरु असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती.
बेळगाव-खानापूर मार्गावरील काटगाळी गावानजीक कमलनगर इथे डंपर आणि दुचाकीच्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.
रेणुका रमेश यग्गुर (वय 28) आणि कमलेश करेप्पा करवी (वय 25) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही देसुर येथील डेपोच्या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सेवा करत होते. हे बहिण-भाऊ दुचाकीवरुन देसुरकडे निघाले होते. डंपरला ओव्हरटेक करुन जाण्याच्या प्रयत्नात दुचाकी या अवजड वाहनांच्या खाली आली. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. रेणुकाचा विवाह झाला होता. तिच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत.
राज्य सरकारच्या औषध खरेदी कक्षाने औषध वितरकांचे तब्बल 220 कोटी रुपयांची बिले थकवले आहेत. त्यामुळे राज्यातील 100 औषध वितरकांनी 12 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून शासनाला औषध पुरवठा बंद केला आहे. तसेच कोणत्याही निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात औषध कोंडी निर्माण होऊन औषधांचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींसाठी 4 एफएसआय दिला जाणार असून या इमारतींचा पुनर्विकास सिडकोच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांकडून केला जाणार आहे. शहरातील धोकादायक सिडको आणि खाजगी इमारतींना जादाचा 4 एफएसआय देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी उपस्थित होते. शहरातील धोकादायक इमारतींना 4 एफएसआय देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. सिडकोकडून पुढील काही महिन्यात याबाबत अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. सरकारने 4 एफएसआय मंजूर केल्यास शहरातील सिडकोनिर्मित 66 हजार कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींसाठी 4 एफएसआय दिला जाणार असून या इमारतींचा पुनर्विकास सिडकोच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांकडून केला जाणार आहे. शहरातील धोकादायक सिडको आणि खाजगी इमारतींना जादाचा 4 एफएसआय देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी मागणी केली आहे. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी उपस्थित होते. शहरातील धोकादायक इमारतींना 4 एफएसआय देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून त्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. सिडकोकडून पुढील काही महिन्यात याबाबत अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. सरकारने 4 एफएसआय मंजूर केल्यास शहरातील सिडकोनिर्मित 66 हजार कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे.
जालना जिल्ह्यातल्या मंठा तहसीलदारांना पिठलं भाकर देऊन आंदोलन करण्यात आलं. राज्यात ठाकरे सरकारने तूटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आज भाजपच्या वतीने मंठा तहसीलसमोर पिठलं भाकर खाऊन अनोखं आंदोलन करण्यात आलं. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. दरम्यान तहसीलदार सुमन मोरे यांना पिठलं भाकर देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
भिवंडी : दोन दिवसापूर्वी झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना भिवंडी शहरात पुन्हा अग्निकांड पाहायला मिळाला भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात मेन कार्पोरेशन नावाच्या यंत्रमाग कारखान्याला सकाळी 06:30 च्या सुमारास भिषण अशी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आसपासचा परिसर रहवासी असल्याकारणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लागलेल्या या आगीमुळे पत्रे फुटत असल्याकारणाने आसपासच्या नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर बाहेर काढून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापडांचा साठा तसेच कोम साठवून ठेवण्यात आलं होतं अचानक लागलेल्या या आगीत संपूर्ण यंत्रमाग कारखाना जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे . मनसुक जाखरिया असे मालकाचे नाव असून या आगीचे लोड भिवंडी शहराच्या काळात कोपऱ्यातून पाहता येत होते परंतु आधीच मुख्य कारण काय आहे ते अजूनही समजू शकले नसले तरी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही एक ते दोन तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोलापूर : सोलापुरातील मुख्य बाजारपेठेत चोरांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास चार-पाच दुकानांत चोऱ्या झाल्याची घटना समोर आली आहे. नवी पेठ परिसरातील सरगम शॉपी, सर्वोदय ट्रेडर्स, लूक इन, आरती मॅचिंग याशिवाय आणखी एक-दोन दुकानांत चोरी झाली आहे. पहाटे साडे चार ते पाचच्या दरम्यान चोरट्यांनी दुकान फोडले, दुकानांमधील रोकड गायब केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इनोव्हा गाडीतून 3 चोर येऊन चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बुलढाणा : आयपीएल आणि पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्याविरुद्ध आदिवासी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार केली आहे. बुलढाणा जिल्हयातील तामगाव पोलिसांत आदिवासी शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या नावे असलेली शेती बळजबरिने हडपल्याची तक्रार या शेतकऱ्याने पारस्कर यांच्याविरोधात केली आहे. पदाचा बेकायदेशीररित्या वापर केल्याचाही पारस्कर यांच्यावर आरोप या शेतकऱ्यानं लावला आहे. तक्रारित अनिल पारस्कर, त्यांचे वडिल,भाऊ यांच्यासह इतर चार जणांची नावं देण्यात आली आहेत.
पारस्कर व कुटुंबियांपासून संरक्षण मिळण्याचीही या आदिवासी शेतकऱ्याने मागणी केली आहे. तक्रारिच्या प्रति मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा पाठविल्या आहेत.
दिवाळीत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि खाद्यपदार्थ विकण्यासाठी आणले जातात. ठाणे येथे यावर्षी दोन वेगळ्या प्रकारचे स्टॉल आम्हाला दिसले. कोपरी येथे सुरू असलेल्या स्वराज इंडिया बाजार मध्ये शेणाच्या पणत्या आणि फटाके चॉकलेट्स विकण्यास ठेवले गेले आहेत. या दोन्ही गोष्टींना ग्राहकांचा देखील भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर : बर्फीमध्ये भेसळ करणाऱ्या अवैध मिठाई विक्रेत्याच्या कारखान्यावर धाड मारून 1 लाख 19 हजार रुपयांची 553 किलो बर्फी नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन व पोलीस विभागाने जप्त केली आहे. नागपूरच्या वाडी नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या लावा गावात एका भाड्याच्या घरात हा अवैध मिठाई कारखाना सुरु असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. गुप्त सूचनेवरून विभागाने लावा गावातील या कारखान्यावर धाड मारली. 42 वर्षीय मेघराज राजपुरोहित नावाच्या व्यक्तीने हा कारखाना गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू केला होता. त्याच्याकडे मिठाई निर्मितीचा कुठलाही परवाना नव्हता. यावेळी दूध पावडर, तयार बर्फी व सॅफोलाइट (Safolite) नावाचा 400 ग्राम रासायनिक पदार्थ देखील प्राप्त झाला आहे. सॅफोलाइट हे पदार्थ घातक असून तो भट्टी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे राजपुरोहित याने सांगितले परंतु हा रासायनिक पदार्थ मिठाई मध्ये वापरत असल्याचा संशय अन्न व औषध विभागाला आहे. पोलीस आणि अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार बर्फी व इतर साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असून सुमारे 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज बिल सवलतीच्या मुद्यावर चर्चा, मात्र निर्णय नाही


वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरू असताना कालच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र बैठकीत सविस्तर चर्चा होऊनही निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळेच मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत माध्यमांशी काही न बोलता निघून गेले.


काल सकाळीही राऊत यांनी याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. वीज बिलात सवलत द्यायची असेल तर साधारणपणे 2 हजार कोटी रुपयांची गरज आहे. मात्र हा निधी द्यायला अद्याप अर्थमंत्री तयार नाहीत. त्यामुळे नितीन राऊत आणि काँग्रेसची अडचण झाली आहे.


काँग्रेसच्या खात्याच्या मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. शिक्षण विभागासंबंधित ज्या शाळा 100 टक्के विना अनुदानित आहेत, त्यांना सरसकट 20% अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तर ज्या शाळांना 20% अनुदान होतं त्यांना अजून 20% अनुदान देऊन एकूण 40% अनुदान देण्याचा निर्णय झाला. पण याबाबतही निधी देण्यात आला नाही. एकीकडे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी हजार कोटींचे पॅकेज एसटी महामंडळाला देण्यात आले आहे. कारण, परिवहन खातं शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे येतं. पण दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांच्या खात्या संदर्भातील निर्णयाबाबत आर्थिक तरतूद होत नसल्याचे काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. दुजाभावावरून काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये असंतोष असल्याचेही समोर आलं आहे.


कोरोना लसीची भारतात किंमत काय असेल? सीरम इन्स्टिट्युटचे अदार पुनावाला म्हणतात...


कोरोना लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच कोरोना व्हायरसवरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र या क्षणी प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न सतत निर्माण होत आहे की कोरोना लसीसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील? ही लस सर्वसामान्यांसाठी नेमकी कधी उपलब्ध असेल? ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणारे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल.


एका मुलाखती पूनावाला यांनी सांगितलं की, 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफोर्डच्या कोविड 19 लसचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होती. या लसीसाठी सामान्य लोकांना 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. भारत आमची प्राथमिकता असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी म्हटलं आहे.


अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने सोमवारी जाहीर केले की कोविड 19 साठीची आमची लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोटिक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींचा तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.


असा असेल भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन दौरा, तीनही फॉर्मेटसाठी संघनिवड


भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. हा दौरा कोविड-19 साथीच्या दरम्यान होत आहे. मुंबई इंडियन्सला आरपीएलचा पाचवा किताब जिंकूण देणारा रोहित शर्मा आणि बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरलेला इशांत शर्मा नंतर या संघात सामील होणार आहे. हे दोघे टेस्ट संघाचा एक भाग आहेत.


भारतीय संघ 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय, तीन टी -20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. सिडनी आणि कॅनबेरा येथे 27 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरदरम्यान एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळल्या जातील. अडलेडमध्ये कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून डे नाईट स्वरुपात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीला पॅटर्निटी रजा देण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याची पत्नी अनुष्का शर्मा आई होणार आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.