LIVE UPDATES | प्राजक्ता गायकवाड वाद, अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोलसे यांची भेट

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत, एबीपी न्यूज सी वोटरचा र्सर्व्हे अर्णब गोस्वामी यांच्या अंतरीम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला दिल्ली- हैदराबाद आज आमने-सामने, विजेता संघ अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Nov 2020 11:39 PM
पंचगंगा नदीमध्ये महिलेची दोन लहान मुलींसह उडी घेऊन आत्महत्या. मुलींना पोटाला ओढणीच्या साह्याने बांधून घेतली उडी. काल सकाळी कामावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडली होती. आज सकाळी करवीर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल झाली होती. कोल्हापुरातील महेंद्र ज्वेलर्स या सराफ दुकानात सदर महिला कामाला होती.
उदयनराजेंच्या कोर्टातअलका कुबल, प्राजक्ताचा वाद

सातारा चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.

काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार रवी सांगळे यांना मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेले ''माझी आई काळुबाई'' या मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.
अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याची माहिती ...अलिबाग येथे न्यायालयीन कोठडी असताना मोबाईल वापरल्याची शक्यता ...

अलिबागमधील क्वारटांईन सेंटरच्या शाळेतील घटना...

मोबाईल संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती ...
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट

ओरस इथल्या शरद कृषी भवन इथे झाली दोघांची भेट

राष्ट्रवादी आणि सेना यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्गात राजकारणाची वेगळी नांदी

दोन नेत्यांमध्ये दहा मिनिटात अधिक चर्चा

कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक सोडून जयंत पाटील यांनी घेतली भेट
फटाके बंदी आणता येईल, परंतु स्वत:हून आपण बंधन घालून घेऊ शकतो का? असा संकल्प करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाचा आलेख खाली आणला, आता येणाऱ्या काळात गर्दीत वावरताना लोकांनी काळजी घ्यावी : मुख्यमंत्री
फटाके बंदी आणता येईल, परंतु स्वत:हून आपण बंधन घालून घेऊ शकतो का? असा संकल्प करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची शक्यता,

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वेगवेगळ्या बैठकीत 81 जागांची तयारी करण्याच्या सूचना,

कोल्हापुरातील कोरोना आटोक्यात येताच महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग ,

माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मेळावा घेत पालिकेवर भगवा फडकवण्याचा इरादा केला स्पष्ट,

तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, कार्यकर्त्याना तयारीला लागण्याच्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना ,

निकालानंतर पुन्हा तीन पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा,

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक
अर्णब गोस्वामी यांच्या अंतरीम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला,

शनिवारी राखून ठेवलेला निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करणार,

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाकडून सूचना जारी
नाशिकमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत कन्टेमेंट झोन तसेच पूर्व घोषित शांतता क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी , 10 नोव्हेंबर 2020 रात्री 12.00 वाजेपासून पासून ते पुढील आदेशापर्यंत बंदी , नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे आदेश , वायू प्रदूषण होऊन जिल्ह्यात नियंत्रित होत असलेल्या कोरोना संसर्गात वृध्दी होऊ नये यासाठी निर्णय
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील भाजपा नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. विनायक हुक्किरे मृत नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. कोल्हापूर-इचलकरंजी रोडवरील रविराज हॉटेल जवळ शनिवारी रात्री बारा वाजता 4 ते 5 जणांनी चाकूने वार करत हत्या केली. घटनेनंतर हल्लेखोर फरार आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली, असून राजकीय वादातून हत्या झाल्याची चर्चा इचलकरंजी शहरात आहे.
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील भाजपा नगरसेविकेच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. विनायक हुक्किरे मृत नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. कोल्हापूर-इचलकरंजी रोडवरील रविराज हॉटेल जवळ शनिवारी रात्री बारा वाजता 4 ते 5 जणांनी चाकूने वार करत हत्या केली. घटनेनंतर हल्लेखोर फरार आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली, असून राजकीय वादातून हत्या झाल्याची चर्चा इचलकरंजी शहरात आहे.
अहमदनगर : नगर-दौंड रोडवर घरगाव शिवारात भीषण अपघात, महाराष्ट्र शासनाच्या जीपची आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात, अपघातात 2 जण जागीच ठार, यामध्ये माथाडी महामंडळाचे निरीक्षक प्रभाकर लोंढे आणि चालक अशोक औटी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर : नगर-दौंड रोडवर घरगाव शिवारात भीषण अपघात, महाराष्ट्र शासनाच्या जीपची आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात, अपघातात 2 जण जागीच ठार, यामध्ये माथाडी महामंडळाचे निरीक्षक प्रभाकर लोंढे आणि चालक अशोक औटी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकी एकादशीची यात्राही कुलूपबंद विठ्ठल मंदिरात होणार. निवडणूक आयोगाच्या परवानगी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्तिकी एकादशी पूजेसाठी येण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मंदिर समितीने सरकारकडे केली आहे. याशिवाय कार्तिकी यात्रेतील मंदिर परंपरा कायम ठेवण्यासही परवानगी मागितली आहे.
LIVE UPDATES | धुळे : जिल्ह्यात दुसऱ्यादिवशी देखील तापमानाचा पारा 10 अंशावर, गारठा वाढल्यानं जनजीवनावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात वाढत्या थंडीमुळे आणि सकाळी असणाऱ्या दाट धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
येवला-मनमाड रोडवर भीषण अपघात, अपघातात 3 ठार तर दोन गंभीर जखमी, अज्ञात वाहनाच्या धडकेत स्विफ्ट गाडीला अपघात, येवला तालुक्यातील सावरगाव जवळील घटना
अर्णब गोस्वामी यांच्या अंतरीम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला, शनिवारी राखून ठेवलेला निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करणार, न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाकडून सूचना जारी
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. याबाबत तोफखाना पोलीस तपास करत आहेत.
चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपालांना भेटणं हा केवळ योगायोग नाही. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य. दादांनी कोल्हापुरात कोरेंच्या घरी बोललेलं वक्तव्य नाकारलं नाही. देवेंद्र फडणवीस आणि दादाच गेले असते. मात्र, फडणवीस हे क्वॉरंटाईन असल्याने दादा एकटेच गेले असावेत. काल आम्ही नावं दिल्यावर आज भेटण्याचे दुसरे कोणतं कारण असू शकतं. चंद्रकांतदादा पाटील यांचा तोल ढासळला आहे की काय असं वाटतं. एका मराठी मुलीचं कुंकू पुसण्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तीच्या मागे उभा राहता? अर्णब यांना पत्रकार म्हणून अटक करण्यात आली नाही.
राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही म्हणून डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या दोन्ही उमेदवारांना पळविले : प्रकाश आंबेडकर
अर्णब गोस्वामींचा अलिबाग जेलमधील मुक्काम वाढला. अर्णब गोस्वामींना तातडीनं कुठलाही दिलासा देऊ शकत नाही : हायकोर्ट. आरोपीकडे अलिबाग सत्र न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा. सत्र न्यायलयानं याचिका दाखल होताच चार दिवसांत जामीनावर निकास द्यावा.
अलिबाग सत्र न्यायालयातील आजची सुनावणी संपली, सरकारी पक्षाने बाजू मांडली, पुढील सुनावणी सोमवारी होणार.
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती विषयी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास वारंवार पत्रव्यवहार करून ही कोणतीही दुरुस्ती होत नसल्याने आज लातूरच्या अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय नांदेड येथे आंदोलन केले. सदर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालया समोर कार्यकर्त्यासह आंदोलन सुरू केले आहे.
राजस्थानमधील फटाके बंदीनंतर आता राज्य सरकारही फटाके बंदीचा विचार करत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. मात्र आरोग्य मंत्र्यांच्याच जिल्ह्यात फटाके बंदीला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूला येऊन आठ महिने झाले. त्यानंतर आता अनलाॅकही झालं. त्यामुळे सर्व फटाके विक्रेत्यांनी लाखो रुपयांचे फटाके खरेदी करुन ठेवले असून ऐनवेळेला सरकारने फटाक्यांवर बंदी घातली तर या व्यवसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं, असं जालना फटाके असोसिएशनने म्हटलं आहे. त्याचबरोबर सरकारला बंदी घालायचीच असेल तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या एमआयडीसीतल्या कंपन्यांवर बंदी घाला, एका दिवसाच्या सणावर बंदी घालून राज्य सरकार काय मिळणार आहे? असा सवाल उपस्थित करत यात फक्त राजकारण होत असल्याचं फटाके असोसिएशनने म्हटलं आहे.
नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीविषयी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणतीही डागडुजी आणि दुरुस्ती होत नसल्याने,.आज लातूरच्या अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय नांदेड येथे आंदोलन केले. या महामार्गाच्या दूरवस्थेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु वारंवार पत्रव्यवहार करुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर कार्यकर्त्यासह आंदोलन सुरु केले आहे.
अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी नाकारण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारची याचिका,

रायगड जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी सोमवारी 9 नोव्हेंबरपर्यंत तहकूब,

अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रायगड पोलिसांची सत्र न्यायालयात याचिका,

न्यायाधीश आर.जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात होणार सुनावणी
पंकजा मुंडे यांच्या जाहीर नाराजी नंतरही भाजपाचे आमदार सुरेश धस यांची ऊस तोड कामगार प्रश्नी पुढाकार,

पुण्यात बाबा आढाव यांची भेट घेवून ऊसतोडणी कामागारांना वाढीव भाववाढ मिळावी,

ऊस तोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा करावा यासाठी मागितली मदत,

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या पाठोपाठ ऊसतोडणी कामगारांसाठी आढावांची बैठक
मराठा आरक्षण प्रश्नावरून आज निघणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चास मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला असून दुपारी एक वाजता नामदेव पायरीचे दर्शन घेऊन या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. काल रात्री उशिरा प्रशासनासोबत झालेल्या चर्चेतून एक प्रस्ताव तयार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार मोजक्या 10 ते 15 आंदोलकांना नामदेव पायरीचे दर्शनासाठी सोडण्यात येणार असून त्यानंतर पायी आक्रोश मोर्चा शहर पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ देत. येथून त्यांना पोलीस वाहनातून मंत्रालयाकडे पाठविले जाईल. जेथे शासनाच्या वतीने अधिकारी या आंदोलकांशी चर्चा करतील. सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही मंत्री या आंदोलकांशी चर्चा करणार नाही.
नोटीस अजून मिळालेली नाही, नोटीस आली की सुप्रीम कोर्टाला अधिकार आहेत की विधीमंडळाला अधिकार आहेत हे तपासून घेऊन मग पुढचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुप्रीम कोर्टाने विधीमंडळ सचिवांना काल जारी केलेल्या नोटीसवर दिली आहे.
रायगड : अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींना दिलेल्या न्यायालयीन कोठडी संदर्भात सुनावणी सुरू, रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुनावणी सुरू
रावसाहेब दानवे यांनी आपल्या जावयावर ठोकला अब्रूनुकसानीचा दावा, तर नातवाला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा हर्षवर्धन जाधवांचा आरोप, पत्नीनेही मुलाला प्रॉपर्टी मिळू नये म्हणून कोर्टात अर्ज केला असल्याचा हर्षवर्धन जाधव यांचा दावा .सोशल मीडियावर केला व्हिडीओ व्हायरल
नॅशनल डिफेन्स एकॅडमीचा १३९ वी पासिॅग आउट परेड समारोह पार पडतोय. या टर्ममधून २१७ कॅडेट एनडीएतलं शिक्षण प्रशिक्षण पूर्ण करुन बाहेर पडत आहेत.
शिक्षक अन् विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्टीत वाढ, उद्यापासून 14 दिवसांची सुट्टी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. उन्हाळी व गणेशोत्सवाच्या सुट्टीतही सुरू होते ऑनलाइन लेक्चर, त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती
विधान परिषदेच्या 12 जागांसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपालांकडे नावे पोहोचली, राष्ट्रवादी-
एकनाथ खडसे समाजसेवा आणि सहकार,
राजू शेट्टी सहकार आणि समाजसेवा,
यशपाल भिंगे साहित्य,
आनंद शिंदे कला,

काँग्रेस-
रजनी पाटील समाजसेवा आणि सहकार,
सचिन सावंत समाजसेवा आणि सहकार,
मुझफ्फर हुसेन समाजसेवा,
अनिरुद्ध वनकर कला,

शिवसेना-

उर्मिला मातोंडकर,
नितीन बानगुडे पाटील,
विजय करंजकर,
चंद्रकांत रघुवंशी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे सरचिटणीस अमोल थोरातांनी निगडी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. पाटील यांचे काही फोटो एडिट करून फेसबुकवर व्हायरल करण्यात आले. तसेच त्यासोबत आक्षेपार्ह मजकूर ही टाकण्यात आला. हे सर्व एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आल्याचा आरोप थोरातांनी केलाय. आयुब जमादार आणि किर्तीसिंह कोरेकर पाटील या दोघांविरोधात तक्रार करण्यात आलीये.
बुलढाणा : डॉक्टरांच्या घरावर महिला जमावाचा हल्ला, हल्ला करून रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांच्या नातेवाईकांना मारहाण. डॉक्टरवरही चाकू हल्ला. डॉ. शिवकुमार काले असं डॉक्टरांच नाव. आज दुपारी 4.00 वाजेदरम्यान संतप्त जमावाचा हल्ला. लाठ्या काठ्यांनी डॉक्टरांची पत्नी, मुलगा, मुलीला जबर मारहाण. साखरखेरडा पोलीस स्टेशनच्या शेंदुर्जन येथील घटना. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. सदर डॉक्टरांनी मुलावर चुकिचा उपचार केल्याचा जमावाचा आरोप. पोलीस कारवाई सुरु आहे.
राजस्थान, ओडिशा, सिक्कीम, दिल्लीनंतर कर्नाटक सरकारचीही फटक्यांवर बंदी
खासगी बसेसना 100 टक्के वाहतुकीची परवानगी, मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही, बस निर्जंतुकीकरण करणे आवश्यक, तिकीट/चौकशी खिडकी स्वच्छ असली पाहिजे, प्रवासाच्या आधी प्रवाशांचे तापमान चेक करावे लागणार, ताप, खोकला, सर्दी असल्यास प्रवासास परवानगी नाही
विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उद्या पासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.पाच नोव्हेंबर मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुट्टी देण्यात आली होती यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उद्या पासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पाच नोव्हेंबर मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने चार हजारहून अधिक ऑक्सिजन सिलिंडर सामाजिक संस्थांना मोफत देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत होता. ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत होते. त्यावेळी अनेक सामाजिक संस्था ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यासाठी पुढे आल्या. रात्री अपरात्री ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासायची. त्यावेळी बेळगाव ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक वेंकटेश पाटील यांनी सामाजिक संस्थांनी मोफत ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची तयारी दर्शवली. रात्री अपरात्री सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सिलिंडर भरून घेण्यासाठी येत असत. त्यावेळी वेंकटेश पाटील मोफत ऑक्सिजन सिलिंडर भरून देत. गेल्या काही महिन्यात त्यांनी चार हजारहून अधिक ऑक्सिजन सिलिंडर मोफत भरून दिली आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक जणांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
विधानसभा हक्कभंग प्रस्ताव प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, अर्णब गोस्वामी यांना अटक करु नये, सुप्रीम कोर्टाचे निर्देश, हक्कभंग प्रस्तावाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना नोटीस पाठवल्याप्रकरणी महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवांना कोर्टाकडून अवमानना नोटीस
गृहमंत्र्यांनी बाकीची स्टंटबाजी बंद करावी आणि कोविडमधील महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे अशी घणाघाती टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईतल्या कुरार परिसरात असणाऱ्या पठाणवाडी जंक्शनजवळ असलेल्या एका खाजगी रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये एका सुरक्षारक्षकाने विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनास्थळी किरीट सोमय्या यांनी भेट दिली. या दरम्यान किरीट सोमय्या यांनी ही टीका केली. तसंच बीएमसीच्या कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत, कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्हीबाबत कोणतीही काळजी घेतली नसून घटना घडून 24 तास उलटले तरी बीएमसीच्या अधिकाऱ्यांना या घटनेबाबत काहीच कल्पना नव्हती अशी माहिती किरीट सोमाया यांनी दिली.
बेळगाव : धारवाड येथील भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी सीबीआयने माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना अटक करून रात्री उशिरा त्यांची रवानगी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात करण्यात आली. 2016 मध्ये भाजप नेते योगेश गौडा यांची हत्या झाली होती. धारवाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विनय कुलकर्णी यांना क्लीन चिट दिली होती.या प्रकरणी सीबीआयकडून निपःक्षपाती चौकशी करावी अशी मागणी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. सप्टेंबर 2019 मध्ये येडीयुरप्पा सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआयने तपास करून धारवाड न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सीबीआयने या प्रकरणात आता पर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या 7 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत आज नागपूर येथे विधिमंडळात आढावा बैठक झाली. तथापि, अधिवेशनासंदर्भात अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर होणार असल्याची माहिती, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.
नागपूर-

हिवाळी अधिवेशन तयारीबाबत नागपुरात बैठक,

तयारी आणि व्यवस्थेबाबतबाबत प्रधान सचिव घेताय आढावा बैठक,

कोरोनामुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेण्याचा आहे आग्रह
मराठा आरक्षणाची सुनावनी पूर्ण होईपर्यंत अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे जालन्याचे समन्वयक अशोक पडूळ यांनी केली आहे. मागणी मान्य न करता प्रवेश प्रक्रिया राबवली तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या तीन-चार दिवसांपासून प्रवेश प्रक्रियेसाठी अतिउत्सुक दिसून येत आहेत. ज्या दिवशी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्यादिवशी शिक्षणमंत्र्यांनी मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रातून वगळण्याचा शासन निर्णय काढून मराठा समाजाबद्दल आपला द्वेष दाखवून दिल्याचा आरोपही अशोक पडूळ यांनी केलाय. मागच्या सत्तर वर्षांपासून हा समाजा अनेक बाबींपासून वंचित राहिलेला आहे. आता मराठा आरक्षणाची सुनावनी चार आठवडे पुढे ढकलेली आहे. त्यामुळं सरकारनं मराठा समाजाच्या भावना समजून घेवून सुनावनी पूर्वी प्रवेश प्रक्रिया करू नये. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सरकारनं तयार राहावं असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.
मुंबई : विधीमंडळाचे नागपूर अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. नागपुरात अधिवेशनाची तयारी करण्यास कमी वेळ उरल्यामुळे अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईत आणि 2021 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. मंगळवारी होणाऱ्या BAC मध्ये याबाबत निर्णय घेण्यात येऊ शकतो.
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 नावांचा प्रस्ताव आज राज्यपालांना सोपवणार, महाविकास आघाडीतील मंत्री संध्याकाळी सहा वाजता स्वतः प्रस्ताव घेऊन राजभवनावर जाणार
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 नावांचा प्रस्ताव आज राज्यपालांना सोपवणार, महाविकास आघाडीतील मंत्री संध्याकाळी सहा वाजता स्वतः प्रस्ताव घेऊन राजभवनावर जाणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी, तुळजाभवानी मंदिर परिसर रिकामा करण्यास सुरुवात, मोठा पोलिस फौजफाटा तैनात, मंदिराच्या 300 मीटर परिसरातून लोकांना हटवले
कालपासून तुळजाभवानी मंदिरासमोर भाजप अध्यात्मक आघाडीचं आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मंदिरासमोर उभारण्यात आलेला मंडपही प्रशासनानं हटवला आहे.
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन तुळजापूर येथे सुरु आहे. आंदोलन स्थळावरील मंडप प्रशासनाने काल रात्री काढून टाकला आहे. तुळजाभवानी मंदिरासमोर नाशिकच्या तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ आणि पुढे आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याला बळी पडणार नाही. जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसकडून सात वेळा आमदार राहिलेले विलासकाका उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उद्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिलजमाई होतेय. यावेळी उंडाळकरांचा मुलगा उदयसिंह उंडाळकर यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय. उदयसिंह उंडाळकर यांनी यावेळची विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढवली होती. काँग्रेसकडून उदयसिंह उंडाळकरांना पक्षातील जबाबदारी दिली जाऊ शकते. सांगलीचे आंदोलन झाले की काँग्रेसचे नेते या कार्यक्रमासाठी कराडला पोहोचतील.
कोल्हापुरात महामार्गावर आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करतानाची घटना.
कोल्हापुरात महामार्गावर आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करतानाची घटना.
सिडकोच्या 14 हजार 500 घर विजेत्यांना अखेर दिलासा. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घराच्या नोंदणीसाठी केवळ 1000 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार. 'मनसे'च्या मागणीनंतर 'सिडको'कडून मुद्रांक शुल्काच्या निर्णयाबाबत स्पष्टता. 'म्हाडा' नंतर आता 'सिडको'च्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क.
ह्या दिवाळीसाठी अन्न सुरक्षा कायद्याखाली एक कोटी 60 लाख कार्डधारकांना एक किलो साखर वीस रुपयाने देण्यात येणार. 23 ते 25 कोटी शासन बोजा सहन करणार. एक कार्डमागे एक किलो साखर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री छगन भुजबळ
राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या प्रस्ताव मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवण्याच्या हालचाली. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री राज्यपालांची भेट घेऊन प्रस्ताव देण्याची शक्यता. यासाठी राज्यपालांची वेळ घेतली जाणार. राज्यपालांनी वेळ दिल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते घेणार राज्यपालांची भेट.
अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी दुपारी तीन वाजता हायकोर्टात पुन्हा सुनावणी. अर्णबला तातडीचा कोणताही दिलासा नाही. अर्णब गोस्वामींना आजची रात्रही अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डातच काढावी लागणार
अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी दुपारी तीन वाजता हायकोर्टात पुन्हा सुनावणी. अर्णबला तातडीचा कोणताही दिलासा नाही. अर्णब गोस्वामींना आजची रात्रही अलिबाग कारागृहाच्या कोविड विलगीकरण वॉर्डातच काढावी लागणार
शालेय शिक्षण विभागाकडून दिवाळीच्या सुट्या जाहीर. ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थी व शिक्षकांना दिवाळीला 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर सुट्या. दिवाळीला फक्त 5 दिवस सुट्या मिळणार असल्याने शिक्षकांकडून मात्र नाराजीचा सूर. दिवाळीच्या सुट्या वाढवून देण्याचा मुंबई शिक्षक परिषद संघटनेची मागणी.
भिवंडी : अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना भिवंडी शहरातील अन्सार नगर भागात घडली आहे . पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. रफिक खान (वय ४०) असे मारेकऱ्याचे तर नसरीन रफिक खान (वय 36) असे मृताचे नाव आहे. रफिक खान यंत्रमाग करखाण्यात काम करीत असून माघील दोन ते तीन वर्षांपासून नसरीन हिचे अनैतिक संबंध असल्याने रफिक व नसरीन यांच्यात नेहमी भांडण होत असे मात्र तीन दिवसापूर्वी नसरीन आपल्या बहिणीकडे राहण्यास आली होती. त्यामुळे रफिक आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचला मात्र अनैतिक संबंधाच्या कारणावरून रफिक व नसरीन यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली व या भांडणाचे रुपांतर हाणामारी देखील झाली मात्र रफिक याचा राग टोकाला जाऊन रफिकने धारदार चाकू हातात घेतला व आपल्या पत्नीच्या पोटावर हातावर सपासप वार करण्यास सुरुवात केली तब्बल दहा ते बारा वार केल्याने पत्नी नसरीन खान रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली व तिचा जागीच मृत्यू झाला.
अन्वय नाईक कुटुंबाप्रमाणे आम्हालाही न्याय द्या. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सेना खासदार ओमराजेंना अटक करा. मयत शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुटुंबाची पत्रकार परिषद.
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर टी 150 मधील आरती ड्रग्स कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या कंडेन्सरमध्ये दबाव वाढल्याने तो फुटल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात कामगार अभय सिंग जखमी झाले असून त्यांच्यावर तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

जळगाव - माजी महापौर अशोक सकपाळे यांच्या मुलाची हत्या, मध्यरात्री घरी परतताना राकेश सकपाळेवर धारदार शस्त्रांनी हल्ला, शिवाजीनगर परिसरातील घटना, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय
रायगड : खोपोली तालुक्यातील साजगाव परिसरातील कंपनीत भीषण स्फोट झाला असून या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोटामुळे सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या परिसराला हादरे बसले आहेत.
अमरावती : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले.
13 दिवसाच्या नवजात बालकाच्या हत्या प्रकरणाचा अखेर काही तासात उलगडा झाला आहे. बाळाच्या आईनेच बाळाला असणारा आजार बघवत नसल्याने नैराश्यातून सिन्टेक्सच्या पाण्याच्या टाकीत बाळाला बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम आणि अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केला. सुरुवातीला बाळाचा मृत्यू झाल्यानंतर भिलवडी पोलीस स्टेशनला तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला होता. मात्र अश्विनी शेंडगे यांनी केलेल्या तपासादरम्यान आईनेच या मुलाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.
मागील 60 तासांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरूच. सोयाबीनची 2 लाख पोत्यापर्यंत विक्रमी आवक
मागील 60 तासांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरूच. सोयाबीनची 2 लाख पोत्यापर्यंत विक्रमी आवक
वर्ष 2020 मध्ये राज्य सरकारला अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले
,
प्रत्येक नैसर्गिक संकटानंतर राज्याने केंद्राला मदतीसाठी पॅकेज ची मागणी केली
,
पण केंद्राकडूम राज्याला एक ही पैसा आलेला नाही
,
1065 कोटी निसर्ग चक्रीवादळ मदत मागितली
,
814 कोटी पूर्व विदर्भातील पूर
,

दोन्ही वेळा टीम आली
प्रस्ताव पाठवले पण अजून एक रुपया मदत आलेली नाही
भंडारा जिल्ह्यातील भंडारा करडी मार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात, अपघातात दुचाकीवरील गर्भवती महिलेचा मृत्यू, तर पती गंभीर जखमी. ट्रक चालक ट्रक घेऊन फरार.
अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल झालेल्या केसचा कोर्टातील युक्तीवाद संपला. अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने सुरु होते उपचार, देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.
माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्याची गरज नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलयं. संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात उषा काकडेंच्या भावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणात संजय काकडे यांच्या विरोधात पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी गरज लागल्यास स्वतः हून न्यायालयात हजर राहू शकतात. त्यामुळं त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलयं.
राज्यातील कंटेनमेंट झोनबाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह उद्यापासून सुरू होणार, 50 टक्के क्षमतेने सुरू होणार, सिनेमागृह, नाट्यगृहात खाण्याचे पदार्थ घेऊन जाता येणार नाही.
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार संजय काकडे यांनी स्वतःच्या मेव्हण्याच्या गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता संजय काकडे आणि उषा काकडे या दोघांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. चतु:शृंगी पोलिस स्टेशनचे काही कर्मचारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात त्यांच्या शोधार्थ गेले होते. परंतु ते त्या ठिकाणी सापडले नाहीत. परंतु त्यांना अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मंत्रालयाबाहेर भाजप नगरसेविका शीतल गंभीर आणि कार्यकर्त्यांनी केले रस्ता रोको आंदोलन. पोलिसांनी घेतले ताब्यात. मंत्रालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढवला
मंत्रालयाबाहेर भाजप नगरसेविका शीतल गंभीर आणि कार्यकर्त्यांनी केले रस्ता रोको आंदोलन. पोलिसांनी घेतले ताब्यात. मंत्रालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढवला
बीड तुरुंगाचे अधीक्षक संजय कांबळे यांचं कोरोनामुळे निधन झालं. संजय कांबळे यांचं कुटुंब पॉझिटिव आले होते. त्यानंतर उपचार घेऊन कालच ते घरी परतले होते. परंतु आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे चाळिशीच्या आत असलेला एक उमदा अधिकारी बीडने गमावला.
वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे महान तपस्वी धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांचे नुकतेच देहावसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराज परिवारातील संपूर्ण आप्तांच्या उपस्थितीमध्ये संत डॉ. रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून महंत बाबुसिंग महाराज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेल्या आणि दहा कोटीपेक्षा अधिक समाज बांधव असलेल्या बंजारा समाजाचे दैवत असलेले क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या कुळातील पोहरादेवी शक्तिपीठाचे अधिपती रामराव बापू महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर या शक्तिपीठाचे पुजारी म्हणून महाराज ( रामावत) परिवारातील हापा नाईक, बधू नाईक, पुरा नाईक परिवारातील वंशजांच्या उपस्थितीमध्ये कोट्यवधी बंजारा समाजाचे यापुढील धार्मिक गुरु म्हणून पूज्य संत डॉ. रामराव महाराज यांच्या नंतर महंत बाबूसिंग महाराज यांची असंख्य भक्तगणांच्या साक्षीमध्ये विधीवत उत्तराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र सरकार,मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना बदनाम करण्यासाठी जून ते ऑक्टोबर या काळात दीड लाख पेक्षा जास्त फेक अकाउंट सोशल मीडियाववर सुरू करण्यात आले, एक हजारहून जास्त BOTs च्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवली गेली, सायबर एक्सपर्ट आणि फॉरेसिंक एक्सपर्टचा अहवाल मुंबई पोलिसांना दिला,
कंगना रनौत आणि तिच्याभोवतीचे विवाद काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी आता कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकलाय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून रितिक रोशन प्रकरणात आपल्याला माफी मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला देताना त्यांनी आपला आवाज खूप जास्त चढवला होता, इतका की आपला थरकाप उडाला असा दावा कंगनानं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे. कंगनाची बहिणी रंगोली हिनंही या घटनेची पुष्टी करत समाजमाध्यमांवर याबाबत कंगनाच्या समर्थनार्थ काही पोस्ट टाकल्या होत्या. मात्र या प्रकरणात काहीही तथ्य नसून यातनं आपली नाहक बदनामी होतेय, असा दावा करत कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी आता कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचं समतंय.
सुशांत सिंग यांच्या आत्महत्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांच्या बदनामीची मोहीम. चीन, हाँगकाँग, नेपाळ या देशातून BOTs माध्यमातून चालवण्यात आली बदनाम करण्याची मोहीम. एक हजारहुन पेक्षा जास्त BOTs च्या माध्यमातून बदनामीची मोहीम राबवली गेली. सायबर एक्स्पर्ट आणि फॉरेसिंक एक्सक्स्पर्ट यांचा याबाबतचा अहवाल मुंबई पोलिसांना देण्यात आला.
मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी 2014 मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल.

याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते
ज्या परिसरात वाहनांची तोडफोड केली, त्याच परिसरात अटक आरोपींची पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज ही धिंड काढली. आजचे आरोपी हे नेहरूनगरमध्ये तुफान राडा घालणारे होते. शंभर जणांच्या टोळक्यापैकी एकूण वीस आरोपी अटकेत आहेत. त्यापैकी पाच आरोपींना आज घटनास्थळी नेण्यात आले. पिंपरी पोलिसांनी मात्र तपासासाठी त्यांना नेल्याचं म्हटलंय. काल वाकड पोलिसांनी देखील सहा आरोपींचं टक्कल करून अशीच धिंड काढली होती. आरोपींना कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी आणि अशी गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची अशी पद्धत निवडलेली दिसते. या पद्धतीच नागरिकांकडून मात्र कौतुक होतंय.
माथेरानच्या मिनिट्रेनची शटल सेवा बुधवारपासून सुरू होणार. माथेरान ते अमन लॉज दरम्यान शटल सेवा सुरू होणार. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर शटल सेवा सुरू होणार. अमन लॉज ते माथेरान दरम्यान एकूण चार फेऱ्या होणार. माथेरान ते अमन लॉज दरम्यान सकाळी 9:30 आणि सायंकाळी 4 वाजता शटल सेवा उपलब्ध.
वर्षा गायकवाड
- पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षण विभाग स्वाध्याय सोडवायला देणार
- विद्यार्थींना व्हॉटस अपद्वारे स्वाध्याय उपलब्ध करून दिला की त्यांना आतापर्यंत शिकवलेले किती समजले ते जाणून घेता येईल
- मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थींसाठी
- ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने स्वाध्याय सोडवायला दिला जाणार
- एका प्रश्नाचे ४ पर्याय दिले जाणार
- स्वाध्यायची लिंक विद्यार्थ्यांना व्हॉटस् अपवर उपलब्ध होणार
जालना : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या परतूरमधील एका शेतकऱ्यानं घरातच उपोषण सुरु केलंय. शिवाजी सवने असं या शेतकऱ्याचं नाव असून ते मागच्या तेरा दिवसांपासून बेमुदत लाक्षणिक उपोषण करत आहेत. अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून सरकारनं शेतकऱ्यांना दहा हजारांच्या मदतीची घोषणा केली. मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळानं 6 हजार 800 रुपयांचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. मात्र ही मदत अत्यंत कमी असून सरकारनं फळबागांना हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी. या मागणीसाठी शिवाजी सवने मागच्या तेरा दिवसांपासून घरीच उपोषण करत आहेत. दरम्यान या उपोषणाची दखल जर प्रशासन घेत नसेल तर शासनानं आत्महत्येची परवानगी द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे.
अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीविरोधात भाजप आमदाराने लेखी तक्रार दाखल केली आहे. अमिताभ बच्चन यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलाय. अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे.
ऑनलाइन शिक्षणाची फी सक्तीने वसूल करणाऱ्या औरंगाबाद येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या विरोधात पालकांनी आंदोलन सुरु केलं आहे. पोदार इंटरनॅशनल शाळा ही फी भरली नाही तर मुलांचे शैक्षणिक नुकसान करते. ऑनलाइन शिक्षणाची लिंक देत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हिच सक्तीची फी वसुली बंद करावी, या मागणीसाठी पालकांनी शाळेसमोर आज निदर्शनं केली.
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा सर्व अर्थाने वैशिष्ट्य पूर्ण राहणार असून यंदा प्रथमच राज्यातील सर्वात मोठा संप्रदाय म्हणून ओळख असलेला वारकरी संप्रदाय या निवडणुकीत सक्रिय झाला आहे . वारी आणि वारकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संप्रदायाचा हक्काचा प्रतिनिधी असावा यासाठी संप्रदायातील तरुण सुशिक्षित पिढी पुढे आली असून आपल्या विचाराचा उमेदवार पदवीधर मतदारसंघात असावा यासाठी त्यांनी शेखर मुंदडा याना आपला पाठिंबा जाहीर केला आहे . काल दिवसभर चाललेल्या गाठी भेटी आणि बैठकीतून हा निर्णय वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर आणि वारकरी संप्रदाय युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी जाहीर केला .
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज एकूण 17 जिल्ह्यातील 94 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आज राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. या टप्प्यात एकूण 1463 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार अवधुत महाराज मंदिर( हातोला ) ते उंबर्डा बाजार या रस्त्यावरील मंदिरारालगतच्या परिसरात एका अज्ञात युवतीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह काल आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावर कडेलाच एका अज्ञात 20 ते 25वयोगटातील युवतीचा जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह गुराख्यांना आढळून आल्याने या घटनेची माहीती परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.
परभणी : भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचं आमरण उपोषण सुरुच असून बोर्डीकरांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ सरसकट मदत देण्याची मागणी बोर्डीकरांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.
मुंबईतील बेस्टसाठीची सेवा स्थगित केल्यानंतर सांगली जिल्ह्यात परतलेल्या एसटीच्या आणखी 46 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच 100 जणांचा अहवाल अजून प्रलंबित आहे. यापूर्वी मुंबईहून आलेले 127 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्याता आता आणखी 46 जणांची वाढ झाली आहे.
राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे. दिवाळीत राजस्थानमध्ये फटाके वाजवत येणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी आहे, अशी बंदी महाराष्ट्रातही घालण्याची मागणी युवा काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली

राजस्थान सरकारकडून फटाक्यांवर बंदी, दिवाळी काळात राजस्थानमध्ये फटाके वाजवत येणार नाही, 31 डिसेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी, अशी बंदी महाराष्ट्रातही घालण्याची मागणी युवा काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली

राज्यातील 5 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर, औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी
एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने “नाथजल” ही शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.
या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याचे नामकरण “नाथजल” असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते त्यांच्या आदर प्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास “नाथजल” हे नाव देण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरविण्यासाठी मे.शेळके बेव्हरजेस प्रा.लि. पुणे (Oxycool) या संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बस स्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे “नाथजल” विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असणार आहे. अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.
टप्याटप्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर “नाथजल” हे एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे.

मुंबई महापालिकेचा कर्मचारी दिवाळी बोनस जाहीर, महापालिका कर्मचारी 15500 रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7750 रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक 4700 रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2350 रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4400 रुपये

मुंबई महापालिकेचा कर्मचारी दिवाळी बोनस जाहीर, महापालिका कर्मचारी 15500 रुपये, अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 7750 रुपये, मनपा प्राथमिक शिक्षक सेवक 4700 रुपये, अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक 2350 रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज म्हणून 4400 रुपये
मराठा आरक्षण प्रकरण आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर मेंशन करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण तोंडी मेंशन केलं. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनात्मक खंडपीठाची रचना करण्याची मागणी केली. सरन्यायाधीशांनी त्यावर सरकारला अर्ज करायला सांगून त्यावर तातडीने निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. त्यानुसार सरन्यायाधीशांसोबत आज झालेल्या मेंशनचा उल्लेख करत राज्य सरकारने या संदर्भात तिसरा अर्जही सुप्रीम कोर्टात दाखल केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधिशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधिशांनी हे सूतोवाच केल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगरप्रिंप्री येथे शेततळ्यात बुडून दोन सख्ख भावांचा मृत्यू झालाय. काल रात्री ही घटना उघडकीस आली. वैष्णव ज्ञानेश्वर बहुले आणि गौरव ज्ञानेश्वर बहुले अशी या मुलांची नावं असून ती इयत्ता सातवी आणि चौथीच्या वर्गात शिकत होती. दोघे भाऊ काल शेतात आई सोबत गेले होते. सायंकाळी पाच वाजता आईने त्यांना घरी जाण्यास सांगितले तेव्हा दोघेही तिथून निघाले. मात्र घरी परतल्यावर मुले घरी नसल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी घरच्यांनी तसेच ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता गावजवळच एका शेततळ्यात वरती एका मुलाची चप्पल आढळून आली. तेव्हा शेततळ्यात शोध घेतला असता दोघेही शेततळ्यात बुडाल्याचे आढळून आले. त्यांना ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढून एकास अंबडला आणि एकास जिल्ह्याला हलवले परंतु डाॅक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना आजच (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत.
नवी दिल्ली : नाफेडच्या दिल्ली कार्यालयानं पंधरा हजार टन कांदा पुरवठ्यासाठी निविदा जारी केली आहे. प्रतिकिलो 50 रुपयांच्या दराप्रमाणे 20 नोव्हेंबरपर्यंत पंधरा हजार टन कांदा पुरवठा करायचा आहे. कांद्याची मागणी आणि पुरवठा साखळी सुरळीत करून वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी ही निविदा प्रसिद्ध केली आहे. देशांतर्गत मागणी कमी करून बाजारात कांद्याची उपलब्धता वाढविणे हा या टेंडर मागचा उद्देश दिसतोय. या टेंडर प्रमाणे 15 हजार टन लक्ष असले तरी तरी यात वाढ होऊ शकते.
हिंगोली : यावर्षी कोरोनामुळे कुशल आणि अकुशल कामगारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आज हिंगोली मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विवाह संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये,मंडप, लॉन मंगल कार्यालय, 500 लोकांमध्ये लग्न किंवा सामाजिक कार्य पार पाडण्याची परवानगी देण्यात यावी. अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये हिंगोली जिल्हा मंडप, साऊंड, लाइटिंग, टेंट , केटर्स , मंगल कार्यालय असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाला स्थगिती असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एबीपी माझाला दिली. महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार असंही त्यांनी सांगितलं.
अश्लील हावभाव केल्याप्रकरणी बेळगावातील एकोणीस वर्षीय कॉलेज तरुणीने निवृत्त सैनिक आणि त्याच्या पत्नीविरोधात कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बलराम कांबळे असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे. बलराम हा आपल्या घरात दररोज मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावतो. सध्या ऑनलाईन क्लास असल्याने विद्यार्थी घरातच अभ्यास करत असतात. मोठ्या आवाजाने त्रास होतो असे सांगण्यास गेल्यावर बलराम याने आपले कपडे काढून अश्लील हावभाव करुन अर्वाच्च शिवीगाळ केली. शिवाय पोलिसात तक्रार केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. त्यामुळे तेथील नागरिकांनी कॅम्प पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून तक्रार नोंदवली.
अश्लील हावभाव केल्याप्रकरणी बेळगावातील एकोणीस वर्षीय कॉलेज तरुणीने निवृत्त सैनिक आणि त्याच्या पत्नीविरोधात कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बलराम कांबळे असे निवृत्त सैनिकाचे नाव आहे. बलराम हा आपल्या घरात दररोज मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावतो. सध्या ऑनलाईन क्लास असल्याने विद्यार्थी घरातच अभ्यास करत असतात. मोठ्या आवाजाने त्रास होतो असे सांगण्यास गेल्यावर बलराम याने आपले कपडे काढून अश्लील हावभाव करुन अर्वाच्च शिवीगाळ केली. शिवाय पोलिसात तक्रार केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. त्यामुळे तेथील नागरिकांनी कॅम्प पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून तक्रार नोंदवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वत्र सध्या दाट धुकं पडत असून नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून थंडीची चाहूल तळकोकणात लागली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र दाट धुकं पाहायला मिळत आहेत सिंधुदुर्गात किमान 22 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी आज (2 नोव्हेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहे. राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर सर्वांचं लक्ष आहे. मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करु शकतात यावर लक्ष असेल. यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत अंतिम झालेल्या नावांची यादी विधी व न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली आहे. जेणेकरुन राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावं बसावीत, अन्यथा पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार


राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.


10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु,असं मुख्यमंत्री म्हणाले होते. अखेर आज यासंदर्भात निर्णय झाला आहे.


वडेट्टीवार म्हणाले, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं होतं. सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहणार नाही असं वचन सरकारने दिलं होतं. ते सरकार पूर्ण करत आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल. ही मदत थेट खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना दोन हफ्त्यात मदत मिळणार आहे. पहिला हफ्ता 4700 कोटीचा असणार आहे.


दिवाळी दिव्यांची, फटाक्यांची फटाळी नाही! राज्य सरकारकडून दिवाळीसाठी गाईडलाईन्स जारी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात फटाकेबंदीवरुन कॅबिनेटमध्ये जोरदार चर्चा झाली.


दिवाळीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या



  • कोरोना संदर्भात असलेल्या SOP चे पालन करावे

  • दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.

  • दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.

  • सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.

  • धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.


महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार का?


राजस्थान, ओदिशा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्यमंत्री मागणी केली. दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनाच्या आजारात श्वासोच्छवासाचा त्रास होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज (5 नोव्हेंबर) टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.


आता WhatsApp वरूनही करता येणार पैसे ट्रान्सफर ; NPCI ने दिली परवानगी


व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जून महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळाली होती. आतादेखील NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे


NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे.


Qualifier 1: मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण! 57 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश


आयपीएल 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या या विजयात जसप्रीत बुमराहची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार बळी घेतले. दिल्लीकडे अद्याप अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. आता ती एलिमिनेटर सामन्यात विजयी संघासह दुसरा पात्रता सामना खेळेल.


या सामन्यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत पाच गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शून्यावर तीन गडी गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स निर्धारित षटकात आठ गडी गमावून केवळ 143 धावा करू शकला.


तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीला आला. दुसर्‍या षटकात सलामीवीर रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने त्याला रोहितचा बळी ठरविला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.