मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 790 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईत 559 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,296 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 121 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2000 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.


आज 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील 27, पुणे शहरातील 3, अमरावती शहरातील 2, तर वसई विरारमधील 1, अमरावती जिल्ह्यामधील 1 तर औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील 1 जण आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील एका जणाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्र सरकारकडून जिल्ह्यांची झोन निहाय यादी जाहीर; फक्त 6 जिल्हे ग्रीन झोनमध्ये


आज झालेल्या मृत्यूंपैकी 28 पुरुष आहेत तर 8 महिला आहेत. आज झालेल्या 36 मृत्यूपैकी 60 वर्षे किंव त्यावरील 19 रुग्ण आहेत. तर 16 रुग्ण हे 40 ते 59 वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांखालील आहे. यापैकी 3 जणांना इतर आजारांबद्दलची माहिती मिळाली नाही. तर उर्वरित 33 जणांपैकी 23 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1,614,092 नमुन्यांपैकी 1,48,248 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आलेआहेत. तर 12,296 जण पॉझिटिव्ह आले आहेत.


संबंधित बातम्या






Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे