मुंबई :  राज्यात आज कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1364 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 25 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर पोहोचली आहे. तर 125 रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.


आज झालेल्या मृत्यूपैकी पुण्यातील 14 मुंबईतील 9, मालेगाव, रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. यामध्ये 15 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण 60 वर्षांपुढील आहेत. तर मुंबईतील एका महिलेचं वय 101 वर्ष आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील आहे. तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णापैकी 21 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे आजार आढळले आहेत.


महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1364


मृत्यू - 97




  • मुंबई – 876 (मृत्यू 54)

  • पुणे – 181 (मृत्यू 24)

  • पिंपरी-चिंचवड – 19

  • पुणे ग्रामीण - 6

  • सांगली – 26

  • नागपूर – 19 (मृत्यू 1)

  • वसई विरार - 11 (मृत्यू 2)

  • पनवेल - 6

  • मीरा भाईंदर - 4 (मृत्यू 1)

  • कल्य़ाण-डोंबिवली – 32 (मृत्यू 2)

  • नवी मुंबई – 31 (मृत्यू 2)

  • ठाणे – 26 (मृत्यू 3)

  • ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण - 3 (मृत्यू 1 पालघर)

  • बुलढाणा- 11 ( 1 मृत्यू)

  • अहमदनगर ग्रामीण - 9 (मृत्यू 1 बुलढाणा)

  • अहमदनगर – 16

  • सातारा – 6 (मृत्यू 1)

  • औरंगाबाद – 16 (मृत्यू 1)

  • लातूर - 8

  • अकोला - 9

  • मालेगाव - 5 (मृत्यू 1)

  • रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपा - प्रत्येकी 4 ( 2 मृत्यू, अमरावती आणि रत्नागिरी)

  • कोल्हापूर – 5

  • उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशीम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग - प्रत्येकी 1 (मृत्यू 1 - जळगाव) गोंदिया – 1

  • इतर राज्ये - 8



आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30,766 नमुन्यांपैकी 28,865 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 1364 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36 हजार 533 जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर 4731 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. राज्यातील ज्या भागांमध्ये क्लस्टर सापडले आहेत तेथे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात अशाप्रकारे एकूण 4261 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 16 लाखांहून अधिक लोकांचं सर्वेक्षण केलं आहे.


संबंधित बातम्या




 Coronavirus | मुंबईत 4 दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 पर्यंंत जाईल; आयुक्त प्रवीण परदेशींचा अंदाज