वाशिम : राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा परिणाम आता थेट रुग्णांना लागणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनवर होताना दिसत आहे. नागपूर येथून अकोला व वाशिमसाठी ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत होता. नागपूर व अकोला येथे कोविडच्या  रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याने परिणामी तेथील रुग्णांसाठी कृत्रिम ऑक्सिजन कमी पडत आहे. त्यामुळे वाशिम येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाने वाशीम  जिल्हाधिकाऱ्यांना कळवले. त्यामुळे वाशिम जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.


वाशीम  जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोना रुग्ण वाढीचा वेग दुप्पट झाला आहे. परिणामी  याचा ताण  रुग्णसेवा देणाऱ्या यंत्रणांवर पडताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी  लागणारा ऑक्सिजन पुरवठा नागपूर, अकोला येथून बंद झाल्याने प्रशासन चांगलच अडचणीत आलं आहे. वाशीम जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या  बाधित रुग्णांचे जीव धोक्यात येतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, रुग्ण वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती


वाशीम जिल्ह्यात कोरोनाची स्थिती


एकूण रुग्ण – 16699
अॅक्टिव्ह रुग्ण – 2658
मृत्यू – 188


वाशिम जिल्ह्यात  सद्यस्थितीत 2 हजार 658 रूग्ण कोविड बाधित आहेत. यापैकी शासकीय कोविड सेंटरमध्ये 8 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 40 रुग्ण कुत्रिम ऑक्सिजन पुरवठ्यावर ठेवण्यात आले आहेत. वाशीम जिल्ह्याची ऑक्सिजन साठवणूक क्षमता 5197 क्युबिक मीटर एवढी आहे. कोविड रूग्णांसोबतच इतर रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा लागण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांमध्ये वाढ झाली तर जिल्ह्याची परिस्थिती गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही.


पंढरपुरात दुकाने चालू ठेवण्यासाठी कोरोना चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक, कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची झुंबड


ऑक्सिजनविना कुणाचाही जीव जाणार नाही- जिल्हा शल्य चिकित्सक


अमरावती ,अकोला नागपूर येथेही रुग्णांची वाढल्यामुळे त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला आहे. मात्र यावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून जालना येथून ऑक्सिजनचा पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ऑक्सिजन विना कोणाचाही जीव जाणार नाही अशी ग्वाही वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी  दिली आहे.