कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली, रुग्ण वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, सध्या कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. राज्यात आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Tags :
Corona Oxygen Shortage Ambulance Oxygen Cylinder Oxygen Van Heath Oxygen Ambulance Oxygen Transport