एक्स्प्लोर

24 तासात उदगीरमध्ये 10 नवे कोरोनाबाधित ; तर एकाचा बळी

जिल्ह्यात एकट्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात 49 रुग्ण आढळून आले आहेत.

लातूर : गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 11 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यामुळे उदगीर शहर कोरोनामुक्त होणार याबाबत जिल्हा प्रशासन आशादायी असतानाच शनिवारी अचानक दहा रुग्णांची भर पडली आहे. तर आज दुपारी एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

जिल्ह्यात एकट्या उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात 49 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 41 रुग्ण हे फक्त उदगीर तालुक्यात आढळून आले असून पैकी एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर 21 जण हे कोरोनामुक्तही झाले आहेत. सध्या सामान्य रुग्णालयात 18 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात आजच्या दहा लोकांचा ही समावेश आहे. शनिवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उदगीर शहरातून 17 नमुने तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उदगीरकारांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 29 मे पर्यंत उदगीर शहरात संचारबंदी वाढविण्यात आली आहे. उदगीर शहर वगळता इतरत्र एकही रुग्ण नसला तरी उदगीर शहरातील आकडेवारी चिंतेची बाब आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यातील निलगा येथे आठ परराज्यातील प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले होते. ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाले होते.

जिल्ह्याची आकडेवारी

एकूण रुग्ण -  49 बाधित रुग्ण उपचार सुरू -  18 बरे झालेले रुग्ण - 29 मृत्यू - 02

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 30 हजारांच्या वर गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा आज 54 वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्या, सोमवारपासून सुरु होणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्र सरकार आज गाईडलाईन्स जारी करणार आहे. केंद्राच्या गाईडलाईन्स आल्यावरच चौथा लॉकडाऊन कसा असेल याबाबत सविस्तर माहिती कळणार आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and Shaina NC: सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
सोनिया गांधींच्या पुस्तकाची पानं टराटरा फाडताना शायना एनसींकडून चूक, एकनाथ शिंदेंनी तातडीने बोलावून घेतलं
Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Maharashtra Live blog updates: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन निवडीतील मोठी अपडेट; भाजपला बाजूला ठेवत राष्ट्रवादी अन् शिवसेनेचा 'दे धक्का
Shaina NC: सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडताना बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
राज्यातील पहिला अंडरवॉटर ड्रोन कोल्हापुरात; पाण्यात उतरुन शोध घेणार, जाणून घ्या काय आहे खास?
Silver Rate : चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण, सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या
चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर रडण्याची वेळ, 10 महिन्यात चांदी 2.56 लाख रुपयांची घसरण
Kolhapur News:
"आडनावापेक्षा गाडीच्या नंबरवरून ओळख!"; कोल्हापूरकरांच्या 'नाद खुळा' फॅन्सी नंबरची राज्यभर चर्चा, नंबरसाठी मोजले तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; काँग्रेस नेत्यांचा संताप, BMC तील ठाकरेंचेही नगरसेवकही चिडले
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Embed widget