एक्स्प्लोर

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नियोजित कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली, नोटांचीही उधळण

नाना पटोले यांच्या नियोजिक कार्यक्रमात  600 ते 800 च्या वर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हे कमी होत की कमी म्हणून आयोजित कार्यक्रमात संगीत महफिलचा  कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

वाशिम : राज्य कुठे तरी कोरोनाच्या  गंभीर परिस्थितीतून  बाहेर पडत असताना हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्या  कमी होऊ लागली आहे त्यामुळे    जनजीवन पूर्वपदावर येत आहे.  अशावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या  इशाऱ्याचं भान महाविकास आघाडीचे  घटक पक्ष असलेल्या  कॉंग्रेसलाच विसर पडल्याचं चित्र समोर आलं आहे. कोविड सेंटरची भेट आणि  कोरोना काळात कॉंग्रेसची कामगिरी आणि पक्ष संघटन याबाबत आढावा घेण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले हे आज वाशीम जिल्हा दौऱ्यावर होते. तेथे कार्यकर्त्यांना गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केलं.

कारंजा शहरातील  एसके  फंक्शन हॉल येथे पक्षाची आढावा बैठक होती.  या ठिकाणी  कोरोना नियमाचा आयोजकांना विसर पडल्याचं दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता. जिथे लग्न कार्य  किंवा अंत्यविधी साठी आणि इतर कार्यक्रम करण्यासाठी  शासनाने निर्बंध घातले आहे. मात्र या हॉलमध्ये  600 ते 800 च्या वर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. हे कमी होत की कमी म्हणून आयोजित कार्यक्रमात संगीत महफिलचा  कार्यक्रम ठेवण्यात आला होता.  या कार्यक्रमादरम्यान  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी  नोटांची उधळण देखील केली. मात्र यावेळी नाना पटोले हे उपस्थित नव्हते. 

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांनी त्यांच्या वयाच्या  वर्षाइतक्या वजनाचा  केक आणला होता. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसोबत तो केक कापून वाढदिवसही साजरा केला. मात्र गर्दी दिसताच त्यांनी कार्यकार्मातून काढता पाय घेतला.  यावेळी नाना पटोलेंसह  कॉंग्रेस नेते  माणिकराव ठाकरे, आमदार वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, आमदार अमित झनक हे उपस्थित  होते.   
   
नाना पटोले उशिरा येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनोरंजनसाठी आयोजक युसुफ पुंजानी हे सगळं आयोजन केलं होतं. युसुफ पुंजानी काही महिन्यांआधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यापूर्वी पुंजानी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप,  बसपा पक्षांमध्ये होते. पुंजानी यांनी कॉंग्रेसमध्ये येताच कोरोना काळात  शक्ती प्रदर्शन करत कोरोना संबंधीने नियमांचं उल्लंघन केलं. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Nagpur MLC Election 2026: काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget