उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. बुधवारी एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या.
उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
Corona Update | राज्यात आज 58,952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 39,624 रुग्णांची कोरोनावर मात
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. उस्मानाबादचे हे चित्र पाहून अनेकांना रडू देखील कोसळल्याचे पाहायला मिळाले.
उस्मानाबादमधील कोरोनाची सद्यस्थिती
उस्मानाबादमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4940 इतकी झाली झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन 590 रुग्ण आढळले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 224 रुग्ण बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी रॅपिड तपासणीत 406 रुग्ण आणि आरटीपीसीआर चाचणीत 184 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबादेत आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 643 वर पोहोचली आहे.
राज्यात आज 58 हजार 952 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 39 हजार 624 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 29 लाख 05 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सद्यस्थिताला एकूण 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.21 टक्के झाले आहे. राज्यात आज 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.64 टक्के आहे.