मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी म्हणजेच, आज रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात येणार असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे.


राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.  


पांडे यांनी सांगितलं की, आपत्कालीन कामासाठी जर कुणी बाहेर पडलं असेल तर त्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही.  जनहितासाठी सरकारनं लॉकडाऊनसारखं पाऊल उचललं आहे, असं पांडे यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं की, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.  


ब्रेक द चेन! काय आहेत निर्बंध?




    • आज सायंकाळी 8 वाजल्यापासून निर्बंध लागणार आहे.





    • मंगळवेढा-पंढरपूरमध्ये मतदान झाल्यावर निर्बंध लागतील.





    • उद्या संध्याकाळपासून राज्यात 144 कलम चालू.





    • पुढचे 15 दिवस संचारबंदी.





    • अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.





    • घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये. 





    • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. 





    • सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.





    • लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.





    • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.





    • पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.





    • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहील.





    • हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.





    • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.



 


काय बंद राहणार? 




    • प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर आजपासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद 





    • रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही. 





    • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद 





    • कामाशिवाय फिरण्यास बंदी 





    • सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद 





    • धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी