नागपूरः एकीकडे शहरात कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे प्रशासनाने आवाहन करुनही नागरिकांकडून खबरदारी घेण्यात येत नाही आहे. कोरोनाला गृहीत धरू नका, लक्षणे दिसली की, चाचणी करा, त्यावर उपचार घ्या, सावध रहा, असा इशारा जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आला.


जिल्हाधिकारी आर. विमला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल आढावा घेण्यात आला. यावर तज्ज्ञांच्या निरीक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. देशात महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. अशावेळी नागरिकांनी लसीकरण पूर्ण करावे. दोन्ही डोस पुर्ण करावे. तसेच पात्र असलेल्यांनी बुस्टर डोसही घ्यावा असे आवाहन करण्यात आले.


'हर घर दस्तक' मोहीम


आरोग्य विभागाने एक जूनपासून  'हर घर दस्तक' ही लसीकरण मोहीम सुरु केली आहे. 31 तारखेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. बारा वर्षांवरील प्रत्येक बालकापासून वयस्क नागरिकांपर्यंत डोस देण्यासाठी घरापर्यंत लसीकरण टीम येणार आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्या सात दिवसांत 12 ते 18 वयोगटांतील 777 मुलांना डोस दिला गेला आहे. 18 वर्षांवरील वयोगटातील 1,567 युवकांना डोस देण्यात आला आहे.


या तालुक्याची गती कमी


नागपूर जिल्ह्यात कामठी व अन्य काही तालुक्यांमध्ये प्रमुख शहरांमध्ये लसीकरणाची गती कमी असल्याचे निदर्शनास आणले गेले. अशाच ठिकाणी अधिक गतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येईल, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिविधींनी, तसेच गावांमध्ये प्रतिष्ठिक नागरिकांनी, युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी यावेळी केले.


इतर महत्वाच्या बातम्या


नागपुरात 3 दिवसांत उष्माघाताचे 4 बळी? रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या व्यक्ती मृत घोषित


राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार; आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद


सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार, BJP समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषदेसाठी भरला अर्ज


चौथी लाट येणार? देशात गेल्या 24 तासांत 7240 नवे रुग्ण, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात