MSP News : खरीप हंगामाच्या तोंडावर देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या 2022-23 च्या हंगामात 14 पिकांचे किमान हमीभाव जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. पिकांच्या हमीभावात 100 ते 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नेमकं कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळाला ते पाहुयात.....
कोणत्या पिकाला किती हमीभाव
सोयाबीन - 4 हजार 300 रुपये (350 रुपयांची वाढ)
कापूस ( मध्यम धागा) - 6 हजार 80 रुपये प्रति क्विंटल (354 रुपयांची वाढ)
कापूस (लांब धागा) - 6 हजार 380 रुपये प्रति क्विंटल (355 रुपयांची वाढ)
तूर - 6 हजार 600 रुपये प्रति क्विंटल (300 रुपये वाढ)
तीळ 7 हजार 830 रुपये (523 रुपयांची वाढ)
मूग - 7 हजार 755 (480 रुपये वाढ)
सूर्यफूल - 6 हजार 400 (385 रुपयांची वाढ)
उडीद - 6 हजार 600 (300 रुपये वाढ)
मका 1 हजार 962 (92 रुपयांची वाढ)
भात (सामान्य) - 2040 (100 रुपयांची वाढ)
भात (ए ग्रेड) - 2060 (100 रुपयांची वाढ)
ज्वारी (हायब्रीड) 2 हजार 970 (232 रुपयांची वाढ)
ज्वारी (मालदांडी) 2 हजार 990 (232 रुपयांची वाढ)
कारळे - 7 हजार 287 (357 रुपयांची वाढ)
बाजरी - 2 हजार 350 (100 रुपयांची वाढ)
रागी - 3 हजार 578 (201 रुपयांची वाढ)
भूईमूग - 5 हजार 850 (300 रुपयांचे वाढ)
एमएसपी (MSP) म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमत ही किमान किंमत असते. ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. सरकार शेतकऱ्याला त्याच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते त्याला एमएसपी म्हणजे हमीभाव म्हणतात. रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा कृषी खर्च आणि मुल्य आयोगाच्या (CACP) शिफारसीनुसार सरकारकडून किमान आधारभूत किंमत जाहीर केली जाते.
महत्वाच्या बातम्या:
- Farmers Crop Rate : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यंदाच्या वर्षात 14 पिकांचा हमीभाव ठरला ABP Majha
- Raju Shetti : शेतमालाला हमीभाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी जागृत होणं गरजेचं, राजू शेट्टींची मेघालयमध्ये पूर्वोत्तर राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा