Coronavirus New Cases : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिसत आहे. गेल्या 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32 हजार 490 वर पोहोचली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव वेगानं होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी वाढत आहे. 


आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशात 7240 नवीन रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजार 490 झाली आहे. त्यापैकी 2,701 रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. 


गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी तब्बल 93 दिवसांनंतर एका दिवसांत देशात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. आज हा आकडा सात हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की, काय? अशी भिती व्यक्त होत आहे. 


महाराष्ट्रात एकाच दिवसात रुग्णसंख्येत दुप्पट वाढ


राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701  रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांनो धोका वाढला; बुधवारी 1765 रुग्णांची वाढ


मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1765 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी 83 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 866 झाला आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 7000 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,972 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.079% टक्के इतका आहे.


सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 7000 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1482 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 650 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 13, रायगड 253, पालघर 181, रत्नागिरी 17, सिंधुदुर्ग 10, नागपूर 58, चंद्रपूर 11, वाशिम 13, औरंगाबाद 11 आणि नाशिकमध्ये 35 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2701 सक्रिय रुग्ण आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India Coronavirus Updates : पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका; दिल्लीसह मुंबईतही वाढता प्रादुर्भाव, मुंबईत 6 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट