Vidhan Parishad Elections  :  राष्ट्रवादीकडून (NCP) विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Candidate) रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

  


खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी 
एकनाथ खडसे यांचे नाव विधान परिषदेसाठी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.  जळगाव जिल्ह्यातून कार्यकर्ते खडसेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी म्हटलं की, मला उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. शरद पवार यांचा विश्वास मी सार्थ करुन दाखवेन. भाजपनं अडगळीत टाकल्यानंतर राष्ट्रवादीनं हात दिला, असं खडसे म्हणाले. 






विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस


विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भाजप सहावा उमेदवार देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील आणि सदाभाऊ खोत  यांची नावं चर्चेत आहेत. आज उमा खापरे यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील किंवा सदाभाऊ खोत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली आहे. गुप्त मतदानाच्या आधारावर सहा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. 


शिवसेना
सचिन अहिर
आमश्या पाडवी


काँग्रेस
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे


भाजप
प्रवीण दरेकर
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
प्रसाद लाड (पाचवे उमेदवार)
सदाभाऊ खोत (सहावे उमेदवार)


राष्ट्रवादी 
एकनाथ खडसे
रामराजे नाईक निंबाळकर


राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार?
राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केलाय. त्याला ईडीनं विरोध केलाय. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिकांचे वकील आज उत्तर देणार असून न्यायालयात त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.